Business Blogs

Union Budget मधून कंपन्या, उद्योजक आणि व्यापा-यांना काय मिळाले?

Union Budget

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘रालोआ’ सरकारने 2018-19 चा Union Budget म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्प गुरूवारी सादर केला. अर्थसंकल्पानंतर कोणत्या गोष्टी महागणार आणि काय स्वस्त होणार याकडे सर्वसामान्य माणसांचे लक्ष होते; परंतु सा-या उद्योजकांचे ध्यान आपणास काय मिळणार, उद्योगधंद्यास पोषक वातावरण कसे तयार होणार, लघू किंवा मध्यम बिझनेसेससाठी सरकारने कोणत्या उपाययोजना केल्या आहे, या सारख्या अनेक प्रश्नांवर होते. म्हणूनच आजचा विषय आहे Union Budget मधून कंपन्या, उद्योजक आणि व्यापा-यांना काय मिळाले…

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

प्रथम पाहू यात महाग झालेल्या वस्तू – मोबाईल आणि मोबाईल अॅक्सेसरीज, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू, फ्रुट ज्युस आणि व्हेजिटेबल ज्युस, परफ्युम, कॉस्मेटिक्स, टूथपेस्ट, टूथ पावडर, सौंदर्यप्रसाधने, गाड्यांच्या अॅक्सेसरीज, घड्याळं, फर्निचर, लहान मुलांची खेळणी, व्हिडीओ गेम तसेच क्रीडा साहित्य इ.

Click here to watch latest motivational videos 

स्वस्त झालेल्या वस्तू – क्रुड ऑईलवरील एक्साईज ड्युटी कमी झाल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त, कच्चा काजू स्वस्त झाला तसेच आयात कर वाढवल्याने भारतातील वस्तू स्वस्त होतील.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

कंपन्या, उद्योजक आणि व्यापा-यांसाठी अर्थसंकल्पातील तरतूदी…

  • मायक्रो, लघू आणि मध्यम उद्योगधंद्यांसाठी 3,794 कोटी रुपये मंजूर करण्यात आले तसेच मुद्रा योजनेसाठीचे लक्ष्य तीन लाख कोटी इतके ठेवण्यात आले आहे.
  • अर्थसंकल्पात डिजीटल इंडिया स्कीमवरील पूर्वीची तरतूद वाढवून 3,073 कोटी करण्यात आली.
  • तसेच भारतभर प्रामुख्याने गावात 5 लाखांहून अधिक वायफाय हॉटस्पॉट सुरू करणार.
  • भारत सरकारने टेक्सटाईल सेक्टरसाठी 7,148 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
  • अर्थसंकल्पातून शेतक-यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. ‘ऑपरेशन ग्रीन’साठी 500 कोटी रुपये मंजूर केले.
  • तसेच फिशरिज, शेतीच्या विकासासाठी व पशूपालनासाठी प्रत्येकी 10,000 कोटी देण्यात आले आहे.
  • शेतक-यांच्या मालाल सर्वाधिक भाव मिळण्यासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे.
  • 250 कोटींहून अधिक टर्नओव्हर असणा-या कंपन्याच्या कॉर्पोरेट टॅक्समध्ये 25% टक्के वाढ करण्यात आली.

To register for upcoming seminar click here 

Comments

comments