Business Blogs

तुमच्या Business मध्ये ‘या’ अडचणी येतात का? हे जरूर वाचा…

Problems

बिझनेस म्हणजे आव्हान… तुम्हाला माहीत नसतं Business ची कशी सुरूवात करायची आहे, आपलं ध्येय काय आहे, Business सेटअप कसा करायचा, हे काहीच माहीत नसते; परंतु, जेव्हा बिझनेस सुरू केल्यावर तो मेनटेन करणे आणि बिझनेस वाढवणे फार आव्हानात्मक असते. म्हणूनच, आम्ही मराठी उद्योजकांच्या Business मध्ये येणा-या समस्या समाधान करण्यासाठी एक केस स्टडी घेऊन आलो आहोत… पाहू यात पुढे…

डेलिगेशनची भीती… नवे उद्योजक आपल्या बिझनेसचा प्रत्येक पैलू वाढविण्यावर भर देतात. त्यात मार्केटिंग, सेल्स, प्रोडक्ट डेव्हलपमेंट असो या सर्वांवर बिझनेस वाढवताना फोकस करावा लागतो. तेव्हा बिझनेसमन स्वतः आपल्या कंपनीचा विकास करू शकत नाही. तो आपल्या कर्मचा-यांकडून सर्व काम करून घेतो. अशावेळी कर्मचा-यावर विश्वासू आहे की नाही, ही भीती बिझनेसमनला असते. अशावेळेस बिझनेसमनने आपल्या टीमला छोटछोटी कामं द्यावी. जर ती कामे वेळेत पूर्ण झाली तर पुढची काम कर्मचा-यांना द्यावीत. कर्मचा-यांना कामाचे डेलिगेशन हळूहळू देणे.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

तणाव… तुम्ही जेव्हा नवीन बिझनेस सुरू करता तेव्हा कामामध्ये तणाव येणारच. आपण स्ट्रेसमध्ये कशामुळे येते… जास्त काम केल्याने, अपयश येण्याच्या भीतीने. अशावेळेस तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट करता येणे गरजेचे आहे. जास्त काम करताना जर तणाव आला तर तो मॅनेज कसा करायचा, याच्यापद्धती आपण शोधायला हव्यात. तसेच कंपनीतील काम आणि फॅमिली टाईम वेगळं करा. दोघांनाही समान वेळ दिल्याने आपण तणावविरहीत जीवन जगू शकतो.

Click here to watch latest motivational videos 

चुकीच्या लोकांना नियुक्त करणे… काही उद्योजक पैसे वाचवण्यासाठी टीम मोठी करीत नाहीत तसेच सर्व काम ते स्वतः पूर्ण करण्यावर भर देतात. तर काही बिझनेसमन त्यांच्या मनी असणा-या Trust Issues मुळे कर्मचा-यांना कामावर घेत नाहीत. अशावेळेस  ज्या कामात तुम्ही चांगले नाही आहात त्यासाठी स्पेशलिस्ट माणूस नेमा.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

चुकीच्या लोकांना नियुक्त करणे… तर अन्य बिझनेसमन मोठ्या प्रमाणावर कर्मचा-यांची भरती करतात. त्या कर्मचा-यांचा कंपनीत रोल कोणता, हे कोणालाच ठाऊक नसतो. अनेक कंपनीमध्ये अनेकजन चुकीच्या लोकांना नियुक्त करतात. अशावेळेस उद्योजकाने आपल्या कंपनीत उगाचच खोगीरभरती करू नये. जेवढे आपल्या कामासाठी कर्मचारी लागतील तेवढेच भरती करावी.

To register for upcoming seminar click here 

कठोर निर्णय घेणे… जेव्हा तुम्ही नवा बिझनेस सुरू करता तेव्हा १०० हून अधिक निर्णय एकाचदिवशी घेता आणि तो निर्णय उत्तमच हवा कारण यावर तुमच्या बिझनेसचा करीअर ग्राफ अवलंबून आहे. जसजसा बिझनेस वाढेल तसतसे तणाव, निर्णय घेणे आणि बिझनेस मेनटेन करणे अवघड होते. अशावेळेस पुढील काही पद्धतीने तुम्ही तुमच्या बिझनेसमधील निर्णय चांगल्याप्रकारे घेऊ शकता.

ध्येयाबाबत स्पष्टता ठेवा… तुमच्या ध्येयाबाबत स्पष्टता ठेवा. तुम्हाला दिवसभरात, आवठवड्यात किंवा वर्षभरात काय साध्य करायच आहे, ते ध्यानी ठेवा. प्रत्येक समस्येला आत्मविश्वासाने सामोरे जा… लक्षात ठेवा प्रत्येक समस्येला उत्तर आहे. त्वरीत निष्कर्षावर पोहचू नका, नवे बिझनेसमन नवी कल्पना सुचली की त्वरीत निष्कर्षावर पोहचतात, असे करू नका. सर्व बाबी पडताळणे गरजेचे आहे. तसेच जर कुठे अडलात तर मदत मागा. आपल्या बिझनेसमधील मित्र किंवा बिझनेस मेंटॉरकडे आपल्या समस्या घेऊन जा. बिझनेस कोच नक्कीच आपल्या समस्यांचे समाधान करतील आणि आपला बिझनेस वाढवण्यामध्ये महत्त्वपूर्ण मदत करतील.

Comments

comments