Contact No : 9223334907 / 8291103660
लिमिटेड ऑफर : 699 चे पुस्तक फक्त 499 मध्ये आजच आपली कॉपी बुक करा आणि वाचवा 200
Picture

आपणा सर्वांना आयुष्यात काही तरी करायचे असते.

काही तरी बनून दाखवायचे असते. काहींना मोठे व्हायचे ध्येय असते,काहींची कुटुंब सुधारण्याची ध्येये असतात तर काहींना आजूबाजूचा परिसर, समाज आणि देश घडवायचा असतो. जेवढी माणसे तेवढी त्यांची ध्येये वेगवेगळी. कोण स्वतःच्या ध्येयासाठी जगत असते तर कोण दुस-यांच्या ध्येयासाठी जीवाचे रान करीत असतो. या ध्येयाने अनेकांना झपाटलेले असते. काहीतरी नवे करण्याचे, शिकायचे असते. परीघापलीकडच्या विचारांनी अनेकांचे मन भारावून गेलेले असते. ते मिळविण्यासाठी ते जिद्द आणि मेहतनीने कामाला लागतात; परंतु आपल्या ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे, हे अनेकांना ठाऊक नसते. म्हणूनच अनेक जण आपली ध्येये अर्ध्यातच सोडतात किंवा सुटली जातात. हीच मेख ध्यानी ठेवून ‘उद्योगनीती’चे संचालक आणि मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांनी आपली ध्येये पूर्ण करण्यासाठी ‘जिंकण्यासाठी खेळा…’

तुमच्या जीवनातील ध्येयापर्यंत नेणारी 12 तत्त्वे!’ हे पुस्तक आपल्यासमोर आणले आहे.या पुस्तकाद्वारे आपण आपल्या जीवनातील ध्येये कशी उभारावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कसे मार्गक्रमण करावे, याबद्दल अधोरेखित केले आहे.

पुस्तकाचे अंतरंग :

 • गोल / ध्येय
 • ध्येयाचे प्रकार
 • शेतकरी बना
 • भविष्य शेतीची तत्त्वे
 • भविष्य शेतीची १२ प्रकारची बियाणी
 • बच्चा, काबील बनो!
 • छत्रपती शिवाजी महाराज एक मॅनेजमेंट गुरू...
 • ‘काही’ गोष्टी बोलायच्या टाळाव्यात…
 • आपल्या दृष्टीने भीतीदायक बाबी
 • आत्मविश्वास कसा वाढवाल?
 • यशस्वी भव!
 • ध्येय गाठलेल्यांच्या काही यशोगाथा
 • लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत आहोतच

प्रकाशनपूर्व प्रशंसा


जिंकण्यासाठी खेळा’ या पुस्तकामध्ये जीवनात आपल्याला ध्येये कशी ठरवायची, आपल्या कामातील अडथळे बाजूला सारून… आपला सर्वांगीण विकास कसा साधायचा, याची मूर्तिमंत उदाहरणे मांडली आहेत.

रोहिदास चव्हाण

‘जिंकण्यासाठी खेळा’ हे पुस्तक म्हणजे एक प्रॅक्टिकल मार्गदर्शन आहे. तरुणांच्या आयुष्यात जागरूकता आणण्यासाठी हे पुस्तक एक मैलाचा दगड ठरेल.

निलेश भागवत

जगभरात राम चरण, डॅन सुलिवन, जॅक वेल्च, एरिक थॉमस, लेस ब्रॉउन, टोनी रॉबिन्स, डॉ. वेन डायर, जीम रॉन यांच्यासारखे अव्वल दर्जाचे मोटिव्हेशनल स्पीकर अनेकांना घडवत आहेत. या सर्व महंतांचा आदर्श ठेवत बिझनेस कोच स्नेहल कांबळे हे मराठी तरुणांचे ‘मराठी भाषेतून’ भविष्य बदलत आहेत. याचा सर्व लेखाजोखा आपल्याला या पुस्तकातून वाचता येईल…

रविराज दुधगावकर

‘जन्माला आलो आणि काही न करताच गेलो,’ अशी काहीशी अवस्था अनेकांची असते; परंतु आपल्याला मनुष्य जन्म काहीतरी थोर कार्य करण्यासाठी मिळाला आहे, हीच मेख पुस्तकात उत्तमप्रकारे पकडली आहे. तसेच आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी लागणारे आकलन आणि विश्लेषण याविषयीची वेधक माहिती या पुस्तकात आहे.

राकेश बतुल

मराठी तरुणांना मराठी भाषेतून उद्योजक होण्याचे ज्ञान देणा-या बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांच्या कल्पकबुद्धीतून हे पुस्तक साकारले आहे. पुस्तकाच्या वाटचालीसाठी शुभेच्छा… जरूर वाचावे असे पुस्तक…

राजेश केसरकर

आयुष्य घडविणारे असे हे पुस्तक आहे. सर्वांनीच हे पुस्तक विकत घेऊन वाचायला हवे.

प्रियांका मेहेरकर

‘जीवनात ध्येय ठेवा’ असे अनेक जण वेगवेगळ्या पुस्तकातून सांगत असतात; पण त्यासाठी नक्की काय करायचे, हे कोणीही सांगत नाही. ‘जिंकण्यासाठी खेळा’ यात आपली ध्येये कशी ठरवायची आणि ध्येयपूर्तीसाठी मार्गक्रमण कसे करावे, याची इत्थंभूत माहिती दिली आहे.

राहुल बोरकर, उद्योजक