शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घालणा-या 'डिमार्ट'ची सक्सेस स्टोरी...

शेअर मार्केटमध्ये धुमाकूळ घालणा-या 'डिमार्ट'ची सक्सेस स्टोरी...

डिमार्टची पालक कंपनी 'अॅव्हेन्यू सुपरमार्केट'च्या शेअरने 1,608 रुपये इतका उच्चांक गाठला आहे. सदर कंपनी मार्च 2017 साली शेअर बाजारात दाखल झाली त्यावेळी कंपनीचा शेअर केवळ 299 रुपयांना उपलब्ध होता; परंतु पहिल्याच दिवशी कंपनीचा शेअर 100 टक्क्यांनी वधारून 615 रुपयांवर पोहोचला. आता वर्षभरानंतर म्हणजेच आज डिमार्टचे भांडवली बाजारातील मूल्य 1,00,171.80 कोटी रुपये इतके झाले आहे. तर आज पाहूयात डिमार्टच्या कार्याचा सपशेल आढावा.


सुरुवात... मे २००२ साली राधाकृष्ण दमानी यांनी 'अॅव्हेन्यू सुपरमार्केट'च्या अंतर्गत डिमार्ट हा रिटेल सुपरमार्केटचा ब्रॅंड सुरु केला. ग्राहकांना रोज वापरातील वस्तू कमीतकमी किमतीत पुरवणे हे डिमार्ट या रिटेलचे शॉपची मुख्य सर्व्हिस. सुपरमार्केट सुरु करण्यापूर्वी राधाकृष्ण हे मुंबईतील विख्यात शेअर मार्केट गुंतवणूकदार, स्टॉक ब्रोकर, ट्रेडर म्हणून प्रसिद्ध होते. त्यानंत त्यांनी अमेरिकेच्या वॉलमार्ट आणि भारतातील प्रतिस्पर्धी बिग बाझारच्या पार्श्वभूमीवर डिमार्ट रिटेल सुपरमार्केटची स्थापना केली.


अमर्याद शाखा... दमानी यांनी मुंबईमध्ये सर्वप्रथम डिमार्टची शाखा सुरु केली. पुढे महाराष्ट्रभर नंतर आंध्र प्रदेश, तेलंगाना, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, राष्ट्रीय राजधानी प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि पंजाब या राज्यात डिमार्टच्या शाखा सुरु केल्या. आजवर देशभरात डिमार्टच्या 155 हून अधिक शाखा आहेत आणि दररोज तेथे कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल होत असते.


डिमार्टचे उद्दिष्टं... अर्थ पंडितांच्या मते, डिमार्टचे एकूण उत्पन्न या तिमाहीत गेल्या वर्षींच्या तुलनेत 22.5 टक्क्यांनी वाढून 3,810 कोटी रुपये झाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात डिमार्टनं 24 आउटलेट्स वाढवली आहे. कंपनीचे भांडवली बाजारातील मूल्य 1,00,171.80 कोटी रुपये इतके झाले आहे. आउटलेट्सची संख्या वाढवणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचे कंपनीकडून कळते आहे.