बिझनेसमध्ये Vision आणि Mission का महत्त्वाचे आहे?

बिझनेसमध्ये Vision आणि Mission का महत्त्वाचे आहे?

कोणताही छोटा बिझनेस असो वा मोठी कंपनी प्रत्येकाचे व्हिजन आणि मिशन ठरलेले असतात. व्यवसाय वा कंपनीचे सोडा जीवन जगताना मानवाचेही काही व्हिजन आणि मिशन असते. त्यास आपण कल्पना आणि लक्ष्य असे म्हणू शकतो. जीवनात Vision & Mission शिवाय आपण कोणीही पुढे जाऊ शकत नाही. सचिन तेंडुलकरने कल्पना केली की मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला रिप्रेझेंट करायचं आहे. त्यानंतर त्याने लक्ष्य ठेवले आणि त्यासाठी कठोर मेहनत घेतली. आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक उंच शिखर आहे. त्याने रचलले विक्रम मोडने कोणालाही शक्य नाही. महत्त्वाचे म्हणजे मराठी व्यवसायिकाच्या बिझनेसचे Vision & Mission जबरदस्त हवे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे पैसा कमाविणे हे व्हिजन किंवा मिशन असू शकत नाही. पैसा हे आपण करीत असलेल्या कामाचे बायप्रोडक्ट किंवा आऊटपूट असू शकते. यासाठी काही उदाहरण पाहुयात… ज्येष्ठ उद्योजक धिरुबाई अंबानी यांनी भारतातील सर्वात मोठा बिझनेसमन होण्याचे व्हिजन आणि मिशन ठेवले, गोदरेज कंपनीने दर्जेदार उत्पादन तयार करण्याचा संकल्प केला आणि पूर्ण केला.


दोन्ही उदाहरणाकडे बारकाईने पाहिले तर त्यांनी आपले व्हिजन आणि मिशन उत्तम निवडले आणि त्या अनुशंगाने मेहनत केली. त्यातूनच त्यांना आपोआपच पैसा आणि प्रसिद्धी मिळाली. आपण आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी काय करु शकतो, हे आपले व्हिजन आणि मिशन असावे. याच धर्तीवर आधारित जगातील नावाजालेल्या कंपन्यांचे Vision & Mission जाणून घेऊया…

Facebook: जगातील अधिकाधिक लोकांना ऑनलाईन राहण्याची भूरळ पाडणा-या फेसबुक कंपनीचे व्हिजन “People use Facebook to stay connected with friends and family, to discover what’s going on in the world, and to share and express what matters to them.” व्हिजन सांगते की, आम्ही फेसबुकचे निर्माण मित्र आणि कुटुंबियांची जोडून राहण्यासाठीच तसेच तुम्हाला कोणत्या बाबी शेअर करायचयं यासाठी केल आहे. फेसबुकचे मिशन आहे, “To give people the power to share and make the world more open and connected.” जगभरातील लोकांना त्यांची माहिती शेअर करण्याचा प्लॅटफॉर्म निर्माण करुन देणे तसेच त्यांना एकमेकांची जोडून ठेवणे, असे फेसबुकचे मिशन हे दर्शवते.


Tesla: कंपनी जगातील सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. पाहुयात त्यांचे व्हिजन “To create the most compelling car company of the 21st century by driving the world’s transition to electric vehicles.” व्हिजन निरक्षून पाहिले तर आपल्या ध्यानी येईल की, टेस्ला कंपनीला २१ व्या शतकातील सर्वात आकर्षक इलेक्ट्रिक कार बनवायची आहे. टेल्साचे मिशन आहे, “To accelerate the world’s transition to sustainable transport.” टेस्लाचे मिशन असे सांगते की, सध्या जगात पेट्रोल आणि डिझेल या इंधनावर सुरु असलेल्या वाहतुकीला इलेक्टिक कारचा नवा पर्याय उपलब्ध करुन देणे.

Microsoft: जगभरातील नागरिकांना कंम्पुटरचे वेड लावणा-या मायक्रोसॉफ्टचे व्हिझन आणि मिशन पाहुयात… “To help individuals and businesses realize their full potential.” मायक्रोसॉफ्टच्या व्हिजनवरुन ध्यानी येते की, कंपनीने बिझनेस आणि सर्व व्यक्तींना ग्राहकवर्ग म्हणून लक्ष्य केले आहे. तसेच पूर्ण क्षमतेनिशी सर्वांना मदत करण्याचे धोरण कंपनीचे आहे. मायक्रोसॉफ्टचे मिशन आहे, “To empower every person and every organization on the planet to achieve more.” मिशन असे सांगते की, जगभरातील व्यक्ती किंवा संस्थांचे लक्ष्य मिळवून देण्यासाठी मदत करणार. यातून थेट लक्षात येते की, मायक्रोसॉफ्ट कंपनी मानवांचे काम हलके करण्यावर भर देते.


Amazon: ए टू झेड पासूनच्या वस्तू आपल्याला अमेझॉन या वेबसाईटवर मिळतात, तेही घरबसल्या. या कंपनीचे व्हिजन आहे. “To be Earth’s most customer-centric company, where customers can find and discover anything they might want to buy online.” म्हणजेच अमेझॉनची सेवा पृथ्वीवर विस्तारली असून आम्ही ग्राहकांना प्राधान्य देतो तसेच आम्ही ग्राहकांना लागणारे सर्व प्रोडक्ट्स ठेवतो, असे दर्शवते. अमेझॉनचे मिशन सांगते, “We strive to offer our customers the lowest possible prices, the best available selection, and the utmost convenience.” आम्ही कमी किंमतीत उत्तम प्रोडक्ट्स आणि घरपोच सर्व्हिस देतो, हे आहे अमेझॉनचे मिशन.

वरील सर्व केस स्टडी पाहिल्यावर आपल्याला कळेल फेसबुक, टेस्ला, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन या कंपन्यांनी फक्त आपले Vision & Mission वर लक्ष दिले आणि उत्तम मेहनत केली. आज त्या कंपन्या जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वाधिक पैसा कमाविणा-या कंपन्या म्हणून नावारुपाला आल्या आहेत. नफा कमाविणे हे आपल्या बिझनेसचे बायप्रोडक्ट असते. ग्राहकांना उत्तमातील उत्त्म सेवा देणे हे आपल्या बिझनेसचे ध्येय असावे.