रतन टाटा यांनी देशातील उद्योजकांना दिलेले बिझनेस उपदेश...

रतन टाटा यांनी देशातील उद्योजकांना दिलेले बिझनेस उपदेश...

जगातील सर्वोत्तम, यशस्वी आणि प्रसिद्ध बिझनेसमन्सपैकी एक असलेले उद्योपती रतन नवल टाटा यांना बिझनेसमधील योगदानासाठी ओळखले जाते. 'टाटा सन्स' या कंपनीला जगभरात नेण्यात त्यांना महत्त्वाचा वाटा आहे. पुढे त्यांनी बिझनेसविषयक धोरण, बिझनेसमध्ये आणलेले इन्होवेशन त्यामुळे त्यांनी व्यवसायाची व्याख्याच बदलली. असे अनेक बिझनेस उपदेश आहेत जे तरुण उद्योजक, बिझनेसमन आणि स्टार्ट अप सुरु करणारे किंवा सामान्य व्यक्तींनी रतन टाटांकडून शिकायला हवेत... पाहू यात रतन टाटा यांनी दिलेले बिझनेस उपदेश...

१. ध्येय ठेवाः ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा सांगतात की, बिझनेस किंवा जीवनात प्रत्येकाने स्वतःचे ध्येय ठेवा. ध्येय मोठी नसली तरी चालतील. छोटी-छोटी ध्येय ठेऊन ती पूर्ण करा त्यानंतर एकदा नियमीतपणा तुमच्यात आला की, मोठी ध्येय ठेवायला सुरुवात करा.


२. तुमची मुल्ये जपाः रतन टाटा सांगतात, "काहीही झालं तरी तुमची मुल्ये जपा, त्यांना तडा जाऊ देऊ नका." टाटा कंपनी आज त्यांच्या मुल्यासाठी ओळखली जाते. रतन टाटा यांनी स्वतःही ही मुल्य पहिली स्वतःमध्ये रुजवली नंतर कंपनीत. म्हणून टाटा कंपनीचे नाव जगभरात घेतले जाते.


३. इतरांना प्रोत्साहित करण्याची क्षमता ठेवाः तुमच्या टीमला, कंपनीतील सहका-यांना प्रोत्साहित करण्याची क्षमता ठेवा. तुम्हा-आम्हाला जीवनात अनेक समस्या असतात तेव्हा कर्मचा-यांकडून सर्वोत्तम काम करवून घेणे, ही तुमचे जबाबदारी आहे. म्हणूनच टीम किंवा सहका-यांना प्रोत्साहित करण्याची क्षमता ठेवा.


४. सेफ मोडमधून बाहेर पडा: उद्योजक, कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना रतन टाटा यांचा हा पाईन्ट लागू पडतो. आपण सर्वांनी 'सेफ मोड'मधून बाहेर पडले पाहिजे. सेफ मोडमध्ये असल्यावर आपण आळशी होतो, दुस-यांवर अवलंबून राहतो आणि त्यामुळे आपण अपयशाच्या दिशेने जात असतो. म्हणूनच रतन टाटा सांगतात सेफ मोडमधून बाहेर पडा.


५. नेहमी सकारात्मक दृष्टीकोण ठेवाः बिझनेसमन किंवा कर्मचा-यांनी आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टीकोण ठेवावा, असा उपदेश रतन टाटा देतात. आपण जर नेहमी नकारात्मक दृष्टीकोण ठेवला तर आपले काम कधीच होणार नाही आणि जर सकारात्मक दृष्टीकोण ठेवला तर आपल्या आत्मविश्वास आणि सकारात्मकतेमुळे थोडं का होईना कामात यश मिळते.

६. संपूर्ण गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नकाः रतन टाटा यांचा पुढचा उपदेश सर्वात महत्त्वाचा आहे. ते सांगतात, "Don’t put all your eggs in one basket." म्हणजेच संपूर्ण गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नका. अपार कष्ट करून आपन पैसे कमावतो तेव्हा ते पैसे गुंतवताना विचार-विनिमय करून गुंतवा. एकाच ठिकाणी संपूर्ण गुंतवणूक करू नका, जर ती कंपनी बुडाली तर तुमचे सर्व पैसे बुडण्याची शक्यता असते.