बिझनेस आणि जीवनामध्ये संयम का महत्त्वाचा आहे?

बिझनेस आणि जीवनामध्ये संयम का महत्त्वाचा आहे?

उद्योजकाकडील संयम हा सद्गुण त्याचा बिझनेस वाढवतो... "Patience is the virtue." म्हणजेच संयम हा एक सद्गुण आहे आणि संयम सर्वसामान्य माणसं आणि उद्योजकांकडे असलाच पाहिले. संयम नसणारे उद्योजक आपले उत्पादन किंवा सेवा विकली गेली नाही की, ते रागवतात आणि रागाच्या भरात काही असे निर्णय घेतात की ते त्यांच्या बिझनेससाठी हानीकारक ठरू शकताततर याउलट संयमी उद्योजक संयमाने निर्णय घेतोतो आणि आपल्या बिझनेस वाढीवर लक्षकेंद्रित करतो. म्हणूनच आजचा आपला टॉपिक असेल आपल्याकडे जीवनात किंवा बिझनेसमध्ये संयम का असावा?

'जिंकण्यासाठी खेळा' पुस्तक घेण्यासाठी येथे क्लिक करा

Good Things Comes to Those Who Wait... जो बिझनेसमन आपल्या कामात संयम बाळगतो त्याच्यासोबत अमेझिंग गोष्टी घडतात. आपल्या वाईट कामाबद्दल विचार करता चांगल्या कामासाठी मेहनत करतो तोच उद्योजक भविष्यात चांगला सेल्स, समाधानी ग्राहक मिळवू शकतो.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा  

कंपनीची प्रतिष्ठा आणखीन मजबूत करू शकता... जर उद्योजक आणि त्याच्या कंपनीकडे संयम असेल तर त्यांनी ठरवलेल्या ध्येयांकडे योग्यप्रकारे वाटचाल करू शकतात. आपले आपल्या प्रोडक्ट किंवा सेवांवर विश्वास पाहिजे. उदा. जयंतराव साळगावकरांनी जेव्हा कालनिर्णय हे कॅलेंडर बाजारात आणले तेव्हा लोकांनी या प्रोडक्टवर प्रश्नचिन्ह उभे केले; परंतु त्यांचा त्यांच्या प्रोडक्टवर विश्वास होता. आज 'कालनिर्णय' मोठा ब्रॅन्ड म्हणून नावारुपाला आला आहे.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

संयम आपली सहनशीलता वाढवतो... बिझनेस म्हटलं की प्रत्येक दिवसाला नवीन आव्हान समोर उभे राहते. जेव्हा आपण आव्हानांना बिनधास्तपणे सामोरे जाऊ, तेव्हा आपसूकच आपली सहनशीलता वाढलेली असेल; परंतु हे सर्व संयमावर अवलंबून आहे.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

संयमामुळे उत्तम टीम कल्चरचा विकास... संयमामुळे उत्तम टीम कल्चरचा विकास होतो. जर आपला मालकच संयमी आहे तर कंपनीमधील कर्मचा-यांमध्ये एक आनंदी वातावरण राहते. याचा चांगला परिणाम बिझनेसमधील आऊटकमवर होतो आणि अशा बिझनेसची वाढ उत्तमरित्याच होतो. म्हणून संयमी उद्योजकांनी चांगले बिझनेस घडवले आहेत.