फ्लिपकार्ट विकत घेणा-या 'वॉलमार्ट'बाबत जाणून घ्या महत्त्वाचे फॅक्ट्स!

फ्लिपकार्ट विकत घेणा-या 'वॉलमार्ट'बाबत जाणून घ्या महत्त्वाचे फॅक्ट्स!

भारतातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या फ्लिपकार्टला अमेरिकेतील वॉलमार्ट या बहुराष्ट्रीय रिटेल कॉर्पोरेशन कंपनीने विकत घेतले आहे. अनेक दिवसांपासून अमेझॉन आणि वॉलमार्ट देशी फ्लिपकार्ट कंपनीतील अधिकाधिक समभाग विकत घेण्यात उत्सुक होते. दरम्यान, फ्लिपकार्टने ७७ टक्के हिस्सा १६ अब्ज डॉलर्सना विकल्याचे सांगण्यात येते. भारतीय रुपयांमध्ये ही डील सुमारे एक लाख कोटी रुपये देऊन करण्यात आली. देशी कंपनीत एवढे स्वारस्य दाखविण्या-या वॉलमार्टबद्दल आज जाणून घेऊया.

१. अमेरिकन बिझनेसमन सॅम वॉलटन यांनी वॉलमार्ट ही बहुराष्ट्रीय रिटेल कॉर्पोरेशन कंपनीची स्थापना २ जुलै १९६२ साली अमेरिकेतील अर्कांसास येथे केली. वॉलमार्ट हे एक रिटेल हायपरमार्केट, डिस्काउंट डिपार्टमेंट स्टोअर्स चैन म्हणून कार्य आहे. 

२. काही वर्षांपूर्वी वॉलमार्टने ४४ बिलियन अमेरिकन डॉलरचा सेल्स केला होता. सदर सेल्स युरोपातील ऑस्ट्रिया या देशाच्या जीडीपीहून दुपट्ट होता.


३. वॉलमार्टमध्ये २.२ मिलियन कर्मचारी कार्यरत आहेत.

४. वॉलमार्ट जगातील २८ हून अधिक देशात कार्यरत आहे. त्यापैकी फक्त अमेरिकेत वॉलमार्टचे ६,३०६ स्टोर्स आहेत तर बाकीच्या देशात ४,५७४ स्टोर्स आहेत. त्यातून प्रत्येक आठवड्याला २०० मिलियन हून अधिक लोक सामान घेतात.  

५. सुरुवातीच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये वॉलमार्टचा लोगोचे पेटेंट घेतले नव्हते ना अक्षराचा रंग कोणता निवडला नव्हता. 


६. वॉलमार्टचे फाऊंडर सॅम वॉलटन यांनी दुस-या महायुद्धात आर्मी इंटिलिजन्स युनिट कॉर्प्समध्ये काम करीत होते. ती नोकरी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात वॉलमार्टची संकल्पना आली.

७. अमेरिकेतील अॅव्हरेज फॅमिली ढोबळमानाने चार हजार अमेरिकन डॉलर वॉलमार्टमधून सामान घेण्यात खर्च करतात.


८. अॅव्हरेज वॉलमार्ट सुपरसेंटरमार्फत दिवसाला १,४०,००० आयटम्स सेल होतात  तर तीन लाखांहून अधिक वॉलमार्टच्या कर्मचा-यांनी १० वर्षांहून अधिक काळ कंपनीसाठी काम केले आहे.

९. २००९ आणि २०१० साली वॉलमार्ट अमेरिकेत सर्वाधिक सर्च केलेला बिझनेस अशी नोंद 'टेलीनॅव्ह जीपीएस सिस्टीम' या संस्थेने केली आहे.


१०. सध्या वॉलमार्टचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन हे असून त्यांच्या कारकिर्दीत वॉलमार्ट अब्जोंचा नफा कमावित आहे. फ्लिपकार्ट डीलमध्येही डग यांचा महत्त्वाचा सहभाग होता.