बिझनेसमन मुकेश अंबानी यांचे होणारे जावई आनंद पिरामल आहेत तरी कोण?

बिझनेसमन मुकेश अंबानी यांचे होणारे जावई आनंद पिरामल आहेत तरी कोण?

सध्या देशभर लग्नसराईचे दिवस आहेत. जनसामन्यांपासून ते बॉलीवुडकर तसेच देशातील उद्योजक आणि व्यवसायिक कुटूंबामध्ये लगीनघाई सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असलेले मुकेश अंबानी यांची एकमेव कन्या ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला. तेव्हा सर्वसामान्यांना अज्ञात असणा-या आनंद पिरामल यांच्याबद्दल आज जाणून घेऊयात...


आनंद पिरामल यांच्याबद्दल... पिरामल ग्रुप आणि श्रीराम ग्रुपचे अध्यक्ष अजय पिरामल आणि स्वाती पिरामल यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. ते सध्या पिरामल एंटरप्राइझचे कार्यकारी संचालक आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेवियामधून अर्थशास्त्राची पदवी मिळवली आहे. 


आनंद यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी दोन स्टार्टअप कंपन्या सुरू केल्या. त्यापैकी पहिले स्टार्टअप 'ई-स्वास्थ्य' तर दुसरं स्टार्टअप 'पिरामल रियल्टी' असे आहे. आता हे दोन्ही उद्योग पिरामल एंटरप्रायझेसचा महत्त्वाचा भाग म्हणून कार्यरत आहेत.


ईशाही आहे एक बिझनेसवुमन... मुकेश अंबानी यांची कन्या अशी फक्त ईशाची ओळख नसून रिलायन्स जिओ या कंपनीत तिचे महत्त्वाचे योगदान आहे. तसेच ईशाने येल विद्यापीठातून मानसशास्त्र आमि साऊथ एशियन स्टडीज या विषयांत पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.
 

अंबानी आणि पिरामल या कुटुंबियांची मैत्री ४० वर्षांपासून आहे. आता या मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले असून येत्या डिसेबर महिन्यात दोघांचे थाटामाटात लग्न होईल, अशी माहिती अंबानी कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.