अन्न, वस्त्र, निवारा आणि ट्रान्सपोर्ट...  अशात-हेने ओला कॅब्सने बिझनेसमध्ये यश मिळवले

अन्न, वस्त्र, निवारा आणि ट्रान्सपोर्ट... अशात-हेने ओला कॅब्सने बिझनेसमध्ये यश मिळवले

बिझनेस पंडितांनी लिहून ठेवले आहे, ग्राहकांना जर उत्पादन आणि सेवा यांची गरज भासली तर ते प्रोडक्ट किंवा सेवा विकत घेणारच. बिझनेसमनने फक्त ती गरज निर्माण केली पाहिजे. मग आपोआपच ग्राहक तयार होतात आणि आपली सेवा विकली जाईल. हेच तत्त्व ओला कॅब्सने निर्माण केले. भारतात वाहतुकीसाठी बस, रिक्षा आणि ट्रेन अशा सुविधा आहेत; परंतु सर्वांनाच सार्वजनिक वाहनाने प्रवास करणे अवघडीचे वाटते हीच गरज ओला कॅब्सने ओळखली आणि आपली सेवा सुरू केली. अवघ्या काही वर्षातच ओलाने आपला बिझनेस उत्तम वाढवला. तर आजच्या ब्लॉगमध्ये आढावा घेऊयात ओला कॅब्सच्या बिझनेस यशाचा...

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

प्रारंभ... अमेरिकेतील 'उबर' या राईडशेअरिंग कॅब सर्व्हिसच्या धर्तीवर भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 'ओला कॅब्स' ही कंपनी डिसेंबर २०१० साली सुरू केली. तत्त्पूर्वी भाविश आणि अंकित यांनी जगविख्यात कंपनींसोबत काम केले होते; परंतु उद्योजक बनण्याची आणि काहीतरी नवीन निर्माण करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती म्हणूनच या दोघांनी एकत्रित येऊन 'ओला कॅब्स' या कंपनीचे निर्माण केले.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

'ओला'च्या सर्व्हिसेस... 'ओला कॅब्स'ने भारतातील अनेक शहरात टू व्हीलर प्रकारात ओला बाइक, ओला पेडल तर थ्री व्हीलरप्रकारात ओला ऑटो, ओला ई रिक, फोर व्हीलर्सप्रकारात, ओला लक्स, ओला मायक्रो, ओला मिनी, ओला, प्राइम एक्झिक, ओला प्राइम प्ले, ओला प्राइम सेडान, ओला प्राइम एसयूव्ही, ओला आऊटस्टेशन, ओला शेअर आणि सिक्स व्हीलर प्रकारात ओला शटल या सर्व्हिसेस सुरू केल्या. ग्राहकाच्या गरजेनुसार रिक्षापासून ते लक्झरी कार्स ओला भाड्याने देण्याचे काम करते.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

सक्केस फॉरम्युला... 'ओला कॅब्स'ने मिळवलेले यशामागे ओलाच्या टीमच्या स्ट्राटेजीचा मोठा वाटा आहे. ओला टीमच्या तंत्रज्ञानाच्या मदतीने अमुलाग्र बदल आपल्या प्रोडक्टमध्ये केले आणि यामुळेच ग्राहकांना त्यांची सर्व्हिस आवडली. ओला टीमने मोबाइल ऍप, नवीन युझर्ससाठी ऑफर, कॅब कोणत्याही लोकेशन येणे, जलद आणि निरंतर सेवा, रिअल टाईम ट्रॅकिंग सुविधा आणि या सर्व सुविधा माफक दरात यामुळेच 'ओला कॅब्स'ची सर्व्हिस अनेक ग्राहकांच्या मनात भरली आणि अधिकाधिक ग्राहकांची संख्या वाढत गेली.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

'ओला’चा पसारा… २०१० च्या उत्तरार्धात सुरू केलेली 'ओला कॅब्स'ने अनेक स्पर्धक असूनही या मार्केटमध्ये आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आज भारताच्या ११० शहरात सहा लाखांहून अधिक गाड्या धावतात तर ओलामुळे सहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. सध्या 'ओला कॅब्स'च्या कंपनीची व्हॅल्यू पाच बिलीयन अमेरिकन डॉलर एवढी आहे.