आयपीएलची कमाई नक्की होते कशी?
जगभरातील सर्वांत मोठी क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलमधून जगभरातील क्रिकेटर्स बक्कळ पैसा कमावतात. लिलावाच्या माध्यमातून क्रिकेटर्सना पैसा मिळतो.
जगभरातील सर्वांत मोठी क्रिकेट लीग म्हणजे आयपीएल. आयपीएलमधून जगभरातील क्रिकेटर्स बक्कळ पैसा कमावतात. लिलावाच्या माध्यमातून क्रिकेटर्सना पैसा मिळतो.
गडगंज श्रीमंत लोकांकडे पाहीलं की, तुम्हाला प्रश्न पडत असेल यांच्याकडे एवढा पैसा येतो तरी कुठून? हे लोक काही दिवस रात्र घाम गाळत नाही. पैशाने पैसा खेचून आणता येतो का?
तुम्ही डिझ्नी हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईमवर वेब सिरीज किंवा सिनेमे पाहता का? तसं पहायला गेलं तर 2015 पासूनच OTT प्लॅटफॉर्म तरुणाईमध्ये प्रचलित होऊ लागला होतं. वेगवेगळे शोज आणि वेबसिरिजनी तरुणांच्या मनाचा ठाव घेतला
Parle कसा बनला जगातला सर्वात मोठा बिस्किट ब्रँड? तुम्हाला ते दिवस आठवतायत का, जेव्हा दिवसाची सुरुवात चहा आणि पार्ले जी बिस्कीट पासून व्हायची. अनेक जण पार्लेजीचं बिस्किट पाण्यात सुद्धा बुडवून खायचे. कित्तेक जण आजही त्यांच्या दिवसाची सुरुवात पार्लेजी बिस्किट खाऊन करत असतिल.
झगमगत्या दुनियेतून बाहेर पडून नवीन क्षेत्रात पाय ठेवणं वाटतं तितकं सोपं नाही. दहा वर्षात मिळवलेली प्रसिद्धी, ग्लॅमर, पैसा सर्व काही मागे सारून मयुरी यांना नव्याने सुरुवात करायची होती. पुढे त्या एम. बी. ए. करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये गेल्या. परंतु, कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा अनुभव नसल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी पडत होता. कॉर्पोरेट क्षेत्रात कामाचा अनुभव नसल्याने त्यांनी इंटरर्नशिप्स केल्या. या कामाच्या अनुभवातून त्यांचा आत्मविश्वास बळावला. जिथे त्यांनी इंटर्नशिप केली होती त्याच कंपनीने त्यांना ॲडव्हर्टायझींग क्षेत्रात पहिल्या नोकरीची संधी दिली. तेव्हापासून आजतागायत त्या डिजिटल, मार्केट रिसर्च, ॲडव्हर्टायझींग क्षेत्रात यशस्वीरित्या काम करत आहेत.
प्रसिद्ध अभिनेते सुद्धा त्यांना मार्गदर्शनासाठी कोचची निवड करतात. हॉलिवुड अभिनेता लिओनार्डो दिकॅप्रिओ हादेखील त्यापैकीच एक. त्याने अनेक भूमिका साकारण्यासाठी टोनी रॅबिन्स या लाईफ कोचची मदत घेतली होती. व्यवसाय प्रशिक्षण हे काही सर्वात यशस्वी उद्योजकांद्वारे वापरलं जाणारं एक मौल्यवान स्त्रोत आहे आणि जर ते त्यांच्यासाठी कार्य करू शकतं तर निश्चितपणे तुमच्यासाठी सुद्धा कार्य करू शकतं.
गरजेखातीर महेश यांनी एका उत्तम आविष्काराला जन्म दिला आणि आज त्यांचा हा अविष्कार भारतात प्रत्येक घरात दिसून येतो. पण याच आविष्काराला का जन्म दिला गेला त्यामागील महेश यांची गोष्ट खूपच दुःखद आहे. केंट आरो कंपनीचे संस्थापक महेश गुप्ता यांच्यासाठी 1998 हे वर्ष अत्यंत वाईट होते. कारण यावर्षी महेश यांची दोन मुले अशुद्ध पाण्यामुळे आजारी पडली आणि आजारपणातच त्या दोघांचेही निधन झाले... आपल्या मुलांच्या मृत्यूमुळे त्यांना मोठा धक्का बसला. आणि त्यानंतर महेश यांना वॉटर प्युरिफायर आणि शुद्ध पाण्याचे महत्त्व समजले. त्यावेळी बाजारात वॉटर प्युरिफायर उपलब्ध होते. पण त्यांची गुणवत्ता समाधानकारक नव्हती. म्हणजे ते प्युरिफायर पाणी पूर्णपणे शुद्ध करत नसत. त्यामुळे महेश यांनी यासाठी काम करण्याचे ठरवले आणि अशीच केंट आरोची कल्पना उदयास आली. व्यवसायाने अभियंता असणाऱ्या महेश यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी त्यांची कल्पना यशस्वी केली..
अशाच एका यशस्वी उद्योजीकेची कहाणी सुद्धा रोमांचित करणारी आहे. सूची मुखर्जी - या एक अशा महिला आहेत ज्यांनी स्वतःच्या बळावर कोटींची कंपनी उभी केली आणि आज त्या अनेक महिलांचे प्रेरणास्रोत बनल्या आहेत.. लंडनच्या कॅंब्रिच युनिव्हर्सिटीमधून इकोनॉमिक्स आणि मॅथ्समध्ये बीए तसेच इकोनॉमिक्स मधून फायनान्समध्ये मास्टर्स करणाऱ्या सूची मुखर्जी या 'लाइमरोड डॉट कॉम (LimeRoad.com)' या ऑनलाईन फॅशन स्टोअरच्या फाउंडर आणि सीईओ आहेत. या शॉपिंग पोर्टलवर स्त्रियांच्या लाईफ स्टाईलशी संबंधित उत्पादने मिळतात. या यशामुळे दोन मुलांची आई असलेल्या सुची मुखर्जी या स्वप्ने पूर्ण करण्यात आणि जीवनात बदल घडवून आणण्यात गुंतलेल्या स्त्रियांसाठी प्रेरणा स्त्रोत बनल्या आहेत... सूची मुखर्जी यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लेहमन ब्रदर्स कंपनीमध्ये सीनियर एसोसिएट म्हणून त्यांची पहिली नोकरी केली होती. याच जवळपास ५ वर्षे काम केल्यानंतर त्यांनी टेलीकॉम मीडिया टेक्नोलॉजी आणि फाइनेंस इंस्टीट्यूशनकडे लक्ष केंद्रित केले. या क्षेत्रातील ज्ञान मिळविल्यानंतर त्यांनी 'वर्जिन मीडिया कंपनी'मध्ये 'डायरेक्टर फॉर चेंज एंड बिजनस डेवलपमेंट'चे पद सांभाळले..
तुम्ही एखादा बिझनेस सुरु करता. त्या बिझनेसची ओळख निर्माण करता. पण त्या बिझनेसला अधिकृतरित्या नोंदवले नाही तर तुम्हाला पुढे जाऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तुमच्या बिझनेसचे नाव, त्याची सेवा कोणीही त्या नावाने किंवा दुसऱ्या नावाने इतर ठिकाणी चालवू शकतात. त्यात तुम्हाला अनेक गोष्टींची काळजी सुद्धा घ्यावी लागते. जसे की तुमच्या बिझनेसचा प्रकार, बिझनेसमध्ये किती पार्टनर्स आहेत किंवा तुम्ही एकट्याने कंपनी चालवत आहात, हे सर्व तुमच्या बिझनेसची नोंदणी करताना लिहिणे व त्या संबंधित कागदपत्रे दाखवणे गरजेचे आहे...
शिवराय.. आपले शिवराय.. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला.. ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली.. ज्यांनी महाराष्ट्र राखला.. सर्वप्रथम अशा महान छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन! यश मिळविण्यासाठी मैदानात उतरून संघर्ष करणे महत्त्वाचे आहे. ते यश प्राप्त करण्याचा आदर्श आणि शिकवण ज्या महान व्यक्तीकडून आपण घेतो ते आपले मराठी साम्राज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी कधीही कोणासमोर हार मानली नाही. शत्रूंना लढा देऊन स्वराज्याची स्थापना केली.. 10X MBA Online ॲप डाऊनलोड करा त्यांच्यामुळे भारतातील सर्वांत शक्तिशाली सत्ता म्हणून मराठ्यांचे साम्राज्य ओळखले जाते. शिवरायांमुळे स्वराज्याची स्थापना होऊन मराठी माणसाला ओळख मिळाली. आपल्या मावळ्यांसोबत राहून त्यांनी सर्व संकटाच्या प्रसंगांना धीराने तोंड दिले. बिझनेसमध्ये जर तुम्हाला कोणाचा आदर्श ठेवायचा आहे तर ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळेच गुण आपण आत्मसात केले पाहिजेत. त्यांचे हे गुण आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा तेवढेच परिणामकारक ठरू शकतात. बिझनेसमध्ये यश मिळविण्यासाठी हे गुण आत्मसात करणे महत्त्वाचे आहे.
याच खेळातील सुप्रसिद्ध अमेरिकन माजी बास्केटबॉलपटू म्हणजे कोबी ब्रायंट.. कोबी ब्रायंट हा जगप्रसिद्ध बास्केटबॉलपटू असल्याने त्याला कोणी ओळखत नसेल अशी व्यक्ती सापडणार नाही. त्याच्या फॅन्समध्ये तो 'ब्लॅक मम्बा' या नावाने सुद्धा ओळखला जात असे.. बास्केटबॉल सारख्या खेळामध्ये अगदी प्राविण्य मिळवून एखाद्या जादूगाराप्रमाणे तो खेळत असे. त्यामुळे त्याला बास्केटबॉलचा जादूगार म्हणणे अगदीच बरोबर ठरेल. पण याच जादूगाराचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू व्हावा याची कोणीच कल्पना केली नव्हती...
काय आहे इन्फ्लुएन्सर मार्केटिंग ? मूलभूत स्तरावर,इन्फ्लुएन्सर मार्केटिंग सोशल मीडिया मार्केटिंगचा प्रकार आहे. यात इन्फ्लुएन्सर एखाद्या कंपनीचे प्रॉडक्ट्सची एन्डॉर्समेंट करतात. या एन्फ्लूअर्सची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉलोविंग असते. एन्फ्लूअर्सच्या फॉलोवर्सचा त्यांच्यावर विश्वास असतो. म्हणूनच मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या गुरुजींनी एखाद्या फोनला थंब्स अप दिला की त्याचे फॉलोवर्स तो फोन विकत घेतात.
आनंद महिंद्रा यांच्यासोबतच समाजातील सर्वांनी दखल घ्यावी अशीच काहीशी कथा हरभजन कौर यांची आहे, ज्या आपल्या घरूनच बेसनची बर्फी बनविण्याचे काम करतात. याची सुरूवात त्यांनी ४ वर्षांपूर्वी केली होती आणि आज त्यांच्या हातची चविष्ट अशा बेसन बर्फीला बाजारात ग्राहकांकडून पुष्कळ मागणी आहे. ९४ वर्षाच्या हरभजन कौर यांनी आपल्या हातांनी बनविलेली बेसन बर्फी जेव्हा चंदीगढच्या साप्ताहिक ऑरगॅनिक मार्केटमध्ये पाठविली जाते तेव्हा ही मिठाई लगेच विकली जाते. अमृतसरच्या जवळ असलेल्या तरन-तारन येथे हरभजन कौर यांचा जन्म झाला. लग्नानंतर त्या अमृतसर आणि नंतर लुधियाना येथे राहिल्या. पतीच्या मृत्यूनंतर म्हणजेच जवळ-जवळ १० वर्षांपूर्वी त्या चंदीगड येथे आपल्या मुलीजवळ राहायला आल्या. एके दिवशी असेच गप्पा मारत असताना त्यांच्या मुलीने बोलण्यातून त्यांच्या मनातील इच्छा विचारली. तेव्हा त्यांनी त्यांची एक इच्छा सांगितली. त्यांनी अख्या आयुष्यात एक रुपया सुद्धा कमविला नाही याची त्यांना खंत होती. तेव्हा त्यांनी मुलीला सांगितले की त्या घरच्या घरीच मंद आचेवर भाजलेल्या बेसनाची उत्तम बर्फी बनवू शकतात.
१ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढून या दाम्पत्याने प्रथम शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सावित्रीबाई फुले अशिक्षीत होत्या. त्यांना ज्योतिराव फुले यांनी घरी शिकविले व नंतर शाळेत शिक्षण देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी केले. १८४८ मध्ये भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. इस १८४८ ते १८५२पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या. त्यांच्या शाळेची नोंद सरकारी दफ्तरात झाली तेव्हा १२ फेब्रुवारी १८५२ मध्ये मेजर कॅन्डी यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळांना सरकारी अनुदान जाहीर केले.
हो!! तुम्ही जे वाचताय ते अगदी बरोबर आहे. सततचा कामाचा ताण, चिडचिडेपणा आणि बदललेल्या जीवनशैलीतील इतर गोष्टी यामुळे मुख्यतः तरूणांमध्ये डिप्रेशनचे प्रमाण वाढत आहे. भारतातही डिप्रेशनची समस्या दिवसेंदिवस फार गंभीर होत चालली आहे. या समस्येवर वेळीच उपाययोजना केली नाही तर याचे परिणाम वाईट होऊ शकतात.
कठीण नाव टाळा समजण्यास आणि उच्चारण्यात सोपे नाव बिझनेससाठी निवडा. तुमचे नाव सोपे असल्यास तुमचा बिझनेस ऑनलाईन शोधणे सोपे होते. कठीण नाव असल्यास त्यामुळे स्पेलिंग मिस्टेक होण्याची शक्यता असते.
तुम्ही उद्योजक असाल तर तुमच्या उद्योगासंबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी सुरु आहेत याची माहिती तुम्हाला असायला हवी. तुम्ही रिअल इस्टेटच्या बिझनेसमध्ये असाल तर रेपो रेट कमी झाल्याची बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आजूबाजूला घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांची माहिती असणे हे सजगपणाचे लक्षण आहे. तुमच्याच क्षेत्रातील नवीन घडामोडी तुम्हाला माहित नसतील, तर ग्राहकांवर तुम्ही छाप पडू शकणार नाही.
मायक्रोसॉफ्टने एक अत्यंत वेगळा प्रयोग त्यांच्या जपानमधील कंपनीत राबविला. मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांसाठी थेट तीन दिवस सुटी दिली. आणि या सुट्या विभागून देण्यात आल्या नाहीत तर एकत्र देण्यात आल्या. मायक्रॉसॉफ्ट जपानने ४ दिवसांच्या आठवड्याची कल्पना प्रायोगिक तत्वावर ऑगस्ट महिन्यात राबवली. आठवड्यात एक दिवस म्हणजे महिन्याच्या ४ सुट्या अधिक मिळून देखीलही कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आली नाही. आता यात केवळ कर्मचाऱ्यांची चंगळ झाली कंपनीचा त्यात कायदा काय ? तर जास्त सुट्या दिल्यामुळे कंपनीची प्रॉडक्टिव्हिटी म्हणजेच उत्पादकता ४० टक्क्यांनी वाढली. या प्रोजेक्टचे नाव 'वर्क-लाइफ चॉइस चॅलेंज समर २०१९' असे ठेवण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टने त्यांच्या २३०० कर्मचाऱ्यांना पगारात कोणतीही कपात न करता महिन्यातील प्रत्येक शुक्रवारीही सुटी देण्यात आली.
‘कार्टोसॅट-३’ भारताच्या डोळ्याप्रमाणे काम करणार आहे. या सॅटलाईटच्या मदतीने मोठ्या प्रमाणात मॅपिंग करणं शक्य होणार आहे. याचा उपयोग अर्बन प्लॅनिंग, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलोपमेंट, कोस्टल डेव्हलोपमेंट रस्ताही केला जाणार आहे, असे इस्त्रोचे प्रमुख के सिवन यांनी म्हटले आहे.
या मॅचबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्यातही डे-नाइट क्रिकेट पेक्षा 'पिंक बॉल'ने खेळल्या जाणाऱ्या मॅच बद्दल लोक जास्त उत्सुक आहेत. तुम्हालाही या पिंक बॉल बद्दल उत्सुकता असेलच.. तर हा पिंक बॉल नक्की काय आहे, हा बॉल डे-नाइट मॅचमध्ये का वापरला जातो, या बॉलसाठी गुलाबी रंगच का, या बॉलची वैशिष्ट्ये काय आहेत हे सर्व आपण जाणून घेऊया..
कमाईच्या दृष्टीने या चित्रपटाने डेडपूलला आणि दी डार्क नाईट यासारख्या लोकप्रिय सुपरहिरो चित्रपटांना मागे टाकले आहे. एका व्हिलनला मुख्य पात्र बनवून त्यांच्या भोवती कथा गुंफण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता. या चित्रपटात मनोरुग्ण असलेल्या आर्थर फ्लेक या पात्राची कथा सांगण्यात आली आहे. या आर्थर फ्लेकचे रूपांतर कुप्रसिद्ध जोकर या गुन्हेगारामध्ये कसे होते. हा प्रवास या चित्रपटात उघडण्यात आला आहे. या चित्रपटात जोकरची भूमिका अमेरिकी अभिनेता यॉकिन फोनिक्स याने निभावली आहे. त्याचप्रमाणे रॉबर्ट डी निरो या दिग्गज अभिनेत्याची देखील या चित्रपटात भूमिका आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत टॉड फिलिप्स. टॉड यांनी या आधी केवळ विनोदी चित्रपट केले होते. तर यॉकिन फोनिक्स हे छोट्या बजेटचे प्रायोगिक चित्रपट करण्यासाठी ओळखले जातात.
बजेट, आर्थिक मंदी, नोकरीतील किंवा व्यवसायातील असुरक्षितता, भविष्याची अनिश्चितता, अंतर्गत कलह, जीवघेणी स्पर्धा अशा एक ना अनेक मुद्द्यांनी ग्रासलेल्या आजच्या व्यावसायिक जीवनात ताणतणाव म्हणजेच वर्क स्ट्रेस ही एक अटळ घटना असते. पण या तणावाचे वाईट परिणाम आपल्याच शरीरावर दिसून येतात..
लवकर उठा दिवसाची योग्य सुरुवात करण्याचा सर्वात महत्वाचा आणि सोपा मार्ग म्हणजे झोपेतून लवकर उठून दिवसाची सुरुवात करा. बहुतांश लोक लवकर उठण्याबाबत जास्त सजग नसतात. सकाळी लवकर उठल्याने दिनक्रमावर कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याचे त्यांना वाटते. लवकर उठल्याने तुम्ही दिवसभर कार्यक्षम राहता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही रात्री योग्य वेळी झोपता. लवकर झोपल्याने साहजिकच तुम्हाला लवकर जाग येते. यातून एक 'हेल्दी स्लीप सायकल' तयार होते. ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. तुम्ही दिवसभर उत्साही आणि फ्रेश राहता. प्रत्येक कामाला सकारात्मकरित्या सुरुवात करता.
आपल्या काम करण्याच्या जागेवर, ऑफिस मध्ये नेहमी सकारात्मक वातावरण असायला हवे आणि हे गरजेचे आहे. नकारात्मकता कोणालाही आवडत नाही. आपण सर्वांनी आपल्या काम करण्याच्या जागेवर अशा वेगवेगळ्या प्रसंगाचा सामना केला आहे..
ब्रॅण्डला प्रमोट करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता? असा प्रश्न कुणालाही विचारल्यावर पठडीतले एक ठरलेले उत्तर मिळते. ते म्हणजे विविध माध्यमांवर जाहिरात करायची, मोठे होर्डिंग लावायचे इत्यादी. पण तुम्हाला सांगितल्यावर विश्वास बसणार नाही, की जगात असेही ब्रँड आहेत जे त्यांच्या ब्रॅण्डची जाहिरात करीत नाही.
नेहमी मोठे स्वप्न पहा, मोठे ध्येय ठेवा असा सल्ला यशस्वी लोक देतात. तुम्हाला यश मिळणार की तुम्ही अपयशी ठरणार, हे तुमच्या क्षमतेवर नाही, तर तुमचा निश्चय किती दृढ आहे यावर अवलंबून असते. अशाच एक ध्येयवेड्या उद्योजकाचे नाव होते एडविन सी बार्न्स.
पद्मभूषण श्री. बाबासाहेब नीलकंठ कल्याणी यांना 'बाबा' म्हणून सुद्धा ओळखले जाते. बाबासाहेब कल्याणी यांचे व्यक्तिमत्व इतके असामान्य आहे की यांना ओळखत नसणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. बाबासाहेब भारत फोर्जचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.. ७ जानेवारी १९४९ साली लिंगायत कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बेळगावात राष्ट्रीय मिलिट्री शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. १९७० साली त्यांनी बिट्स पिलानी मधून त्यांचे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स मधून एमएस केले. अतिशय कुशाग्र बुद्धीचे बाबासाहेब शिक्षणात नेहमी सगळ्यात पुढे असायचे. त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत कसलीच हयगय केली नाही...
प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही टेन्शन असतच मग ते जॉबच असू द्या, पैशाचं असू द्या, घरातल्या प्रॉब्लेम्सच असू द्या. हे टेन्शन घेऊन लोक जगत असतात त्यात आहाराच्या चुकीच्या सवयी, मद्यपान, धूम्रपान, उशिरापर्यंत जागरण अशी जीवनशैली असल्यास तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो.
रेडिओ आणि कॅल्क्युलेटर दुरुस्ती करण्यापासून ते ग्लोबल सॉफ्टवेअर बिझनेस चालवणाऱ्या दोन मराठी उद्योजक भावांनी त्यांच्या बिझनेसमधून आज ३५० कोटींचा टप्पा पार केला आहे. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात या मराठी भावंडांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कैलाश काटकर आणि संजय काटकर या भावांनी आज 'क्विकहील टेक्नॉलॉजिस'ला जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवले आहे.
आजची पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकली आहे असे आपल्याला म्हणता येईल. कितीही झाले तरी नव्या तंत्रज्ञानाचे युग आहे.. मुलांसोबतच अगदी पालकही मोबाईलच्या आहारी गेलेले दिसतात. तरुणाई दिवस-रात्र गेमिंग, सोशल नेटवर्किंग साईट्स, वेब सिरीज सारख्या गोष्टींच्या पाठी असतात.. हा नक्कीच मोबाईल फोनचा गैरवापर ठरू शकतो..
अनेकांना स्वतःचे स्वप्न सोडून देऊन वडिलोपार्जित व्यवसाय करावा लागतो. केवळ कुटुंबाच्या आग्रहाखातर किंवा येणाऱ्या कठीण प्रसंगाच्या वेळी शिक्षण किंवा स्वतःचे आवडते फिल्ड/ शिक्षण सोडून आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये घुसावे लागते. मग स्वतःची इच्छा असो वा नसो.. अशीच काहीशी कथा विप्रो कंपनीचे संस्थापक व पूर्व अध्यक्ष अझीम प्रेमजी यांची आहे...
अनेकदा काही जण उतावळेपणाने व्यवसाय सुरु तर करतात पण तो बिझनेस योग्य प्रकारे हँडल नाही करू शकत.. अशा वेळी बिझनेसला बसायचा तो फटका बसतोच. तर काही जण व्यवसायात टिकून तर असतात. पण १० वर्ष व्यवसाय करूनही नफा म्हणजे काय हेच माहित नसते, व्यवसाय करूनही अपेक्षित यश त्यांच्या हाती लागत नाही..
१. इतरांच्या मतांची काळजी करणे - 'लोक काय म्हणतील' हा विचार सगळ्यात हानिकारक असतो. अनेकांची स्वप्नं तर या एका प्रश्नामुळेच तुटतात. इतरांच्या मतांमुळे आपली विचार करण्याची क्षमता खुंटते.. कोणतेही काम करत असताना जे लोक नेहमी दुसऱ्यांच्या मतांची काळजी करतात ते लोक आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. अनेक लोक लोकांच्या मतांची चिंता करतात आणि त्यामुळे ते बिझनेस सुरु करू शकत नाहीत..
लहानपणापासूनच त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे घरातून शिक्षणासाठी पैसे मिळाले नाही... परंतु शिक्षणाची आवड असलेल्या शिर्के यांनी 'कमवा आणि शिका' या सरकारच्या योजनेचा लाभ घेत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले...
कोणत्याही गोष्टीची नवी सुरुवात करताना गणपती बाप्पाची पूजा केली जाते. त्यांच्या चतुराईच्या व हुशारीच्या अनेक कथा लोकप्रिय आहेत. असे हे आपले आवडते बाप्पा आपल्याला बिझनेस सुरु करण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे प्रोत्साहन देतात तसेच विविध प्रकारे कौशल्ये शिकवून जातात..
१ पैसे कमवा पुष्कळ पैसे कमावण्याच्या मार्गातील पहिल्या टप्प्यामध्ये येते ते म्हणजे सगळ्यात पहिले पैसे कमावणे. पैसे कमावण्यासाठी प्रयत्नच केला नाही तर आपल्याकडे पैसे कसे येतील. त्यामुळे आधी पैसे कमावण्याचे विविध मार्ग शोधावे. पैसा निर्माण करावा. जर बिझनेस करण्याची इच्छा असेल तर स्वतचा बिझनेस सुरु करावा. त्यातून पैसा कमवावा. एकदा की तुमच्या कडे पैसे आले की मग तुम्ही पुढच्या वळू शकता
बिझनेस चालू केल्यावर अवघ्या ५ वर्षांत बिझनेस यशस्वी करून दाखवता येतो. ५ वर्षांच्या आत बिझनेस मधून लाखो-करोडोंचा नफा कमावता येतो. तर बघुयात ते कसे शक्य होते..
बैजू आणि व्लादिमिर या मित्रांना ७५ रिजेक्शन्स नंतर एक व्हेंचर कॅपिटलिस्ट मिळाला व त्यांनतर त्यांनी सुरु केलेल्या 'रॉबिनहूड' या नो-फी स्टॉक ट्रेडिंग अॅपने आज त्यांना अब्जाधीश बनवले आहे...
१५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला. त्याकाळी एक अत्यंत गरीब समजला जाणार भारत आज जगातील सर्वात मोठी महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. भारताच्या अर्थ व्यवस्थेचा हा चढता आलेख अनेक देशांसाठी प्रेरणादायक उदाहरण आहे. पण ही प्रगती करण्यासाठी भारताला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीनंतर स्वतंत्र झालेल्या भारतासमोर अनेक समस्या होत्या. ब्रिटिशांनी तर भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करून ठेवली होती. साक्षरतेचा अत्यल्प दर आणि गरिबीच्या संकटातून देशाला बाहेर काढण्याचे काम तत्कालीन नेत्यांना करायचे होते.
'दिवसाची सुरुवात खराब झाली, म्हणजे पूर्ण दिवस खराब जाणार'. 'कितीही प्रयत्न केला तरी आपल्याबाबतीतच सर्व वाईट गोष्टी होतात.' असे नकारात्मक विचार अनेकांना सतावत असतील. हे लोक सतत स्वतःला दोष देत राहतात किंवा एकूणच परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल नाही असे मानतात. आपले कोणतेही काम व्यवस्थित पार पडत नाही. कुठल्याही गोष्टीत आपलयाला अपेक्षित यश मिळतच नाही या विचारातून हे लोक हताश होतात. बहुतेक वेळा अपयश येण्याआधीच हे लोक मैदान सोडून देतात. त्यामुळे साहजिकच प्रत्येक कामात काहीतरी खोडा येऊन अशा लोकांची कामे रखडतात. सतत नकारात्मक विचार केल्याने या लोकांची मानसिकता नकारात्मक होऊन जाते.
If it ain't broke, don't fix it अशी एक इंग्रजी म्हण आहे. जी गोष्ट चांगली आहे,त्यात विनाकारण हस्तक्षेपं करून बदल करू नका, असे केल्याने फायदाहोण्यापेक्षा नुकसानच अधिक होते. याचाच प्रत्यय शीतपेयांची विक्री करणारीजगविख्यात कंपनी कोका कोलाला आला.
१९७३ मध्ये जेव्हा अशोक ११ वीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी जात होते तेव्हा त्यांच्या जवळ पेनाची निब बदलण्यासाठी चार आणे सुद्धा नव्हते. एका शिक्षकांनी चार आण्याची मदत केली तेव्हा ते परीक्षेला बसू शकले व आज अशोक खाडे करोडो रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे मालक आहे. आज त्यांचा एका मोठ्या आर्थिक साम्राज्यावर त्यांचा अधिकार आहे...
प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते. एकदा वेळ निघून गेली की ती परत कधीच येत नाही, असा अनेकांचा समज असतो. उद्योग करण्याचे नवीन काहीतरी घडवण्याचे काम हे तरुणांचे आहे. पन्नाशीनंतरचा काळ हा निवृत्तीची तयारी करण्याचा नातवंडं खेळवण्याचा अशी धारणा असणाऱ्यांना कदाचित 'रे क्रॉक' यांचे नाव ठाऊक नसेल. यशस्वी होण्याचे वय नसते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रे क्रॉक.
प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा - तुम्ही जे आहात आणि जसे आहात त्याचा स्वीकार करा. तुमची कमजोरी ओळखणे आणि त्यावर मात केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. आपण आपल्या विकनेसचा सामना केला नाहीत तर आपण त्यात गुरफटून म्हणजेच डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो, त्यामुळे आपल्या आत्मविश्वासाला तडा जातो. म्हणून तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करा आणि तुमच्या कमजोरीवर मात करा.
1. आरामाच्या मानसिकतेतून बाहेर या - कोणतेही यश प्राप्त करण्यासाठी आरामाच्या मानसिकतेतून बाहेर पडणे गरजेचे असते. यासाठी मोठे धाडस करण्याची गरज असते. असे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा तुम्ही क्षमता आणि गुणवत्ता विकसित कराल.