मराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक

मराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक

आम्हाला उद्योगनीती आणि उद्योगनीतीच्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देताना अत्यंत आनंद होत आहे. उद्योगनीती ही संस्था 8 वर्षांपासून उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात यश मिळविण्यामध्ये आणि ते टिकवून उत्तरोत्तर प्रगती करण्यामध्ये प्रशिक्षित आणि प्रेरीत करते. उद्योगनीती महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, या ठिकाणी कार्यरत आहे. उद्योगनीतीचे मार्गदर्शक श्री. स्नेहल कांबळे हे स्वतः अभियंते आहेत त्याच बरोबर त्यांनी विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत काम केले आहे. त्याच बरोबर ते महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण मंडळावर डिरेक्टर म्हणून काम पाहतात. आजपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरात येथील हजारो उद्योजकांनी त्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपापल्या व्यवसायात प्रगती केली आहे. येत्या २७ नोव्हेंबरला (रविवारी) उद्योगनितीतर्फे १ दिवसाचा "मराठी उद्योजक ते ग्लोबल उद्योजक" हा वर्कशॉप आयोजित केला आहे. या कार्यशाळेमुळे तुम्ही तुमच्या व्यवसाय करण्याच्या पारंपारिक पद्धतेमधून फ्री व्हाल आणि तुम्हाला ग्लोबल उद्योजकता शिकता येईल. ज्यामुळे तुमचा बिझनेस १० पटीने वाढण्यासाठी सुरवात होईल. तसेच या कार्यक्रमामध्ये तुम्हाला खालील गोष्टी शिकण्यास मिळतील. : १. या जगात तुम्हाला यशस्वी व्हायच असेल तर तुम्हाला तुमच्या बिजनेस मध्ये नवीन बदल करावे लागतील.आणि या बदलासाठी कोणत्या प्रकारची माणसं कंपनी मध्ये असायला हवी व त्यांना कसं Manage करायचं हे तुम्हाला शिकण्यास मिळेल. २. जुन्या गोष्टी नष्ट होत चालल्या आहेत म्हणून नवीन गोष्टी शिकुन कंपनीत बदल करावे लागतील. व्यवसाय करण्याची पारंपारिक पद्धत बंद करून आपल्या व्यवसायात कोणत्या नवीन Systems आणि Processes आणायच्या हेदेखील शिकण्यास मिळेल. ३. जर बाहेरच्या जगात चाललेले बदल हे तुमच्या कंपनीच्या आत चाललेल्या बदलापेक्षा जास्त असतील तर तुमची कंपनी नष्ट होईल. आणि हे थांबवण्यासाठी काय करावं लागेल याच मार्गदर्शन या workshop मध्ये मिळेल. ४. ही एक संधी आहे आणि या संधीवर तुम्ही झडप घातली नाहीत तर दुसरं कोणीतरी ही संधी घेऊन पुढे जाईल.