Intelligent लोकं ‘या’ गोष्टी करतात… तुम्ही करता का?

Intelligent लोकं ‘या’ गोष्टी करतात… तुम्ही करता का?

Intelligent म्हणजे बुद्धिमान! आणि हे विशेषण मानवांना वापरले जाते. कारण या विश्वात मानव हाच सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. या पृथ्वीतलावर अनेक Intelligent लोकं आहेत. त्यांनी लावलेल्या शोधामुळे किंवा त्यांनी साकारलेल्या प्रतिकृतीमुळे त्यांचे नाव बुद्धिमान लोकांमध्ये गणले जाते. बुद्धिमान लोकं आणि सामान्य लोकांमध्ये एक छोटी रेषा आहे. ती रेषा त्यांनी जीवनात केलेल्या अथक परिश्रम आणि संघर्षांमुळे निर्माण झालेली असते. आज पाहुयात काही गोष्टी ज्या बुद्धिमान लोकं करतात आणि सामान्य करीत नाहीत…

त्यांना नवनवीन गोष्टी शिकायला आवडते – Intelligent लोकांना शिकायला आवडते. ते आयुष्यात रोज नवनवीन गोष्टी शिकण्यास तयार असतात. त्यांना वाचण्याची आवड असते. युट्यूबवर ते शिक्षणाच्या संबंधित व्हिडीओ पाहता असतात. अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स हे कॉलेजमधून ड्रॉपआऊट झालेले होते. पण त्यांनी तंत्रज्ञान शिक्षण सुरुच ठेवले आणि त्यांनी शिक्षणातून त्यांनी जगातील सर्वोत्तम कंपनी निर्माण केली.

वाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय 

नशीब नावाचा शब्दच नाही – Intelligent लोकांच्या शब्दकोशात नशीब किंवा Luck असे शब्दच नाहीत. ते आयुष्यात मेहनत आणि संघर्षावर भर देतात. त्यातूनच ते आपले नाव मोठं करतात. नशीब हा शब्द म्हणजे फक्त दंतकथा असल्याचे ते मानतात. म्हणूनच ते सामान्य माणसांपासून वेगळे ठरतात.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

चौकस असतात – बुद्धिमान लोकं चौकस असतात. आपल्या बिझनेसमध्ये किंवा धंद्यात कोणती नवीन गोष्ट सुरु आहे, याचे ते अवलोकन करतात. आणि ती गोष्ट आपल्या धंद्यात कशी येईल, याचा प्रयत्न करतात. म्हणूनच Intelligent लोकं चौकसरित्या काम करतात.

Click here to watch latest motivational videos 

धाडस आणि जोखीम घेतात – Intelligent लोकं सर्वाधिक धाडसी आणि सर्व कामांमध्ये जोखीम घेतात. अॅपलच्या स्टीव्ह जॉब्सने एका गंतवणूकदाराला 100 हून अधिक वेळ फोन केला होता. जॉब्सला कधीही भिती वाटली नाही असे करताना. शेवटी त्या गुंतवणूकदाराने जॉब्सच्या कंपनीत गुंतवणूक केली. तुम्ही तुमच्या धंद्यात अशी कोणती गोष्ट केली आहे का?

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा  

त्यांच्याकडे अतिआत्मविश्वास नसतो – Intelligent लोकांकडे फाजील आत्मविश्वास नसतो. मी एवढे करीन, तेवढे करीन अशा बाता करीत नाही, ते आपल्या कामाचे रिझल्ट दाखवितात. म्हणून अशी लोकं सामान्य लोकांपासून वेगळी ठरतात.

To register for upcoming seminar click here 

शांत स्वभाव – असे म्हणतात, “Quiet people have the loudest minds.” बुद्धिमान लोकं स्वभावाने शांत असतात. त्यांच्या डोक्यात अनेक गोष्टी शिजत असतात पण ते बाहेर दाखवित नाहीत.

अशी लोकं खुल्या मनाची असतात – सर्वाधिक Intelligent लोकं खुल्या मनाची असतात. जुन्या परंपरा, नीती या बंधनात अशी माणसे अडकत नाहीत. म्हणूनचे ही माणसं मोठं काम करतात. कोणत्या मोठ्या माणसाने विचित्र काम केल्याचे ऐकले आहे का, नाही! ही लोकं फक्त आपला व्यवसाय आणि सर्वांगीण विकास साधण्यावरच कार्य फोकस करतात.