बिझनेस सुपरहिरोजची १० वैशिष्ट्ये...

बिझनेस सुपरहिरोजची १० वैशिष्ट्ये...

आपणासर्वांची लहानपणाची एक इच्छा होती ती म्हणजे एक सुपरहिरो बनण्याची आणि म्हणूनच पुढे तुम्ही स्वत:चा व्यवसाय सुरु केला. हेच कारण आहे की तुम्ही जेव्हा लहान होतात तेव्हा कॉमिक्स वाचायाचात आणि कार्टून्स पाहायचात. तुम्ही अनेक सुपरहीरोजचे चित्रपट पाहिले असतील. हे यासाठी सांगतोय कारण प्रत्येक उद्योजकामध्ये एक सुपरहिरो लपलेला असतो. सुपरहिरो हे अतिशय प्रभावशाली लीडर्स असतात.

तुम्ही जगाचे रक्षण करण्यासाठी तुमचा व्यवसाय सुरु केला आहे. केवळ तुम्हीच तुमच्या ग्राहकांना वाचवू शकता, बरोबर ना? तर मग तुम्ही स्वत:मधील ती क्षमता का ओळखत नाहीत? का तुम्ही स्वत:मधील स्पायडरमॅनला केवळ बिल्स भरण्यापुरतच अडकून ठेवलयं? का तुम्ही स्वत:मधील आयर्न मॅनला इतरांपासून मदत करण्यापासून रोखत आहात? का तुमच्यामधील बॅटमॅन तुमच्याच कर्मचाऱ्यांशी झगडतोय? तुमच्यामध्ये एखादी वंडर वूमन देखील लपली असेल, पण तुम्हाला इतरांपासून मदत घ्यायची नाही आहे आणि हीच मूळ समस्या आहे.


मुद्दा असा आहे की, कोणताही सुपरहिरो हा परिपूर्ण नसतो. आपल्या सर्वांनाच एकमेकांची गरज असते आणि हे सर्व प्रभावशाली नेतृत्वगुणावर येऊन थांबतं. इथे काही मुद्दे आहेत जे तुम्हाला समजून घेण्यात मदत करतील की तुमचा व्यवसाय तुमच्या छंदाशी मिळता जुळता आहे की नाही? दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहेत की नाही?

तुम्हाला जे आवडत तेच करा – तुम्ही जे करता त्यावर प्रेम करायला शिका. व्यवसाय अयशस्वी होण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे, कामातील चिकाटीची कमतरता. आणि ही चिकाटी टिकून न राहण्यामागचं कारण म्हणजे उद्योजकांना ते जे काही करतात ते आवडत नसतं. स्पायडरमॅन हा नेहमी फोटो काढून पैसे कमवण्यासाठी झगडत असतो; पण त्याला हे नेहमी लक्षात ठेवावं लागतं की हे सर्व करण्यामागे त्याचा एक मोठा उद्देश आहे. तडजोड कशी करावी हे त्याला शिकून घेणं गरजेचं आहे; तो त्या फोटोग्राफसाठी लोकांना मारून ही टाकू शकतो. जीवन जगण्यासाठी त्याला पैशांची गरज आहे आणि त्यासाठी पैसे कमवण्याचे काम त्याने मन लावून करणे गरजेचे आहे. तुम्हाला जे आवडत ते अगदी जीव ओतून करायला शिका, त्यावर प्रेम करा किंवा दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्या.


“असा मनुष्य बना, ज्याकडे सर्व परिस्थितीसाठी योजना तयार असतील” - यात तुमच्या वंडर वूमनचा देखील नक्कीच समावेश होतो. प्रत्येक सुपरहिरोकडे एक योजना असते. दीर्घकालीन आणि लघू कालीन स्पष्ट योजना तयार करा. योजनेच्या महत्त्वपूर्ण घटकांमध्ये समावेश होतो तुमच्या दूरदृष्टीचा, तुमच्या मुल्यांचा आणि काही विशिष्ट उद्दिष्टांसह तुमच्या अंतिम ध्येय्याचा आणि दैनंदिन कृतींचा.

“पुढे व्हा, काम सुरु ठेवा किंवा नसेल जमत तर बाजूला व्हा” - हा पर्याय नाही. थॉमस पेन्सचे हे अमुल्य विचार तुम्हाला जगाचे रक्षण करण्यासाठी मदत करणार नाहीत. सुपरहिरो स्वत:हून परिस्थिती हातात घेतात आणि त्यावर कृती करतात! जेव्हा तुम्ही तुमच्या योजना तयार करता, तेव्हा तुम्ही तुमच्या योजनेची दैनंदिन कृती आणि कार्यांमध्ये अंमलबजावणी केली पाहिजे.


तुमची कथा तुमच्या ग्राहकांना सारखी सांगत राहा - हे म्हणायला शिका की, “मी आयर्नमॅन आहे.” तुमची कथा तुमच्या ग्राहकाला सांगणे हा तुमच्या दूरदृष्टीचा, मुल्यांचा आणि ध्येयांचा भाग आहे जो तुमच्या ग्राहकांच्या वेदना आणि समस्या दूर करतो. तुमची कथा किमान ३ प्रकारे विकसित करा आणि त्यांची उजळणी करा. एक ३० सेकंदाची कथा, एक ५ मिनिटांची कथा आणि २० मिनिटांची कथा. जे कोणी तूमची कथा ऐकण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना तुमची कथा सांगा.

प्रत्येकाला तुमची कथासारखी ऐकवत राहा - मिटींग्जमधून, मेमोजमधून, जाहिरातींमधून, एम्पलॉयी मॅन्यूअलमधून तुमची कथा इतरांपुढे आणा.

पहिलं ऐकून घ्या त्यानंतर तुम्ही जे बोलता त्यापेक्षा दुप्पट करून दाखवा - एक गोष्ट लक्षात घ्या की सर्व चांगले सुपरहिरोज कोणतीही कृती करण्यापूर्वी सर्वप्रथम समस्या शांतपणे ऐकतात. सर्वप्रथम समस्या नेमकी काय आहे, ते समजून घ्या. नाहीतर तुम्ही चुकीच्या व्यक्तीला वाचवाल.


महत्त्वाच्या गोष्टीचं महत्त्व कमी होऊ देऊ नका - जे काही महत्त्वाच आहे त्यावर लक्ष केंद्रीत करा. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला ठरवा की तुमचं प्रमुख लक्ष्य काय आहे. मिटींग्जच्या वेळी आणि संपूर्ण दिवसभर त्या गोष्टीवर स्वत:चे आणि तुमच्या आसपासच्या सहकाऱ्यांचे लक्ष केंद्रीत करा.

परिणाम ओळखा - बॅटमॅन आणि आयर्नमॅनकडे त्यांचे तंत्रज्ञान आहे आणि साधने आहेत आणि त्या माध्यमातून मिळणारे निष्कर्ष वा परिणाम  ते ओळखतात. तुमच्यासाठी रोखीचा म्हणजे पैश्याचा प्रवाह महत्त्वाचा आहे का? मग त्यासाठीही तुमच्याकडे अहवाल असायला हवा. निर्णय घेण्यासाठी तुम्ही मासिक आर्थिक नोंदींचा वापर करता का? नसाल करत तर तो तुम्ही सूरु केला पाहिजे.

सर्वोत्तम निष्कर्ष मिळेपर्यंत थांबू नका - आयर्नमॅन सर्वोत्तम सूट निर्माण करतो. बॅटमॅन सर्वोत्तम मेन्शन निर्माण करतो. सर्वच व्यावसायिक सुपरहिरो हे सातत्याने शिकत असतात आणि स्वत: विकसित होत असतात. तुमच्या टीमला (सहकारी) विसरू नका. त्यांना देखील हे सर्व शिकण्याची गरज आहे.

तुमच्या सहकाऱ्यांशी आणि ग्राहकांशी जवळचे संबंध प्रस्थापित करा - तुमच्या विरोधकांना (स्पर्धा) नीट ओळखा! जेव्हा विरोधकाने ग्राहकांची सेवा ताब्यात घेतलेली असते तेव्हा ग्राहक हे पिडीत असतात, यांना मदतीची गरज असते. तुम्हाला ज्यांना वाचवायचे आहे त्यांच्यासोबत अगदी जवळचे संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात करा. सोबतच याची देखील खात्री करून घ्या की तुमचे सहकारी आनंदी आहेत आणि त्यांना तुमच्या टीममध्येच राहायचे आहे.

एका लीडरपेक्षा जास्त काहीतरी करा आणि मग काही काळाने जग तुम्हाला व्यावसायिक सुपरहिरो म्हणून ओळखायला लागेल जे तुम्ही खरोखर आहात. पुढच्या वेळेस जेव्हा एखादा निर्णय घेण्याचा प्रसंग येईल तेव्हा स्वत:ला विचारा की, अशाप्रसंगी तुमच्या आवडत्या सुपरहिरोने काय केले असते. आणि लवकरच तुम्ही स्वत:मधील सुपरमॅन सोबत तुमच्या व्यवसायाविषयी बोलू लागला की “अप अप अँड अवे”.