उद्योजकांकडील अशी गोष्ट 'जी' त्यांना सामान्य माणसांपासून वेगळी ठरवते!

उद्योजकांकडील अशी गोष्ट 'जी' त्यांना सामान्य माणसांपासून वेगळी ठरवते!

उद्योजक होणे, हे अनेकांचे स्वप्न असते आणि सध्या नऊ ते पाच या जॉबच्या संकल्पनेत अडकलेल्या लोकांसाठी उद्योजक बनण्याचे स्वप्न अधिकच असते; परंतु खरा उद्योजक कसा असावा, त्याचे चारित्र्य कसे कसे असावे, त्याचे बोलणे कसे असावे, त्याची विचार करण्याची पद्धत कशी असते. हे अनेकांना माहीत नसते. म्हणूनच आजच्या ब्लॉगमध्ये आपण माहिती घेऊयात उद्योजकांकडील काही गोष्टी ज्या त्यांना सामान्य माणसांपासून वेगळ्या ठरवतात.

उद्योजकांना दुस-यांकडे करणे काम करणे ही संकल्पनाच आवडत नाही... सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दुस-या कोणाकडे काम करणे किंवा दुस-याच्या हाताखाली काम करणे, ही संकल्पनाच उद्योजकांना आवडत नाही. म्हणून कोणाकडे नोकरी करण्यापेक्षा ते दुस-याला नोकरी देणे पसंत करतात.


स्वतःला सिद्ध करायचे असते... उद्योजकांना स्वतःला सिद्ध करायचे असते. कोणला आपली कुशाग्रता सिद्ध करायची असते, कोणाला आपले बिझनेस गोल्स अचिव्ह करायचा असतो, कोणाला नोकरीतून साधारण पैसे कमाविण्यापेक्षा बिझनेस करून श्रीमंत व्हायचे असते... एकूणच काय बिझनेसमन स्वतःला सिद्ध करायचे असते, म्हणूनच तो उद्योजकतेकडे वळतो.

उद्योजक गोष्टी सत्यात घडवण्याचे सामर्थ्य बाळगतात... Entrepreneurs make things happen. उद्योजक हे फार आक्रामक असतात. केलेला विचार किंवा ठेवलेले ध्येय त्यांना सत्यात उतरविण्यात आवडते आणि ते त्याच्यासाठी पुरेपूर कष्ट करतात. आपल्या टीमला मोटिव्हेट, गाईड करतात, प्रसंगी त्यांच्यावर रागवतात परंतु ते केलेला विचार सत्यात उतरविण्यासाठी वाट्टेल ते करतात.


उद्योजकांचे नेटवर्किंग जाळे मोठे असते... Entrepreneurs means network, network, network. उद्योजकांना माहीत असते की, बिझनेसमध्ये नेटवर्किंग किती महत्त्वाचे आहे. म्हणून कोणत्याही उद्योजकांचे नेटवर्किंग जाळे चांगलेच असते. अनेक उद्योजक पैशांवर नाहीतर फक्त नेटवर्कवर अनेक कामं करून घेतात.


उद्योजक योग्य संधी हुडकून काढतात... जीवनात पुढे जाण्यासाठी चांगल्या संधीवर झडप घाला, असे म्हणतात. उद्योजकांचे वेगळे असते, बिझनेसमन योग्य संधी निर्माण करतात आणि त्यातून बिझनेस मोठा करतात. म्हणूनच उद्योजक सामान्यांपासून वेगळे ठरतात.


उद्योजक अपयशाला घाबरत नाही... मोठा उद्योजक असो किंवा लहान उद्योजक, तो अपयशाला घाबरत नाही. अपयश आले तरीही उद्योजक नव्या उमेदीने पुन्हा बिझनेस सुरू करतात. उदा. टाटा ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची ड्रीम कार टाटा नॅनोचा प्रस्तावित प्रकल्प पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे होणार होता; परंतु सरकारसोबतशी बोलणी बिघडल्याने हा प्लॅन्ट त्यांना बंद करावा लागला; परंतु रतन टाटा यांनी प. बंगालमध्ये बंद पडलेला प्लॅन्ट गुजरातमध्ये यशस्वी केला आणि नॅनो कार बाजारात आणली.