World’s Most Innovative Companies यादीमध्ये भारतातील दोन कंपन्यांची बाजी!

World’s Most Innovative Companies यादीमध्ये भारतातील दोन कंपन्यांची बाजी!

२०१८ सालच्या World’s Most Innovative Companies म्हणजेच जगातील सर्वात अभिनव कंपन्यांची यादी ‘फास्ट कंपनी’ या बिझनेस मीडिया ब्रॅन्डने तयार केली आहे. ३६ वेगवेगळ्या श्रेणींमधील ३५० कंपन्यांमधून या ५० कंपन्या जगातील सर्वात अभिनव कंपन्या म्हणून निवडल्या गेल्या आहेत. या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या यादीमध्ये दोन भारतीय कंपन्यांनी बाजी मारली आहे. या दोन कंपन्यांची या यादीत एंट्री म्हणजे आपणासर्वांसाठी भूषणावह बाब आहे. आपणही अमेरिका, चीनसारख्या विकसीत देशांशी स्पर्धा करू शकतो, हा संदेश याद्वारे जातो तसेच आपणास सर्वोत्तम काम करण्याचा आत्मविश्वासही या दोन कंपन्यांकडून मिळतो. तर पाहू यात जगातील सर्वात अभिनव कंपन्यांमधील दोन भारतीय कंपन्या कोणत्या आहेत.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

कोणत्या आहेत पहिल्या पाच कंपन्या… World’s Most Innovative Companies या यादीमध्ये सर्वात पहिली कंपनीचा सन्मान ‘अॅपल’ला गेला आहे. भविष्यातील तंत्रज्ञान वर्तमानकाळात उपलब्ध करून दिल्यामुळे या कंपनीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. टीव्हीवरील कार्यक्रम आणि सिनेमे मोबाईलवर आणून नवा प्रेक्षकवर्ग तयार करणा-या ‘नेटफ्लिक्स’ या कंपनीने दुसरा क्रमांक पटकावला.

Click here to watch latest motivational videos 

तिसरा क्रमांक बॅंकिंग सेक्टरला नव्या स्तरावर घेऊन जाण्या-या ‘स्क्वेअर’ या कंपनीने पटकावला तर ‘टेंसेंट’ ही कॉन्टेंटमध्ये काम करणारी कंपनी चौथा क्रमांकावर आहे. पुस्तकापासून ते सर्व वस्तू ऑनलाईन विकणा-या ‘अमेझॉन’ कंपनीने या यादीत पाचवा क्रमांक पटकवला आहे.

या यादीतील दोन भारतीय कंपन्या… २०१८ मधील सर्वात अभिनव कंपन्यांच्या यादीत १७व्या क्रमांकावर भारतीय कंपनी ‘रिलायन्स जिओ’चा क्रमांक येतो. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओने काही वर्षात कोट्यवधी भारतीयांना फ्री इंटरनेटचे वेड लावले आणि देशातील सर्वात उलाढाल असणारी कंपनी म्हणून नावारुपाला आली.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

या यादीतील दुसरी भारतीय कंपनीचे नाव म्हणजेच ‘पेटीएम’. ही कंपनी या यादीत ३१व्या स्थानावर आहे. विदेशी गुंतवणूक असलेल्या ‘पेटीएम’ने काही महिन्यातच भारतीयांना कॅशलेस व्यवहाराकडे वळवले तसेच या कंपनीला नोटाबंदीचाही फायदा झाला होता. म्हणूनच या कंपनीची निवड एक अभिनव कंपनी म्हणून करण्यात आली आहे.

दरम्यान, ‘फास्ट कंपनी’ या बिझनेस मीडिया हाऊसचे संपादक, रिपोर्टर्स आणि प्रतिनिधीनी एका सर्वेक्षणातून ही यादी तयार केली असून ३६ वेगवेगळ्या श्रेणींमधील ३५० कंपन्यांमधून या ५० कंपन्यांची जगातील सर्वात अभिनव कंपन्या म्हणून निवड केली गेली आहे.

To register for upcoming seminar click here