सांगलीतील कैलाश काटकर आहेत 2,000 कोटींच्या Quick Heal कंपनीचे मालक…

सांगलीतील कैलाश काटकर आहेत 2,000 कोटींच्या Quick Heal कंपनीचे मालक…

Quick Heal या अॅन्टी व्हायरसशिवाय आपला कम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टफोन्स या गॅजेट्सची सुरक्षा म्हणजे मिथकच आहे. ट्रॉजन आणि त्याहून मोठमोठे व्हायरस ‘हील’ करण्यासाठी Quick Heal या सॉफ्टवेअरचे निर्माण केले पुढे याच नावाचे मोठ्या कंपनीत रुपांतर झाले; परंतु अनेकांना माहीत नाही की, Quick Heal टेक्नॉलॉजीझ लिमिटेड या कंपनीचा निर्माणकर्ता हा मराठी माणूस आहे. कैलास आणि संजय या काटकर बंधूंनी साकारलेल्या मराठमोळ्या कंपनीची माहिती घेऊयात

सुरुवात… सातारा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात या भावांचा जन्म झाला. पैसे कमाविण्याच्या दृष्टीने काटकर कुटुंबियांनी पुणे हे शहर गाठले. दरम्यान, कैलाश काटकर यांचे वडिल फिलिप्स या कंपनीत मशीन सेटर म्हणून कार्यरत होते म्हणूनच दोन्ही भावांना लहानपणापासूनच मशीन्सचे वेड होते. मशीन काय असते, ती कशी तयार होते, मशीन बंद पडल्यावर ती रिपेअर कशी करायची क्लिष्ट कामांमध्ये कैलाश आणि संजय हे भाऊ रस घ्यायला लागले. पुढे कैलास यांनी दहावीत शिक्षण सोडून मशीन्स रिपेअर करण्याचे सुरू केले. कॅलक्युलेटर्स आणि छोट-मोठ्या मशीन्स दूरुस्त करण्याचे कैलास यांना महिन्याचे 400 रुपये मिळू लागले.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

संगणकच भविष्य आहे… कैलाश काटकर सांगतात की, ”मी लहानपणापासून बाबांना अनेक मशीन्स दुरुस्त करताना पाहिले आहे आणि मशीन्सशी खेळण्याचे व दुरुस्त करण्याचे वेड मला तेव्हापासूनच लागले. रेडिओ, टेप रेकॉर्डर यासारखी अनेक यंत्रे मी सहजरित्या दुरुस्त करायचो.” एकदा असेच ते बॅंकेतील कॅलक्युलेटर्स दुरुस्त करायला गेलो होतो. तेव्हा बॅंकेतप्रथमच टीव्हीसमान दिसणारे यंत्र पाहिले; परंतु कर्मचारी त्या यंत्रावर काम करीत होती. तेव्हा कैलाश यांनी माहिती काढली तर ते संगणक आहे, असे कळाले. हे यंत्र दहा माणसाची कामे एकट्याने करू शकते आणि हेच आपले भविष्य असणार असल्याची खूणगाठ त्यांनी बांधली. काही महिन्यांनी कैलाश संगणक दुरुस्ती करण्यास सुरुवात केली.

Click here to watch latest motivational videos 

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा मेळ… कैलास यांनी पूर्णपणे स्वतःला हार्डवेअर दुरुस्तीमध्ये गुंतवून घेतले होते. याचदरम्यान त्यांनी संगणकाविषयी ही पुस्तके वाचून काढली. जेथून संगणकाचे ज्ञान मिळे तेथे ते जात. दरम्यान कैलाश यांनी काही वर्षात चांगली सेव्हिंग केली होती. याच पैशांतून त्यांनी आपले पहिले संगणक 50 हजार रुपयांना घेतले. त्यावर अनेक प्रयोग करू लागले. कैलाश यांचा छोटा भाऊ संजयलाही वडिल आणि भावाप्रमाणे हार्डवेअरमध्ये करियर करायचे होते; परंतु कैलाश यांनी दूरदृष्टी ठेऊन त्यांना सॉफ्टवेअर शिकण्याचा सल्ला दिला आणि भावाने आणलेल्या संगणकात सॉफ्टवेअर डेव्हलप करू लागले.

संजय सांगतात की, “संगणक व्हायरस फ्री ठेवणे हे मला आधीपासून आवडते. सर्वप्रथम मी स्वतः डॉसप्रणालीने संगणकातील व्हायरस काढायचो. त्यानंतर कॉलेजमध्ये शिकता-शिकताच संगणकातील व्हायरस काढण्याचा प्रोग्रॅम मी लिहून काढाला आणि तेव्हा प्रथम संगणक व्हायरस फ्री ठेवण्याचे सॉफ्टवेअरचे निर्माण करण्यात यश आले”

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड बनवण्यासाठी Quick Heal नाव ठेवले… अॅन्टी व्हायरस सॉफ्टवेअर तयार केल्यावर पुढील काही वर्षे काटकर बंधूंनी त्याच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर केली. अॅन्टी व्हायरस सॉफ्टवेअरचे नवे व्हर्जन्सवर संजय यांनी फोकस ठेवला तर कैलास यांनी आपले प्रॉडक्ट बाजारात कसे विकले जाईल यावर आपले लक्षकेंद्रित केले. दरम्यान, या अॅन्टी व्हायरस सॉफ्टवेअरला एक संस्कृत नाव असावे असा आग्रह संजय यांचा होता; परंतु कैलाश यांनी आपला ब्रॅन्ड आंतरराष्ट्रीय बाजारात ओळखला जावा म्हणून कैलास यांनी अॅन्टी व्हायरस सॉफ्टवेअरला Quick Heal असे नाव ठेवले. 1995 साली काटकर बंधूंच्या कॅट कॉम्प्यूटर सर्व्हिसेसने Quick Heal अँटीव्हायरस बाजारात अधिकृतपणे लॉन्च केला. कंपनीने कमी वेळात मोठे यश मिळवले आणि 2007 साली कैलाश आणि संजय आणि आपल्या कंपनीचे क्विक हिल टेक्नॉलॉजीस प्रा. लि. असे नामकरण केले.

To register for upcoming seminar click here 

Quick Heal एवढ्यावर थांबली नसून भारतातील लघू कार्यालय श्रेणीमध्ये कंपनीच्या प्रॉडक्ट्सचा मार्केट शेअर 30 टक्क्यांहून अधिक आहे. तर ही कंपनी सिमेंटेक, नॉर्टन, मॅकॅफी, कास्पेरेस्की यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देत आहेत. कंपनीतील 1,500 कुशल कर्मचारी नवनवीन प्रोडक्ट्स तयार करण्यावर भर देतात. अशाप्रकारे दोन मराठी भावांनी स्क्रॅचमधून फक्त आपल्या बुद्धी, प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनतीच्या जोरावर आपली कंपनी स्थापन केली आणि अॅन्टी व्हायरस सॉफ्टवेअर क्षेत्रात आपले नाव कमविले आहे. मराठी बिझनेसमनसाठी काटकर बंधूची कथा नक्कीच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल.