कालनिर्णय iPad मे नहीं है… मोदीजी नाराज है! Kalnirnay ची सक्केस स्टोरी…

कालनिर्णय iPad मे नहीं है… मोदीजी नाराज है! Kalnirnay ची सक्केस स्टोरी…

मराठी माणसाचा जबरदस्त बिझनेस… ज्योतिषशास्त्रज्ञ जयंतराव साळगावकर यांनी 1973 साली Kalnirnay हे पंचांगरुपी कॅलेंडर सुरू केले. तेव्हाच्या काळात सर्वाधिक कॅलेंडर वापरले जात नव्हते… तसेच पंचाग आणि तिथी संस्कृत भाषेत असल्याने अनेकांना कळण्यास कठीण जात होते. हीच गरज ओळखून ज्योतिषशास्त्रज्ञ जयंतराव साळगावकर यांनी Kalnirnay ची सुरुवात केली. कालनिर्णय कॅलेंडर आपल्याला मुहूर्त, जन्म पत्रिका, कुंडली जुळणी आणि भविष्य अशी माहितीची सेवा पुरवतो. तर Kalnirnay कॅलेंडर मराठीसहीत इंग्रजी, हिंदी, गुजराती, तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि पंजाबी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.

कालनिर्णयचे प्रोडक्ट्स… कालनिर्णयने फक्त कॅलेंडरवर फोकस न ठेवता आपले अनेक प्रोडक्ट्स बाजारात आणले आहेत. कालनिर्णय ‘स्वादिष्ट’ आणि ‘आरोग्य’ या विषयावर स्पेशल एडिशन्स निघतात. तसेच पंचांग पत्रिका आणि पुस्तकही कालनिर्णय आपल्या सुमंगल पब्लिकेशन्सद्वारे छापतात.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

फुकटच्या वस्तूसाठी पैसे कोण मोजणार… जयंतराव साळगावकर यांनी जेव्हा कालनिर्णयचा बिझनेस सुरू केला तेव्हा अनेकांना त्यांना वेड्यात काढले. कॅलेंडर, पचांग या छोट्या गोष्टींसाठी कोण पैसे मोजेल का? कसा चालणार तुझा बिझनेस, असे अनेक लोकं जयंतरावांना म्हणायचे; परंतु, जयंतराव यांना आपल्या बिझनेस मॉड्यूलवर विश्वास होता. ते मार्केटमध्ये चालणारच याची त्यांना गॅरंटी होती.

Click here to watch latest motivational videos 

ग्राहक केंद्रस्थानी… जयंतराव साळगावकर यांच्यानंतर कॅलेंडर आणि पंचांगचा बिझनेस त्यांचे सुपुत्र जयराज साळगावकर हा पुढे नेत आहेत. “आम्ही युझर्सच्या म्हणण्याप्रमाणे आमचे प्रोडक्ट्स बनवले आहे तसेच ग्राहक आमच्यासाठी नेहमीच केंद्रस्थानी राहिल्याचे,” जयराज आत्मविश्वासाने सांगतात.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

मोदीजी नाराज हैं… एकदा जयराज यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पीएचा फोन आला. तो त्यांना म्हणाला “कालनिर्णय iPad मे नहीं है… मोदीजी नाराज है!” त्यानंतर तीन दिवसात त्यांनी कालनिर्णय अॅप बनवला आणि लॉन्च केला. अशाप्रकारे कालनिर्णयने आपला ग्राहकवर्ग दूरवर पसरवला आहे.

To register for upcoming seminar click here 

कालनिर्णयचा खप… वर्तमानपत्र किंवा मॅग्झिनचे यश त्यांच्या खपावर आधारलेले असते. जेवढे जास्त खप तेवढे जास्त ते वर्तमानपत्र किंवा मॅग्झिनचा बिझनेस अधिक होतो. कॅलेंडर व्यवसायही सारखाच. कालनिर्णय कॅलेंडर मराठी, इंग्रजीसहीत 9 प्रादेशिक भाषेत प्रसिद्ध होते. या कॅलेंडरचा वर्षाचा खप 19 मिलियन कॉपीज इतका आहे तर रेव्हेन्यू 550 मिलियन एवढा आहे.