Jeff Bezos यांच्याकडून शिका तुमची पुढील बिझनेस आयडिया…

Jeff Bezos यांच्याकडून शिका तुमची पुढील बिझनेस आयडिया…

Jeff Bezos हे नाव आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल; परंतु, आपल्याला अमेझॉन या जगविख्यात शॉपिंग वेबसाईटबद्दल माहित असेल. Jeff Bezos हा अमेझॉन कंपनीचा संस्थापक आहे. साधा कर्मचारी असलेला Jeff Bezos च्या अमेझॉनचे मार्केट कॅपिटल 427 बिलीयन डॉलर आहे. हे त्याने कसे साध्य केले पाहुयात पुढे….

सुरुवात… Jeff Bezos ने 1994 साली अमेरिकेत पुस्तक ऑनलाईन विकण्यासाठी अमेझॉन या वेबसाईटचे सुरुवात केली. या वेबसाईट अंतर्गत अमेरिकन नागरिकांनी विविध जॉनरची पुस्तके घरबसल्या विकत घेण्यास सुरुवात केली. 2000 साली अमेझॉनने आपला लोगो लोकांसमोर आणला. हा लोगो दर्शवतो की, अमेझॉन कंपनी तुमच्या गरजेनूसार ‘ए टू झेड’ सामानाची डिलेव्हरी घरपोच देते. काही वर्षानंतर अमेझॉनने गाणी, सिनेमे, किचनमधील सामान तसेच ब्रॅंडेड कपडे वेबसाईटवर विकण्यास सुरुवात केली. मुख्य म्हणजे मनुष्याला लागणारे सर्व प्रोडक्ट्स कंपनीने वेबसाईटवर विकण्यास सुरुवात केले.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

बिझनेसमध्ये ‘व्हिजन’ का महत्त्वाचे आहे… आपल्या जीवनात व्हिजन हवे आणि ते मोठे असावे. Jeff Bezos अमेझॉन सुरु करण्यामागे मोठे व्हिजन होते. जेफला माहित होते इंटरनेट हेच भविष्य आहे. तेव्हा इंटरनेट दर महिन्याला 2,300 टक्क्यांनी वाढत होते. जेफने इंटरनेटवर व्यवसाय करण्याचे व्हिजन आणि मिशन ठेवले आणि अमेझॉनचा विस्तार करण्यास सुरुवात केली. आपल्या कंपनीत तंत्रज्ञानासहीत नवीन उपक्रम राबविण्यावर भर दिला. आज अमेझॉनमध्ये जगभरात पाच लाखांहून अधिक कुशल कर्मचारी कार्यरत आहेत.

Click here to watch latest motivational videos 

तंत्रज्ञान आणि नवे उपक्रम… जेफने 2004 साली स्पेसफ्लाईटसाठी नवीन तंत्रज्ञान विकसीत करणारी ‘Blue Origin’ ही एरोस्पेस कंपनी स्थापन केली. 2015 साली Blue Origin ची रॉकेट चाचणी यशस्वी झाली आणि जेफचे नाव आणखीण मोठे झाले.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

नवी सुविधा… अमेझॉन सोबतच Jeff Bezos ने अमेझॉन प्राईम, किंडल आणि अमेझॉन अलेक्सा या सुविधा तयार केल्या त्यांचा ग्राहकांनी पुरेपूर फायदा घेतला.जेफच्या मते एकाच प्रकारचा बिझनेस करणे धोक्याचे आहे. तो बिझनेस बंद पडला तर तुमच्या हातात काहीच नसेल. म्हणूनच बिझनेसमध्ये Diversification is important असे म्हणतात. Jeff Bezos च्या बिझनेस तत्त्वांमुळेच तो फोर्ब्स या बिझनेस मासिकात Richest Person In The World ठरला. 2017 मधील जेफ बेझॉझची नेटवर्थ 95.7 बिलीयन डॉलर इतकी होती. त्याने बिल गेट्स, मार्क झकरबर्ग आणि वॉरेन बफेट या बिझनेसमन्सना मागे टाकले. जर तुम्ही जेफच्या कारभाराबद्दल विचार केलात तर तुम्हाला समजेल तो एका बिझनेस मोड्युलवर थांबला नाही. तो नवे पर्याय विकसीत करीत गेला. मराठी उद्योजकांनीही बिझनेसमध्ये अनेक पर्याय शोधावेत. 

To register for upcoming seminar click here