Amrut Dhanadal किंमत 50 पैसे पण परंपरा 50 वर्षांची…

Amrut Dhanadal किंमत 50 पैसे पण परंपरा 50 वर्षांची…

सुरुवात… गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणा-या नटवरलाल भगत यांनी भगत धनाडाळ इंडस्ट्रीजची स्थापना केली होती. भगत धनाडाळ इंडस्ट्रीजअंतर्गत AMRUT DHANADAL हा ब्रॅंड विकसित करण्यात आला. साधारण 50 वर्षांहून अधिक हा ब्रॅंड भारतीय मार्केटमध्ये आहे.

भगत धनाडाळ इंडस्ट्रीजचे प्रोडक्ट्स… भगत धनाडाळने काही प्रोडक्ट्स बाजारात आणले. त्यात मुख्य म्हणजे AMRUT DHANADALहे पहिले उत्पादन होते. सोबत मुखवास आणि तीळ रोल हे प्रोडक्टही कंपनीने बाजारात आणले आहेत.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

धनाडाळीचे महत्त्व धनाडाळ ही आपल्या आरोग्यास उपयुक्त आहे. धनाडाळीमुळे आपली पचनसंस्था सुधारते. जेवनानंतर मुखवास म्हणून धनाडाळीचे सेवन भारतात प्राचीन काळापासून चालत आले आहे.

Click here to watch latest motivational videos 

स्पर्धक नाही नटवरलाल भगत यांना मुखवास संबंधित प्रोडक्ट तयार करायचे होते. धनाडाळ उत्पादन करणारा कोणताही स्पर्धक नसल्याचे त्यांनी हेरले आणि भगत धनाडाळ इंडस्ट्रीजअंतर्गत AMRUT DHANADAL हे प्रोडक्ट बाजारात आणले. तसेच भगत धनाडाळ इंडस्ट्रीजने धनाडाळचे किंमत 50 पैसे ठेवली. किंमत कमी ठेवून त्यांनी हे प्रोडक्ट सर्व स्तरातील लोकांसाठी खुले केले. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीने एकदाही त्याची किंमत वाढवली नाही.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

स्पर्धक नसल्याने मोनोपॉली बाजारात AMRUT DHANADAL चा कोणीही स्पर्धक नसल्याने त्यांची मोनोपॉली निर्माण झाली. मध्यंतरी काही कंपन्यांनी धनाडाळचे नवे प्रोडक्ट तयार केले; परंतु वितरण चैनमुळे त्यांचे प्रोडक्ट अमृतसमोर टिकू शकले नाही. मराठी उद्योजकांनो आपले प्रोडक्ट कोणतेही असो आपण त्यावर विश्वास ठेवला पाहिजे. गेल्या 50 वर्षात छोट-मोठ्या कंपन्या आणि प्रोडक्ट्स येऊन गेल्या. AMRUT DHANADAL ला कोणीही हलवू शकलं नाही.

To register for upcoming seminar click here