काही Ads ज्यांनी बदलला भारतीय जाहिरातींचा चेहरा

काही Ads ज्यांनी बदलला भारतीय जाहिरातींचा चेहरा

बिझनेसमध्ये जाहिरात म्हणजेच Ads सर्वाधिक महत्त्वाची आहे. अनेकांना वाटते की, आपला व्यवसायाची किंवा आपल्या उत्पादन किंवा सेवेची जाहिरात व्यवसाय सुरळीत झाल्यावर करावी; परंतु  तुम्ही व्यवसायाची जाहिरातच केली नाही तर तुमच्या बिझनेसची किंवा उत्पादन आणि सेवेची माहिती कोणास होईल. म्हणून व्यवसायात जाहिरात अत्यंत महत्त्वाची आहे. “A notice or announcement in a public medium promoting a product, service, or event,” अशी जाहिरातीची डेफिनेशन जाहिरात पंडितांनी करुन ठेवली आहे. मराठीत सांगायचे झाल्यास एखादे उत्पादन, सेवा किंवा इव्हेंट लोकांसमोर मांडण्यासाठी जाहिरातींचा वापर केला जातो. आता पाहुयात काही Ads ज्यांनी भारतीय जाहिरातींचा चेहरा बदलला…

वाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय

  • एरिअलची ‘शेअर दी लोड’ – डिटर्जंट पावडर बनवणारी एरिअल या कंपनीने काही दिवसांपूर्वी ‘शेअर दी लोड’ ही जाहिरात प्रदर्शित केली होती. भारतासहीत युरोप, लॅटिन अमेरिका, पूर्व, दक्षिणपूर्व आणि दक्षिण आशिया, दक्षिण आणि उत्तर आफ्रिका येथे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. कपडे धुणे हे महिलांचे काम असल्याचे पूर्वापारपासून आपल्या मनावर बिंबवले आहे. हीच प्रथा खोडून काढण्याचा प्रयत्न एरिअलने ‘शेअर दी लोड’द्वारे केला आहे.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

  • अर्बन क्लॅप – जागतिक पुरुष दिनाच्या निमित्त अर्बन क्लॅपने नवी जाहिरात प्रदर्शित केली होती. या जाहिरातीत चार महिला दाखविण्यात आल्या होत्या. त्या महिला पुरुषी काम म्हणजे ट्रकचा टायर बदलणे, जिम इंस्ट्रक्टर आणि बस चालक अशी कामे करतात. आजच्या महिला पुरुषाच्या बरोबरीने चालत असल्याचे या जाहिरांतीद्वारे दाखविण्यात आले. या जाहिरातीने पुरुष दिनी महिलांचा सन्मान केला.

Click here to watch latest motivational videos 

  • जबॉन्गची ‘बी यू’ – जबॉन्ग या ऑनलाईन शॉपिंग ई-कॉमर्स पोर्टलने ‘बी यू’ ही जाहिरात बाजारात आणली. उत्तम कपडे घाला स्वतःनुसार जगा, असा यात संदेश देण्यात आला होता. पुढे ‘बी यू’ हीच जबॉन्गची टॅगलाईन ठरली.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

  • सॅमसंग ‘बेह चला’ – सॅमसंग आणि ऍपल कंपनी स्मार्टफोन बाजारात एकमेकांना टक्कर देत असते; परंतु सॅमसंगने त्याच्या जाहिरातने भारतीयांवर घर केले आहे. संगीतकार मोहित चोहानने या ऍडसाठी गाणे गायले आहे. सॅमसंगची सेवा तुम्हाला दुर्मिळ प्रदेशात मिळू शकते, हे यातून सांगायचे आहे.

To register for upcoming seminar click here 

  • डव इंडिया ‘लेट्स ब्रेक दी रुल्स ऑफ ब्युटी’- डव इंडिया ही कंपनी उत्तम आणि उच्च दर्जाच्या साबणांसाठी प्रसिद्ध आहे. सुंदर दिसणे हे फक्त रंगावर अवलंबून नाही, यासाठी कंपनीने ‘लेट्स ब्रेक दी रुल्स ऑफ ब्युटी’ ही ऍड प्रदर्शित केली. या जाहिरात कॅम्पेनला देशभरात उत्तम प्रतिसाद लाभला. सर्व वयोगटातील महिलांना ही जाहिरात भावली.