मुंबईतील बिल्डींग्सला टाऊनशिपचा आकार देणारे Niranjan Hiranandani

मुंबईतील बिल्डींग्सला टाऊनशिपचा आकार देणारे Niranjan Hiranandani

Niranjan Hiranandani यांच्याकडे आपण प्रसिद्ध रियल इस्टेट डेव्हलपर म्हणून पाहतो. मुंबईतील पवईत एक मोठं टाऊनशिप उभारण्याचे काम त्यांनी केले. आणि आजचे सारे डेव्हलपर हिरानंदानी यांचा टाऊनशिपचा यशस्वी कित्ता राबवित आहेत. परंतु, मुंबईकरांना टाऊनशिपची ओळख करुन देणारा हिरानंदानी ग्रुप या सर्वामध्ये उजवा ठरतो. म्हणून आज आपण Niranjan Hiranandani आणि हिरानंदानी ग्रुप यांच्या बिझनेसबद्दल माहिती घेऊयात.

वाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय 

१९८९ साली पवईतील हिरानंदानी हा उच्चभू प्रकल्प पूर्ण झाला. त्यात Niranjan Hiranandani आणि त्यांचे बंधू सुरेंद्र हिरानंदानी यांचा मोठा वाटा. आयआयटी मुंबई, मोठ-मोठ्या आयटी आणि कॉमर्स कंपन्या आणि मुंबईच्या पश्चिम उपनगरांना जोडणारी जागा म्हणून पवई सर्वात पहिलेच फेमस होते. दरम्यान, अशा मोक्याच्या स्थळी हिरानंदानी ग्रुपने २५० एकर जागा घेतली होती. आणि हिरानंदानी गार्डन्स नावाने डेव्हलप केली.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

या अंतर्गत हिरानंदानी यांनी दर्जेदार निवासी इमारती, कार्यालयीन इमारती, हॉस्पिटल, शाळा, उद्याने, समुदाय केंद्र, क्रीडा क्लब, बँका, शॉपिंग मॉल्स, चित्रपट स्टुडिओ, बस गॅरेज, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब आणि जलतरण तलाव यांची उत्तम बांधणी केली. एकूण येथे 42 निवासी इमारती आणि 23 कर्मशिअल्स इमारती येथे आहेत.

Click here to watch latest motivational videos 

दरम्यान, हिरानंदानी ग्रुपचे यश आपल्याला त्यांच्या कामातून दिसते. त्यामागे आई-वडिलांचे उत्तम संस्कारही दिसतात. निरंजन आणि सुरेंद्र यांचे वडिल लखुमल हिरानंदानी ख्यातनाम सर्जन म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारने त्यांचा पद्म भूषण देऊन गौरव केला. वडिलांचा आदर्श समोर असताना निरंजन यांनी कॉमर्सचे शिक्षण पूर्ण केले. तसेच त्यांनी चार्टर्ड अकाऊंटचे शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान आपला छोटा भाऊ सुरेंद्रसहीत हिरानंदानी ग्रुपची निर्मिती केली. आणि मुंबईतील पवई, ठाणे वाशी येथे मोठं-मोठे प्रकल्प निर्माण केले.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

आज Niranjan Hiranandani हिरानंदानी ग्रुपचे सहसंस्थापक आणि एमडी आहेत. त्यांचे भाऊ सुरेंद्रही त्यांना उत्त्म साथ देत आहेत. भारतीय बिझनेसमध्ये मोलाचे कार्य केल्यामुळे त्यांचे नाव भारतातील मोठ्या उद्योगपतींमध्ये घेतले जाते. तसेच ते फोर्ब्सच्या जागतिक अब्जाधिश या यादीतही झळकले होते. हिरानंदानी ग्रुपने हिरानंदानी हॉस्पिटलही सुरु केले. त्यांचे पवई आणि ठाणे येथे हॉस्पिटल्स अनेक रुग्णांची सेवा करीत आहेत. घरी डॉक्टरकीचे बाळकडू मिळूनही हिरानंदानी पुत्रांनी स्वतःला  रियल इस्टेट डेव्हलपर म्हणून जगासमोर आणले, ही खरचं आपल्यासाठी प्रेरणादायी बाब आहे.

To register for upcoming seminar click here