लिटल मास्टर Sunil Gavaskar यांच्यासोबत भेट…

लिटल मास्टर Sunil Gavaskar यांच्यासोबत भेट…

1970-80 चा साल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे धिप्पाड वेगवान गोलंदाज आग ओकत होते. त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड बलाढ्य संघांनी नांगी टाकली होती. तेव्हाच्या भारतीय संघात विंडीजच्या वेगवान गोलंदाजांना तोंड देण्याचे धारिष्ट मुंबईकर Sunil Gavaskar यांनी दाखवले. हेल्मेट किंवा कोणतेही बचावाचे साधन नसताना लिटल मास्टर सुनील यांनी 125 कसोटीत 10 हजाराहून अधिक धावा केल्या. सध्या नागपूर येथे भारत वि. श्रीलंका कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या समालोचनासाठी सुनीलजी नागपूर येथे होते. तेव्हा त्यांना भेटण्याचा योग आला. या भेटीबद्दल थोडसं #SnehalNitiच्या फॉलोवर्ससाठी…

वाढवा तुमचा बिझनेस तुमच्याशिवाय 

मराठी उद्योजकांसाठी बिझनेस ट्रेनिंग सुरु केल्यापासून अनेक नामी आणि ज्येष्ठ मंडळींना भेटण्याचा योग आला. परंतु, Sunil Gavaskar यांची भेट आकस्मिक आणि संस्मरणीय राहील. कसोटी सामन्याच्या दिवसाचा खेळ संपला आणि मीही माझे बिझनेस सेशन पूर्ण केले होते. तेवढ्यात रॅडिसन ब्ल्यू हॉटेलच्या लॉबीमध्ये सुनीलजी दिसले. सा-यांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या. तेवढ्यात थोडावेळ बोलू शकतो का, असे विचारले. त्यांनीही व्हाय नॉट, अशी मान डोलावली. मग काय गप्पा सुरु झाल्या. क्रिकेटवरही बोलणे झाले.

Click here to watch latest motivational videos 

महत्त्वाचे म्हणजे त्यांनी ‘महाराष्ट्र बिझनेस ट्रेनिंग बोर्ड’अंतर्गत मराठी उद्योजकांना आणि तरुणांना मार्गदर्शन देणा-या बिझनेस कॉऊन्सिलींगचे कौतुक केले. तसेच ‘उद्योगनीती’मार्फत चालणारे सर्व बिझनेस सेमिनार आणि सेशन्सची माहिती दिली. “पूर्वी फक्त काम करणारा मराठी माणूस सध्या ब-यापैकी बिझनेसमध्ये दिसतो आहे. मराठी बिझनेसमन आणि मराठी माणसांची प्रगती होवो,” असे ते जाता जाता म्हणाले. अशाप्रकारे #SnehalNitiच्या वाटचालीस Sunil Gavaskar यांचे आशिर्वाद लाभले. ही भेट काही मिनिटांचीच पण लढण्याची नवी ऊर्जा देऊन गेली.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा