Air Ink वायू प्रदूषणातून रोज वापरातील शाईचे निर्माण!

Air Ink वायू प्रदूषणातून रोज वापरातील शाईचे निर्माण!

आजकाल कोण-कोणते बिझनेस नावारुपाला येतील याचा भरवसा नाही. सुचली कल्पना आला नवा बिझनेस उदयाला. गेल्या दोन-तीन वर्षातील जबरदस्त आणि भन्नाट कल्पनांमुळेच भारतात अनेक स्टार्टअप सुरु झाले. अनेक तरुणांसाठी नोकरीचा नवा पर्याय सुरु निर्माण झाला. आता आपण Air Ink या शाईच्या अनोख्या ब्रॅन्डबद्दल जाणून घेऊया जो वायू प्रदूषणातून शाईचे निर्माण करतो.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

होय, तुम्ही जे वाचलयं ते तंतोतंत बरोबर आहे. वायू प्रदूषणातून शाईचे निर्माण, कल्पनाच करवत नाही ना… पण हे घडले आहे. याचे सर्व श्रेय अनिरुद्ध शर्मा या तरुणास जाते. त्याच्या ध्यानी आले की, वायू प्रदूषणातून निघालेले धुलीकण कपड्यांवर तसेच चिटकून राहतात. या वायूला शाईमध्ये रुपांतर करुन आपण त्याचा उपयोग दैंनदिन वापरात करु शकतो.

Click here to watch latest motivational videos 

2013 साली या अभिनव कल्पनेवर संशोधन सुरु झाले. अनिरुद्ध शर्मा आणि त्याची टीम सलग तीन वर्ष या संशोधनावर कार्यरत होती. आणि संशोधन सफल झाले आणि ग्राविकी लॅब्स ही कंपनी उदयास आली. 2016 साली Air Ink हा ब्रॅन्ड निर्माण झाला. आणि 2017 मध्ये Air Ink ची वेगळवेगळी उत्पादन बाजारात दिसू लागली.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

कामाची पद्धत… ग्राविकी लॅब्सच्या संशोधकांनी ‘कालिंक’ नावाचे गाड्याच्या सायलेन्सरच्या आकाराचे यंत्र बनविले. बाईक, कार, ट्रक, क्रेन किंवा बोटीमध्ये सायलेन्सरच्या तोंडावर हे यंत्र बसवले जाते. यात गाड्यांमधून बाहेर पडणा-या कार्बन डाय ऑक्साईडचे धुलीकण साचले जातात. हे यंत्र विशिष्ट कालांतराने काढून यातील कार्बन अवशेषाचे रुपांतर रंगात किंवा शाईमध्ये केले जाते. सर्वप्रथम याचा प्रयोग बंगळुरू आणि हाँगकाँग येथे केला गेला आणि तो जबरदस्त यशस्वी झाला.

To register for upcoming seminar click here 

ग्राविकी लॅब्स कंपनीच्या मते, “कालिंक हे यंत्रामध्ये 45 मिनिटे धावलेली गाडी किमान 1 फ्लुईड औन्स इतकी Air Ink जमा होते.” या शाईचा वापर आपण पेनामध्ये, प्रिन्ट कार्टेजेस आणि रंग कामासाठी वापरण्यात येते, तेसुद्धा वाजवी दरात. टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ शाईची जबरदस्त कल्पना अनिरुद्ध शर्मा आणि त्याच्या टीमने केली आहे. आता ते आपल्या अभिनव संकल्पेला आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वाधिक खप कस होईल, यावर लक्ष देत आहे. खरचं, छोट्यातली छोटी कल्पना मोठे अभिनव काम करु शकते.