VIRUSHKA जोडीसाठी ‘मान्यवर’चे बजेट 80 कोटी रुपये…

VIRUSHKA जोडीसाठी ‘मान्यवर’चे बजेट 80 कोटी रुपये…

क्रिकेट आणि बॉलीवूडमधील पूर्वापारपासून चालत आलेले प्रेमाचे नाते सध्या भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा पुढे नेत आहेत. दोघांनी जरी आपल्या प्रेमाची औपचारिकरित्या कबूली दिलेली नसली तरी त्यांचे प्रेम लपून राहिले नाही. त्यांचे चाहते या दोघांना प्रेमाने ‘VIRUSHKA’ असे संबोधतात. क्रिकेटमध्ये यशाची शिखरे पादाक्रांत करणारा विराट आणि एकामागोमाग एक हिट सिनेमे देणारी अनुष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती म्हणजे ‘मान्यवर आणि मोहे’ या जाहीरातीच्या माध्यमातून…

अनेक वर्षांपासून ‘मान्यवर आणि मोहे’ या पारंपारिक कपड्यांचा व्यवसाय करीत आहे. कंपनीने विराट कोहलीला ब्रॅन्ड अम्बेसेडर बनविले आहे. ‘मान्यवर’ने तरुणाईला साजेसा असा ब्रॅन्ड अम्बेसेडर आपल्या ब्रॅन्डला प्रमोट करण्यासाठी नेमला व आक्रमक जाहीराती करण्यास सुरुवात केली. दरम्यान, देशात दिवाळीनंतर लग्नसराईचा मौसम सुरु होतो, ही संधी साधून कंपनी #NayeRishteNayeVaade या अंतर्गत विराट कोहली आणि अनुष्का शर्मावर बेतलेली जाहीरात दाखविण्यास सुरुवात केली.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

जाहीरातीबद्दल ‘VIRUSHKA’ हे दोघं पहिलेच देशातील चर्चित कपल. त्यांच्या नात्याबद्दलची उत्सुक्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत लागली आहे. त्यात दोघं लग्न या विषयावर आधारीत जाहीरातीमध्ये एकत्र येणार म्हणजे चर्चा तर होणारच ना… विराट आणि अनुष्का दोघांनीही या जाहीरातीत उत्तम अभिनय केलाय. त्यांची बॉडी लॅन्गवेज आणि चेह-यावरील हावभाव बरेच काही सांगून जातात. ही जाहीरात आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी इंटरनेटवर पाहिली आहे. इतर माध्यम प्रकारात या ॲड पाहणा-यांची संख्या तर अगणितच आहे.

Click here to watch latest motivational videos 

जाहीरातीचे बजेट “आम्ही कंपनीच्या इतिहासातील जाहीरातीवर खर्च होणा-या सर्वात मोठ्या बजेटचा आकडा गाठला आहे. आम्ही 2017-18 या वर्षात 80 कोटी रुपये मार्केटिंगवर खर्च करण्याचा निर्णय घेतला,” असे वक्तव्य ‘मान्यवर’च्या संचालिका शिल्पी मोदी यांनी जाहीरातीच्या यशानंतर सांगितले आहे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

मित्रांनो, आपले उत्पादन किंवा सेवा कोणतेही असो त्याचे योग्य विपणन केले. तसेच मार्केटिंग करण्यासाठी योग्य टीम आणि स्ट्राटेजी ठेवलीत, तर तुमचे प्रोडक्ट बाजारात नक्कीच विकले जाईल. हेच ‘मान्यवर’च्या या जाहीरातीने दिसून येते…

To register for upcoming seminar click here