झॉस्टेल; मस्तमौला Backpackers च्या राहण्याची सोय…

झॉस्टेल; मस्तमौला Backpackers च्या राहण्याची सोय…

गेल्या काही वर्षांमध्ये Backpackers ही संकल्पना चांगलीच रूढ होत चालली आहे. खांद्यावर बॅग ठेवलं की निघाला भारतभ्रमण करायला. एवढचं नाही, अनेक Backpackers नी नुसत्या एका बॅगवर विश्व संचारले आहे आणि त्यांची भ्रमंती सुरू आहे. यांना विचारलं बाबा रे तुम्ही कुठं राहता… तर त्याचं उत्तर असतं जिथं अंग टेकायला जागा मिळेल ती जागा आपली. हे साहस म्हणून एक-दोनदा ठीक आहे. पण सारख नाही. Backpackers च्या समस्येवर तोडगा म्हणून ‘झॉस्टेल’ ही संकल्पना रूढ झाली. देशातील पहिली बॅकपॅकिंग होस्टेलची चैन या कंपनी रुजवली, हे म्हणने गैर ठरणार नाही.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

ऑगस्ट 2013 साली आयआयटी आणि आयआयएममधील पदवीधर तरुणांनी ‘झॉस्टेल’ ही कंपनी स्थापन केली. यात चेतन सिंग चौहान, अभिषेक, धर्मवीर चौहान, पावन नंदा, अखिल मलिक, आणि तरुण तिवारी यांनी पुढाकार घेतला. देशभमण करणा-या या पर्यटकांना फिरण्याचे वेड त्यातूनच त्यांना राहण्यासंबंधी अडचणी येऊ लागल्या. Backpackers ना  येणा-या अडचणी आपल्याद्वारे दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी ‘झॉस्टेल’ची निर्मीती केली.

Click here to watch latest motivational videos 

‘झॉस्टेल’ची चैन Backpackers ला एसी डॉर्म्स, किचन, लॉन्ड्री, टीव्ही, वायफाय, लायब्ररी आणि काही खेळ अशा सुविधा देते. तेही वाजवी दरात. ‘झॉस्टेल’ने सर्वप्रथम राजस्थानमधील जयपूरमध्ये आपले हॉस्टेल सुरु केले. त्यानंतर आग्रा, गोकर्ण, मॅकलॉडगंज, बिर, उटी, चेन्नई, जैसलमेर, पुष्कर, चिकमंगलूर, काठमांडू, रिशीकेष, कूर्ग, खजुराहो, स्पिती, डलहौझी, कोची, उदयपूर, दिल्ली, लेह, वाराणसी, गोवा आणि मनाली अशा पर्यटनस्थळी त्यांचे हॉस्टेल्स पसरली आहेत.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

“झॉस्टेल ही देशातील पहिली बॅकपॅकिंग होस्टेलची चैन फ्रॅन्चाईझी मॉडेलवर काम करते. तरुण उद्योजक त्यांच्या बळावर त्यांचे हॉस्टेल स्थापन करतात,” असे ‘झॉस्टेल’च्या संस्थापकांपैकी एक अखिल मलिक यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी व्हिएतनाम येथे आपले पहिले हॉस्टेल स्थापन केले. अशाप्रकारे फक्त एका कल्पनेमुळे आज 500 ते 600 जणांना रोजगार मिळाला आहे. आपणही ‘झॉस्टेल’च्या कार्याने प्रेरणा घेत आपला काही हटके बिझनेस करु शकतो.

To register for upcoming seminar click here