Parle-G बिस्किट कसे बनले जगातील सर्वोत्तम बिस्किट ब्रँड...

Parle-G बिस्किट कसे बनले जगातील सर्वोत्तम बिस्किट ब्रँड...

Parle-G बिस्किट म्हणजेच आपणा सर्वसामान्यांचा जीव की प्राण. हे बिस्किट खाण्याची कोणती योग्य वेळ नाही. सकाळी, दुपार आणि संध्याकाळ किंवा कधीही या बिस्किटाने आपली भूक क्षमते. अशा या स्वदेशी बिस्किट ब्रँडच्या विषयी आपल्या कमी माहिती आहे. म्हणूनच आज #स्नेहलनीती तुमच्यासमोर एका जुना आणि महत्त्वाचा ब्रॅंडबद्दल माहिती घेऊन आली आहे. तर घेऊयात Parle-G बिस्किटाबद्दल अधिक माहिती...

प्रारंभ... मुंबईतील विलेपार्ले येथे १९२९ साली चौहान कुटुंबियांनी 'पार्ले प्रोडक्ट' नावाने मिठाईचा व्यवसाय सुरू केला. यानंतर चौहान बंधूंनी आपआपले वेगवेगळे बिझनेस मार्ग निवडले. विजय, शरद आणि राज चौहान 'पार्ले प्रोडक्ट'साठी काम करायला सुरुवात केली, प्रकाश चौहान आणि त्यांच्या मुलींनी 'पार्ले ऍग्रो'अंतर्गत काम करण्यास सुरुवात केली तर रमेश चौहान यांनीए 'पार्ले बिस्लेरी'साठी काम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, 'पार्ले प्रोडक्ट्स'ने १९३९ साली Parle-G या अंतर्गत बिस्किट तयार करण्यास सुरुवात केली आणि येथपासून सुरू झाला भारतातील बिस्किटच्या बिझनेस युगाचा प्रारंभ.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

ब्रिटिश बिस्किट भारतातून हद्दपार केली... खरं पाहिलं तर इंग्रजांनी चहा आणि बिस्किट म्हणजेच कुकिज हे स्नॅक्स भारतात आणले. यानंतर ते आपल्याकडे लोकप्रिय झाले. पुढे देश स्वातंत्र्य झाला; परंतु लोकांना लागलेली चहा आणि बिस्किटची चटक तशीच राहिली तेव्हा Parle-G ने एक आकर्षक जाहिरात केली आणि 'Parle ग्लुको बिस्किट ब्रिटिश ब्रॅन्डेड बिस्किटला सर्वोत्तम पर्याय' अशी काहीशी जाहिरात होती. ही जाहिरात चांगली चालली आणि पार्ले ग्लुकोज बिस्किटांचा खपही वाढला.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

असे पडले 'Parle-G' हे नाव... पूर्वी पार्ले-जी या बिस्किटचे नाव 'पार्ले ग्लुको' असे होते आणि १९८० पर्यंत तेच राहिले. नंतर ग्लुकोजचा 'जी' ठेऊन 'पार्ले-जी जी म्हणजे जिनिअस' असे नामकरण केले. तेव्हापासून आतापर्यंत पार्ले प्रोडक्ट या कंपनी मागे वळून पाहिले नाही. या कंपनीचे पार्ले-जी व्यतिरिक्त मेलोडी , मॅन्गो बाईट, पॉपिन्स आणि किश्मिश ही चॉकलेट प्रोडक्ट आहे. यांच्यापैकी अनेक उत्पादन आजही अस्तित्वात असून उत्तम बिझनेस करीत आहेत.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

पहिला स्वदेशी ब्रॅन्ड ज्याने ५,००० कोटींहून अधिक उलाढाल केली... २०१३ मध्ये पार्ले-जी हा पहिला स्वदेही बिस्किट ब्रॅंड ठरला ज्याने रिटेल बाजारात पाच हजाराहून अधिक उलाढाल केली. तसेच ब्रॅण्ड विश्वासर्हतेमध्ये पारले-जी देशात ४२ व्या क्रमांकावर आहे. तर ही होती 'Parle-G' बिस्किटच्या व्यवसायाची कथा. आपले प्रोडक्ट साधे असले तरी ग्राहकांची गरज ते पूर्ण करते की नाही, यावर आपल्या बिझनेसचे यह अवलंबून असते.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा