स्पायकर जीन्स या आंतरराष्ट्रीय जीन्स ब्रॅण्डचे मालक आहेत मराठी उद्योजक प्रसाद पाब्रेकर...

स्पायकर जीन्स या आंतरराष्ट्रीय जीन्स ब्रॅण्डचे मालक आहेत मराठी उद्योजक प्रसाद पाब्रेकर...

लिव्हाईस, डेनिम, रॅन्गलर, ली, पेपे जीन्स, फ्लायिंग मशीन, बर्बेरी, किलर आणि स्पायकर ही सर्व नावे आंतरराष्ट्रीय जीन्स ब्रॅण्ड आहेत. या सर्व कंपन्या आज टेक्सटाईल क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची उलाढाल करीत आहेत; परंतु यातील एक कंपनी आहे ती एका मराठी उद्योजकाची आणि त्या कंपनीचे नाव आहे 'स्पायकर जीन्स'... विश्वास बसत नाही आहे ना? मराठमोळे उद्योजक प्रसाद पाब्रेकर यांनी 'स्पायकर जीन्स' या कंपनीचे निर्माण केले आणि आजही कंपनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा बिझनेस करीत आहे. घेऊया या मराठी उद्योजकाच्या कंपनीचा आढावा...

सुरुवात... होतकरू मराठी माणूस प्रसाद पाब्रेकर यांनी 1992 साली 'स्पायकर लाईफस्टाईल प्राव्हेट लिमिटेड' या कंपनीची सुरुवात केली. प्रसाद यांना डेनिम म्हणजेच जीन्स कपड्याच्या प्रोसेसिंगची माहिती होती तसेच जीन्सचे फिनिशींग आणि सेलिंगही माहीत होते. तेव्हा प्रसाद यांनी संजय वाखारिया यांना सोबत घेऊन हा ब्रॅण्ड बाजारात आणला.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

अडचणींवर मात... जीन्स हा पॅन्टचा प्रकार पाहिला तर पाश्चिमात्य लोकांचा. तेथून तो भारतात आला आणि भारतीय तरुणांनी तो पसंत केला. म्हणजेच आंतरराष्ट्रीय जीन्सचे ब्रॅण्ड ही मोठी समस्या होती सोबत देशी  ब्रॅण्डची एकमेकांसोबत सुरू असलेली चढाओढ अशा अनेक समस्या प्रसाद यांना आपल्या कंपनीच्या वाटेत दिसत होत्या; पण 'काहीही झालं तरी हार मानायची नाही' हा करारी बाणा त्यांच्याकडे होता. हळूहळू 'स्पायकर जीन्स'चे प्रोडक्ट्स तरुणांना आवडू लागले, जीन्सची विक्री वाढली आणि व्यवसायात जम बसला.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

'सर्वोत्तम भारती\य ब्रॅण्ड' म्हणून गौरव... 'स्पायकर जीन्स'ने आपले प्रोडक्ट सर्वत्र चालावे यासाठी त्यात अमुलाग्र बदल केले. तरुणांची फॅशन काय आहे, सध्या काय ट्रेंडिग आहे, याचा मागोवा कंपनीची फॅशन टीम घेत असत आणि त्याप्रकारचे प्रोडक्ट्स बनवीत असत. म्हणूनच 'स्पायकर जीन्स'ला इकोनॉमिक्स टाईम्स या संस्थेने ‘Most Exciting Indian Brand’ अशी पदवी बहाल केली.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

आज 'स्पायकर जीन्स'चे संपूर्ण देशात 210 आऊटलेट्स आहेत तर जगभरात 900 हून अधिक मल्टीब्रॅण्ड आऊटलेट्स आहेत. तसेच प्रत्येक इ-कॉमर्स वेबसाईटवर 'स्पायकर जीन्स'ची जीन्स आपल्याला नक्कीच दिसेल, येथपर्यंत कंपनीचा विस्तार झाला आहे. बहुतेक मराठी लोक म्हणतात नोकरी बरी; परंतु प्रसाद पाब्रेकर या मराठी माणसाने मोठे स्वप्न पाहिले आणि उद्योजक बनून स्वतःचा ब्रॅण्ड आणि नाव जगभरात केले.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा