आपणा सर्वांना माहीत हवेत 'हे' Business Etiquettes

आपणा सर्वांना माहीत हवेत 'हे' Business Etiquettes

बिझनेस जगतात पुढे जायचं असेल तर तुमच्याकडे उत्तम संस्कार, उत्तम बिझनेस एटिकेट्स असणे गरजेचे आहे. अनेक मराठी उद्योजक बिझनेस शिष्टाचार नसल्याने मोठ-मोठ्या बिझनेस डिल्स त्यांच्या हातून निसटतात आणि त्या डील्स दुसरं कोणी घेऊन मोठा उद्योजक होतो. म्हणूनच आज आम्ही बिझनेस शिष्टाचार (Business Etiquettes) कसे असावेत या विषयी बोलणार आहोत.

संवाद कौशल्य… संवाद साधने हा बिझनेसमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. उद्योजक आपले प्रोडक्ट किंवा सेवा दुस-यांसमोर मांडू शकले नाहीत तर आपला बिझनेस कसा वाढविणार? म्हणून उद्योजकाकडे उत्तम संवाद कौशल्य हवे. जर बिझनेसमन संवाद कौशल्यात अपुरा पडत असेल तर त्याने उत्तम भाषा येणा-यास आपल्या कंपनी नियुक्त करावे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

वेश कसा असावा... उद्योजकाचा वेश एखाद्या प्रोफेशनलसारखा असावा. एका भारदस्त व्यक्तीशी आपण भेटत आहोत, असे दुस-यांना वाटायला हवे. उदाहरण, स्नेहल कांबळे, मी नेहमी ब्लेझरमध्ये असतो आणि ती माझी ओळख बनली आहे.

बिझनेस  कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

बिझनेस मिटींग्स… उद्योजकाने बिझनेस मिटींग्सला वेळेवर जावे किंवा पाच मिनिटापूर्वी जावे तसेच पेन आणि डायरी सोबत ठेवावी.

टेबल मॅनर्स… जर आपण बिझनेस लंचला गेलो तर तेथेही टेबल मॅनर्स असणे गरजेचे आहे. जेवढं खाल तेवढच ताटात घ्या, अन्न वाया घालवू नका तसेच खाताना चमच्याचा वापर करा. जेवण झाल्यावर टेबलावरून उठण्यापूर्वी सर्वांना विचारून उठावे.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

नम्रता आणि बोलण्याची पद्धत… उद्योजकाने नेहमी नम्र रहावे. दुसरा काय बोलत आहे, त्याचे बोलणे ऐकावे. जर तुम्हाला तुमचा मुद्दा मांडायचा असेल तर प्रथम परवानगी घ्यावी नंतरच बोलावे. तसेच उद्योजकाने मृदू परंतु समोरच्याला ऐकायला येईल, या आवाजात बोलावे.

हस्तांदोलन कसे करावे… हॅन्डशेक म्हणजेच एकमेकांसोबत हातमिळवणी करण्याच्याही एक पद्धत आहे. दोनदा हस्तांदोलन करून हात सोडावा. तुमच्या हातमिळवण्यावरही तुम्हाला जज केले जाते.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

फॉलो अप… आपण जर बिझनेस मिटींग किंवा डिलसाठी गेला असाल तर या मिटींगनंतर फॉलो अप घेणे गरजेचे आहे. त्यांना ईमेल किंवा एक सुंदर मेसेज देऊन त्यांच्याशी फॉलो ठेवणे, हे आपले उत्तम रिलेशनशीप बिल्ड करते. बिझनेसमन म्हणून आपल्याकडे वेळ नसेल तर हे काम आपले सेक्रेटरीकडून करून घ्यावे.