'शू लॉन्ड्री'... खराब शूज वॉशकरून पुन्हा नवीन करण्याचा बिझनेस!

'शू लॉन्ड्री'... खराब शूज वॉशकरून पुन्हा नवीन करण्याचा बिझनेस!

लॉन्ड्री हा शब्द आपल्यासाठी अनोळखी नाही; परंतु तुम्ही कधी 'शू लॉन्ड्री' हा शब्द ऐकला आहे का? काहींनी ऐकला असेल, काहींनी नसेलही. 'शू लॉन्ड्री' ही कंपनी असून आपले बूट किंवा शूज वापरून वापरून मळतात आणि थोडे खराब झाल्यावर आपण ते शूज टाकून देतो. हेच कंपनीचे फाऊंडर संदीप गजाकस यांनी हेरले नवीन बिझनेसची स्थापना केली. 'शू लॉन्ड्री' ही कंपनी आपले मळलेले शू किंवा बूट उत्तमप्रकारे धूवून ते आपल्याला आणून देतात त्यासाठी ते नॉमिनल किंमत आकारतात. घेऊयात या बिझनेसची माहिती... 

सुरूवात... महाविद्यालयीन जीवनात संदीप गजाकस याला 'शू लॉन्ड्री' या बिझनेसची कल्पना सुचली होती. तेव्हा संदीप गजाकस हा मुंबईच्यान मिठीबाई महाविद्यात शिकत होता. त्यांनी आपल्या अनेक मित्रांनी ही कल्पना सांगितली. त्याने त्याच्या मित्रांना काही प्रत्याक्षिकेही दाखवली. महत्त्वाचे म्हणजे आपण मुंबईसारख्या भरपूर प्रदूषण असणा-या शहरात राहतो. त्यामुळे आपले शूज काही महिन्यात घाण होतात. पुढे काही दिवसांनी आपण हेच शूज टाकून देतो. हेच संदीपने हेरले आणि 'शू लॉन्ड्री' बिझनेस सुरू केला.


वडिलांना संकल्पना कळलीच नाही... संदीपने जेव्हा 'शू लॉन्ड्री'ची संकल्पना आपल्या वडिलांना सांगितली तेव्हा त्यांना काहीच कळलीच नाही. हा कसला बिझनेस म्हणून संदीपच्या वडिलांनी त्याला हिणवले; परंतु त्याला काय करायचे माहीत होते. तो आपले काम करीत राहिला. त्याने फॅशन डिझायनार, डान्स कोरियोग्राफर, इव्हेंट मॅनेजर, फुटबॉल खेळाडू आणि कॉल सेंटरच्या मुला-मुलीना 'शू लॉन्ड्री'बद्दल सांगितले. तेव्हा त्यांचा प्रतिसाद उत्स्फुर्त होता.


'शू लॉन्ड्री' नेमकी काय करते... सर्वप्रथम   कंपनीचा डिलीव्हरी बॉय शू तुमच्याकडून घेतो, त्यानंतर तो शू पूर्ण डिसमॅन्टल करतो नंतर शूज स्वच्छ धुतले जातात, खराब असलेले शूज रिपेअर केले जातात, शूज असेंबल करतात आणि पुन्हा ते तुमच्याकडे डिलीव्हर केले जातात, असा साधा सोपा बिझनेस. यासाठी फक्त १२० रुपये चार्ज केले जातात.


जगविख्यात कंपन्यांसोबत काम… कोणत्याही सपोर्टशिवाय सुरु केलेला संदीप यांचा बिझनेस लोकांना आवडला असून अनेकजन त्यांच्याशी व्यवहार करीत आहे. संदीप यांनी स्वतःहून मार्केटिंग, क्लीनिंग, डिलीव्हरी आणि बिलिंग असे काम पाहिले आहे. दरम्यान, शॉपर्स स्टॉप, एडिदास, प्युमा या ब्रॅन्डच्या शूज रिपेअर आणि वॉश करण्यासाठी 'शू लॉन्ड्री'मध्ये येतात. साध्या ग्राहकांबरोबर हे मोठे ब्रॅन्डही कंपनीचे ग्राहक झाले आहेत.


दरम्यान, संदीपला महाविद्यालयीन काळात एक कल्पना सुचली त्याचा आज एवढा मोठा बिझनेस बनला असून बिझनेसचा टर्नओव्हर २०० कोटींवर गेला आहे. ते म्हणतात ना, "एक कल्पना तुमचे जीवन बदलू शकते." तसेच काहीसं संदीपसोबत झाले. संदीप सांगतात की, "मला शूजची डिलीव्हरी करायला आवडते, शूज देताना ग्राहकांच्या चेह-यावरील हास्य पाहून मला समाधान मिळते."