प्रसिद्ध उद्योजक Ratan Tata या सहा नियमांचे पालन करतात, तुम्ही हे नियम पाळता का?

प्रसिद्ध उद्योजक Ratan Tata या सहा नियमांचे पालन करतात, तुम्ही हे नियम पाळता का?

Ratan Tata भारतातील किंबहूना जगातील ख्यातनाम बिझनेसन्सपैकी एक आहेत. रतन टाटा यांनी बिझनेसमध्ये घेतलेल्या आक्रामक आणि अभूतपूर्व निर्णयांमुळे टाटा हा बिझनेस ग्रुप आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला. तसेच टाटा यांच्या विश्वासार्ह कामामुळे टाटा हा विश्वसनीय ब्रॅन्ड म्हणून सर्वांसमोर आला; परंतु हे सर्व शक्य झाले रतन टाटा यांच्या काही नियमांमुळे. त्यांनी स्वतः काही कडक नियम अंगिकारले आणि ते नियम आपल्या संघटनेत रुजवले. म्हणूनच आज रतन टाटा यांचे नाव आदराने घेतले जाते. आता पाहू यात रतन टाटा यांनी अंगिकारलेले सहा नियम.


शिकणे आणि ऐकणे कधीच सोडू नकाः उद्योजक रतन टाटा सांगतात की, माणसाने शिकण्याची वृत्ती तसेच दुस-यांचे ऐकण्याची प्रवृत्ती जोपासली पाहिजे. असे केल्याने आपण प्रगल्भ बनतो आणि कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकतो. 

तुमच्या टीमच्या प्रयत्नांचे कौतुक कराः  रतन टाटा सांगतात की, तुमचे कर्मचारी किंवा टीमचे कौतुक करा. आपले किंवा आपल्या बिझनेसचे ध्येय आपल्या कर्मचा-यांच्या हातात असते. त्यांनी चांगले प्रदर्शन केले तर त्यांचे कौतुक करा, त्यांना सर्वोत्तम काम करण्याची प्रेरणा द्या.


तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवाः सर्वात महत्त्वाचा नियम रतन टाटा यांनी अंगिकारला तो म्हणजे स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. तुमची कल्पना किंवा कामावर तुम्हीच विश्वास ठेवला नाहीतर तुम्ही त्या जगासमोर मांडू शकणार नाही. म्हणूनच स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. 


एक कल्पना तुमचे जीवन बदलू शकतेः स्वप्न पहा आणि ते सत्यात उतरवण्यासाठी अपार कष्ट करा. तुमचे एक स्वप्न आणि कल्पना तुमचे जीवन बदलू शकते. रतन टाटा यांना सामान्य नागरिकांसाठी बजेट कार बनविण्याची कल्पना सुचली. ती त्यांनी टाटा नॅनोद्वारे पूर्ण केली आणि रतन टाटा नाहीतर सर्व सामान्य लोकांचेही भाग्य पालटले. 
 
स्वतःवर विश्वास ठेवाः रतन टाटा सांगतात की, नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही मोठे काम करू शकता, तुम्ही सर्वोत्तम बिझनेस एम्पायर निर्माण करू शकता, तुमचा फक्त स्वतःवर विश्वास हवा. 

समाजाला काहीतरी द्याः तुम्ही समाजाचे काहीतरी देणे लागता! या उक्तीनुसार रतन टाटा यांनी आपले सामाजिक कार्य सुरू ठेवले. हॉस्पिटल, शिक्षण यासारख्या अनेक सामाजिक कार्यात रतन टाटा आणि टाटा ग्रुपचा मोलाचा वाटा आहे. मग मराठी उद्योजकांनो हे नियम पाळत नसाल तर आजपासून यांचे पालन करा.