कोणत्याही उद्योजकाने ठेऊ नये Nirav Modi सारखा ‘बिझनेस आदर्श’

कोणत्याही उद्योजकाने ठेऊ नये Nirav Modi सारखा ‘बिझनेस आदर्श’

काही दिवसांपासून देशभरात Nirav Modi चे नाव सर्वत्र चांगलेच पसरले आहे. मूळात हिरे व्यापारी असलेल्या Nirav Modi आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी पंजाब नॅशनल बँकेला ११, ४०० हजार कोटी रुपयांचा चूना लावून परदेशात पलायन केले. आपल्यावर कारवाई होईल असे समजताच नीरवने स्वित्झर्लंडला पळ काढल्याचे समजत आहे. या स्कॅमची माहिती माध्यमांमध्ये पसरल्यावर पोलीस, सीबीआय तसेच ईडी Nirav Modi च्या मागावर आहे.

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

कोण आहे नीरव मोदी? Nirav Modi हा वडिलोपार्जित हि-यांच्या व्यापारात होता. अनेकवर्षांपूर्वी नीरवचे वडील बेल्जियममध्ये गेले आणि त्यांचा व्यापार थंडावला. वडिलोपार्जित व्यवसायास उभारी देण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून भारतात आला. त्याचा मामा मेहुल चोक्सीकडून त्याने हिरे व्यापाराचे धडे गिरवले. यानंतर तो हिरे डिझाईनकडे आकर्षित झाला.

Click here to watch latest motivational videos 

आंतरराष्ट्रीय अभिनेत्रीलाही गंडवले… त्यानंतर Nirav Modi ने ‘फायरस्टार डायमंड’ ही कंपनी सुरू केली. कंपनीचे मुख्यालय मुंबईसहीत  दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क, लास व्हेगास, सिंगापूर, मकाव, बिजींग या देशांमध्ये त्याच्या कंपनीच्या शाखा आहेत. तसेच लिसा हेडन आणि प्रियांका चोप्रा या नीरवच्या कंपनीच्या ब्रँड अँबेसिडर (सदिच्छादूत) राहिल्या आहेत. २०१७ मध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अभिनेता सिद्धार्थ मलहोत्रा नीरवच्या एका हिरे जाहिरातीत झळकले होते. त्याचे मानधन न मिळाल्याने प्रियांकाच्या टीमने नीरव मोदीला कायदेशीर नोटीस बजावली होती. अशात-हेने नीरवने आंतरराष्ट्रीय स्तरातील अभिनेत्रीला गंडवले आहे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

फोर्ब्सच्या यादीतही झळकला होता… बॅंकाचे कर्ज चुकवून पलायन केलेला Nirav Modi चा २०१७ मधील फोर्ब्सच्या भारतातील १०० श्रीमंत या यादीत समावेश केला होता. दरम्यान, नीरवची संपत्ती १.७३ अब्ज डॉलर इतकी असल्याचे समजते.

To register for upcoming seminar click here 

कोणीही ठेऊ नये असा बिझनेस आदर्श… दरम्यान, कोणत्याही उद्योजकाने असा बिझनेस करू नये. देशातील बॅंकाना फसवणे, देशातील गरीब करदात्यांचे पैसे बुडवणे, अशा स्वरुपाचे काम कोणीच करू नये. यापूर्वीही मद्यसम्राट विजय माल्याने एसबीआय बॅंकाचे नऊ हजाराहून अधिक रुपयांचे कर्ज घेऊन परदेशात पलायन केले आता Nirav Modi हा दुसरा उद्योगपती. म्हणूनच सध्याच्या उद्योजकांनी यापैकी कोणाचाही आदर्श ठेऊ नये. मराठी उद्योजकाने नेहमी ठेवा,“चमकदार गोष्टींना भुलू नका, त्यांचा चमकदारपणा जास्त वेळ टिकून राहत नाही!”