‘या’ इंडस्ट्रीमध्ये बिझनेस केलात तर तुम्ही नक्कीच Successful व्हाल…

‘या’ इंडस्ट्रीमध्ये बिझनेस केलात तर तुम्ही नक्कीच Successful व्हाल…

व्यवसायात Successful होणं म्हणजे उद्योजकांच्या आयुष्यातील सर्वात मोठे यश आहे. हेच ध्येय ठेवून अनेक उद्योजक आपला व्यवसाय सुरू करतात. अनेकांना बिझनेस करण्याची इच्छा असते; परंतु अनेकांना बिझनेस कोणत्या इंडस्ट्रीत करायचा हेच माहीत नसते. बिझनेस कोच आणि मास्टर स्ट्रॅटेजिस्ट स्नेहल कांबळे यांच्या बिझनेस सेमिनार आणि सेशन्सला उपस्थिती राहणारे उद्योजक त्यांना हाच प्रश्न विचारतात. “बिझनेस करायचा आहे; पण कोणता बिझनेस माझ्यासाठी फायदेशीर ठरेल, ते सांगा.” म्हणूनच आजच्या ब्लॉगमध्ये पाहू यात असे काही बिझनेस इंडस्ट्रीज ज्या तुम्हाला नक्कीच Successful बिझनेसमन किंवा यशस्वी उद्योजक बनवू शकतो…

फॅशन – पूर्वीपासून जगभरात फॅशन इंडस्ट्री जोमात सुरू आहे. भविष्यकाळातही नवनवे फॅशन ट्रेंड बाजारात येणारच आहेत. म्हणूनच या इंडस्ट्रीत सदासर्वकाळ सुगीचे दिवस असतात. पूर्वी बाजारापर्यंत सीमित असलेली ही इंडस्ट्री आज ऑनलाईन आणि मोफत घरपोच डिलीव्हरीपर्यंत पोहोचली आहे. तसेच या इंडस्ट्रीमध्ये कपडे, पादत्राणे, अॅसेसरिज आणि मेकअप असे अनेक आयाम पडतात, म्हणूनच नव्या उद्योजकांना या इंडस्ट्रीमध्ये येऊन बिझनेस करणे सोपे आहे. 

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

स्पोर्ट्स – क्रीडा किंवा खेळ उद्योगासही काही वर्षांपासून उत्तम दिवस आले आहेत. पाश्चिमात्य क्रीडा उद्योगास अनुसरून आपणही त्याच मार्गावर पाऊल टाकत आहोत. ‘आयपीएल’ हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण. छोट-मोठ्या स्पर्धांमुळे अनेकांना राष्ट्रीय स्तरापर्यंत वलय मिळते. अशा खेळाडूंना मॅनेज करण्यासाठी अनेक कंपन्या किंवा मॅनेजर म्हणून नवा उद्योग नावारुपास आला आहे. तसेच खेळांना प्रोड्युस करणे, अनेक सुविधा देणे, प्रसारित करणे आणि आयोजन करणे, असे अनेक उद्योग आपण उद्योजक म्हणून करू शकतो. महत्त्वाचे म्हणजे खेळांच्या  सामानांचा व्यवसायही आपण करू शकतो. उदाहरणार्थ – डेकॅलथॉन स्पोर्ट्स मॉल, येथे खेळ आणि खेळाडूंना लागणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध असते.

Click here to watch latest motivational videos 

हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री – आपण या उद्योगास आदरातिथ्य उद्योग असेही म्हणू शकतो. जगभर चालणारा आणि शत-प्रतिशत पैसे कमावून देणारी अशी ही बिझनेस इंडस्ट्री आहे. आपण फक्त येथे उत्तम सेवा आणि वेळी-अवेळी काम करता आले पाहिजे. या इंडस्ट्रीचे हॉटेलिंग, लॉजिंग, इव्हेंट प्लॅनिंग, परिवहन आणि टुरिझम असे आयाम पडतात. म्हणूनच ही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचा जगभर बोलबाला आहे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

फिजिकल फिटनेस – मागील काही वर्षांपासून फिजिकल फिटनेस म्हणजेच शारीरिक तंदुरुस्ती यावर आधारलेला उद्योग वाढीस लागला आहे. यात योग, जीम्स, क्रॉस फिट, झुंबा असे अनेक आयाम आढळतात. तसेच हा बिझनेसही ऑफलाईनपासून ऑनलाईनवर गेला आहे. अनेक फिटनेस ट्रेनरचे व्हिडीओज आणि टुटोरिअल्स आपण पैसे देऊन पाहू शकतो. म्हणूनच या इंडस्ट्रीतही कोट्यवधी रुपयांची उलथापालथ होत आहे.

To register for upcoming seminar click here 

दरम्यान, अशा अनेक इंडस्ट्री आहेत ज्यामार्फत आपण आपला बिझनेस सुरू करून त्यात मोठी झेप घेऊ शकतो, यातील सध्या ट्रेंडिंगमध्ये असणा-या इंडस्ट्रीज आम्ही येथे मांडल्या आहेत. अनेक कलाकार, खेळाडू आणि उद्योजकांनी या इंडस्ट्रीमध्ये बिझनेस करून कोट्यवधी रुपये कमाविले आता मराठी उद्योजकांनो वेळ आपली आहे…