गूळ दाणे ते लोणावळा चिक्की त्यानंतर मगनलाल चिक्की… असाही एक बिझनेस

गूळ दाणे ते लोणावळा चिक्की त्यानंतर मगनलाल चिक्की… असाही एक बिझनेस

मगनलाल चिक्की लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी मगनलाल चिक्की. शेंगदाणे, गूळ आणि तूप यांच्या मिश्रणाने बनवलेला हा खाद्यपदार्थ आपल्या सर्वांच्याच आवडीचा असून मानवी आरोग्याला पोषक आहे. महाराष्ट्रात गूळ आणि शेंगदाणे खाणे हे शेकडो वर्षांपासून चालत आले आहे. त्याचाचा पुढे जाऊन चिक्की हा पदार्थ तयार झाला आणि आज लोणावळ्यातील मगनलाल चिक्की नुसती भारत देशात नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. तेव्हा आज घेऊयात मगनालाल चिक्की या पारंपारिक आणि पिढीजात व्यवसायाबाबत माहिती…

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

सुरुवात… जेव्हा हिंदुस्थानावर इंग्रजांचे राज्य होते म्हणजे 1888 साली भेवरज्जी अगरवाल यांनी गूळ आणि शेंगदाण्यासोबत चिक्की तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यांना मगनलाल, अंबालाल आणि मोहनलाल अशी तीन मुलं होती. त्यापैकी मगनलाल या नावावरूनच त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला. दरम्यान, मगनलाल तारुण्यातच देवाघरी गेले आणि किशोरवयीन असलेले अंबालाल आणि मोहनलाल यांच्या खांद्यावर हा व्यवसाय येऊन ठेपला. सुरुवातीला गुळदाणे बनविण्याची कोणतीही मशीन नव्हती तेव्हा यांनी काही घर गड्यांसमवेत चिक्की बनवण्यास सुरुवात केली आणि अशाप्रकारे अगरवाल कुटुंबियांचा घरगुती व्यवसाय सुरू झाला.

Click here to watch latest motivational videos 

लोणावळ्याची फेसम चिक्की… अगरवाल कुटुंबियांचा गुळदाण्याचा बिझनेस जोमात सुरू होता. एव्हाना देशाला स्वातंत्र्यही मिळाले होते आणि नवी व्यापारी धोरणे देशातील सरकारने सुरू केली होती. या दरम्यान अगरवाल भावंडं आणि त्यांच्या पुढील पीढीने गुळ दाण्यांचा पिढीजात बिझनेस वाढविण्याचे ठरविले. मुंबईपासून 110 किमी तर पुण्याहून 60 किमीवर असलेले हे लोणावळे हे सर्वांचे आवडते पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास येत होते. तेव्हा पर्यटकांमध्ये ही चिक्की फेमस झाली.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

तसेच मुंबई ते पुणे ये-जा करणा-या  चाकरमान्यांनी ‘लोणावळा चिक्की’ या नावे प्रसिद्ध केली. तेव्हापासून ‘लोणावळा चिक्की’ फेमस झाली. चिक्कीचा बिझनेस उत्तम चालत आहे आणि पैसेही जास्त त्यामुळे अनेक लोक या व्यवसायात उतरले. तेव्हा भविष्याची गरज ओळखून अगरवाल कुटुंबियांनी आपल्या चिक्कीचा ब्रॅन्डमध्ये रुपांतर केले. अशात-हेने मगनलाल चिक्की संपूर्ण विश्वात सुप्रसिद्ध झाली.

To register for upcoming seminar click here 

आपली व्यवसाय कल्पना कितीही साधी असो, ती तुम्हाला मोठी करता आली पाहिजे. भेवरज्जी अगरवाल यांनी एका कल्पनेचा बिझनेस सुरू केला. आज त्यांचा हा बिझनेस त्यांची सहावी पिढी सांभाळत आहे. तसेच काळानुरूप त्यांनी या बिझनेसमध्ये अमुलाग्र बदल घडवीत चिक्कीचा सेल्स वाढत ठेवला. मराठी उद्योजकांनी मगनलाल चिक्की या केस स्टडीतून आपला बिझनेस कसा वाढवायचा. हे शिकले पाहिजे.