हे दोन रोग असतील तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही

हे दोन रोग असतील तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही

बिझनेसमध्ये श्रीमंत होण्याचे अनेक पर्याय आहेत. हे पर्याय तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वापरून तुमचा व्यवसाय मोठा करू शकता; परंतु उद्योजकांना किंवा साधा माणसांना श्रीमंत होण्यापूर्वी अनेक अडी-अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणूनच बिझनेस कोच आणि मास्टर स्ट्रॅटेजिस्ट स्नेहल कांबळे आपल्या दोन रोगांबाबत माहिती देत आहेत. जर हे रोग असतील तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. पाहू यात कोणते रोग आहेत…

बिझनेस ट्रान्सफॉरमेशन ब्ल्यूप्रिंट प्रोग्रॅम मोफत ऐकण्यासाठी क्लिक करा 

100 टक्के परफेक्शनचा रोग – आपल्याकडे असणारा सर्वात पहिला आणि तितकाच महत्त्वाचा रोग म्हणजे परफेक्शनचा रोग. आपल्याला वाटते की आपण केलेले किंवा आपण डेलिगेट केलेले कोणतेही काम परिपूर्ण झाले पाहिजे. प्रत्यक्षात पाहिले तर त्यात काही गैर नाही. कोणतेही काम परिपूर्ण व्हायलाच हवे, असा आपला अट्टहास असतो; परंतु, आपण तेवढ्याअ ताकदीने ते काम करतो का, हेही पाहने गरजेचे आहे. उदाहरणः आपल्या मुलाकडून आपण ९० टक्क्यांची अपेक्षा करतो; पण तुम्हाला पास होण्याइतकेच मार्क्स पडलेले असतात. अशावेळेस दुस-यांकडून मोठी अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. आपल्याकडून जेव्हा परिपूर्ण काम होत नसेल तेव्हा छोट-छोटी ध्येयं ठेऊन, ते काम पूर्ण करा आणि हाच सल्ला द्या. पहा पूर्ण व्हिडीओ…

जे काही करीन ते उद्यापासून करीन – दुसरा आणि महत्त्वाचा रोग जो आपल्याला श्रीमंत किंवा यशस्वी होण्यापासून रोखतो तो म्हणजे जे काही करीन ते उद्यापासून करीन. ‘आजचे काम उद्यावर ढकलणे. हा सर्वात वाईट रोग आहे आणि हा रोग कोणालच जडू नये,’ असे स्नेहल सांगतात. जगातील यशस्वी किंवा श्रीमंत व्यक्ती कधीच आजचे काम उद्यावर टाकत नाहीत. ते वर्तमानात जगतात म्हणूनच ते आपल्यापासून वेगळे ठरतात. तसेच मराठी म्हणं आहे, “काही करा ते आता करा। आलिया घडी आपली साधा॥” म्हणूनच आपण सर्वांनी कोणतेही काम तात्काळ करण्यावर भर दिली पाहिजे.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

दरम्यान, बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांनी लाखो मराठी उद्योजकांना त्यांच्या व्यवसायात आणि एकूण सर्वांगीण विकासाकरीता अमुलाग्र मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने 3,000 हून अधिक बिझनेसमन्सनी त्यांचा बिझनेस 10 पटीने वाढविला आहे. तर त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रभर चार लाखांहून अधिक लोकांना जीवनात मार्गदर्शन केले आहे. मराठी उद्योजक यशस्वी उद्योजक व्हावा, हे त्यांचे मिशन आहे.

To register for upcoming seminar click here