होय! ग्रामीण भाग आणि खेड्यात राहूनही बिझनेस करता येतो...

होय! ग्रामीण भाग आणि खेड्यात राहूनही बिझनेस करता येतो...

'स्नेहलनीती'च्या सेमिनार आणि सेशन्समध्ये महाराष्ट्रातील दूरदूर पसरलेल्या गावो खेड्यातून अनेक उद्योजक आणि बिझनेस करण्याचे इच्छा असणारे तरुण सहभाग नोंदवतात. अनेक लोकं आपले प्रश्न घेऊन येतात. त्यातील एक प्रश्न माझ्या काही दिवस लक्षात राहिला. तो असा की, खेड्यात राहूनही बिझनेस सुरु करु शकतो का??? होय, खेड्यात राहूनही बिझनेस करता येतो... शहर विरुद्ध खेडं असा भेदभाव तुम्ही मनात बाळगू नका! यासाठी आपण थोडं भूतकाळात जाऊया...

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असा संदेश दिला होता; पण आपण खेड्याकडे न येता शहराकडे येऊ लागलो. मुंबई, बंगलोर, दिल्ली कोणतेही मोठं शहर घ्या... वरवर सुंदर आणि सुरेख दिसणार शहर आतून चांगलच पोखरलं... 

कोणामुळे दरदिवशी येणा-या लोकांमुळे. यासाठी फक्त एक कम्युनिटी जबाबदार नाही आपण सर्वच छोट्या-मोठ्या प्रमाणावर जबाबदार आहोत. शेतीत धान्य पिकत नाही म्हणूनच उपासमारीच्या भीतीने आपण शहरात आलो. का आपण गावाकडे छोटा व्यवसाय सुरु नाही केला??? अनेक छोट-मोठे व्यवसाय आहेत. ते करुन आपण आपला संसार-प्रपंच चालवू शकतो. 


शहरात कित्येक लोकं आपल्या मनाविरोधात आणि पडेल ते काम करतात... मित्रांनो मी नोकरी करण्याच्या विरोधात नाही... माझं म्हणण आहे की जर गावात स्वतःचा बिझनेस करण्याची चांगली संधी असेल तर आपण शहरात का यावे???

आता आपण गाव, खेडं आणि ग्रामीण भागात राहूनसुद्धा बिझनेस कसा करायचा आणि कोणता बिझनेस करायचा, हे पाहूयात... 

ग्रामीण भागात बिझनेस करण्याचे फायदे... शहराच्यामानाने गावात चांगला बिझनेस करु शकतो. कारण पायाभूत सुविधा, कच्चा माल आणि कर्मचा-यांची सहज उपलब्धता...  आता तुम्ही विचार करा शहरात बिझनेस सुरु करायाला किती पैसे ओतावे लागतील. म्हणूनच गावच्या ठिकाणे बिझनेस सेटअप चांगला होऊ शकतो.

आता आपण पाहू यात लहान शहरे, गावे आणि ग्रामीण भागांसाठी कोणते व्यवसाय योग्य आहेत...


ऑर्गानिक शेती... सध्या ऑर्गानिक शेती फारच प्रसिद्ध आहे. खेड्यातील लोकं ऑर्गानिक शेती करुन चांगलं जवळच्या मार्केट किंवा शेतातून थेट ग्राहकाकडे या प्रणालीचा वापर करीत धान्य, भाजी विकू शकतो.

स्वच्छतेसाठी मनुष्यबळ पुरवणे... यास आपण Integrated Services असंही म्हणून शकतो. याच मूतिमंत उदाहरण म्हणजे बीव्हीजी इंडिया... आज बीव्हीजीची माणसं पंतप्रधान कार्यालय, संसद आणि मंत्रालयात असल्याचा 'बीव्हीजी'च्या Chairperson आणि MD हणमंतराव गायकवाड यांना अभिमान आहे. तस आपण छोट्या एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये स्वच्छतेसाठी मनुष्यबळ पुरवू शकतो.

पोल्ट्री किंवा दुग्ध व्यवसाय... सध्या ताजं दुध आणि पोल्ट्री व्यवसायलाही जास्त मागणी आहे. अशासमयी थोडं भांडवल लावून आपण हे दोन्ही व्यवसाय सुरु करु शकतो.


स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 


रिसॉर्ट किंवा कॅम्पिग साईट चालवणे... अनेक शहरी लोकांना गावाकडे राहायचं असतं, गावचं जेवण जेवायचं असत आणि यासाठी ते वाटेल तितके पैसे मोजण्यास तयार असतात. तुमच्याकडे जास्त जमीन असेल तर तुम्ही एखाद्या रिसॉर्ट किंवा कॅम्पिग साईटचे निर्माण करुन बक्कळ पैसे कमावू शकता.

मोबाईलच दुकान सुरु करु शकता... सध्या जेवण नको पण मोबाईला हवा असं जग आहे. अशावेळेस याचा आपण वापर आपल्या बिझनेससाठी करु शकतो... गावाकडे आठवडे बाजार असतो अशा ठिकाणी तुम्ही मोबाईच दुकान सुरु करु शकता. त्यात मोबाईल रिपेअरिंग, रिचार्ज आणि नवीन मोबाईल तसेच ब्रॉडबॅन्ड इंटरनेट ऑपरेटर अशा अनेक सुविधा सुरु करु शकता आणि त्यातून पैसे मिळवू शकता.

एवढचं नाहीतर कपडे, ज्वेलरी, लोकल टूर ऑपरेटर आणि शॉपिंग बॅग्स तयार करणे... यासारखे अनेक व्यवसाय आपण खेड्यात किंवा लहान शहरात राहून करु शकतो. म्हणूनच मित्रांनो मला वाटतं चांगला बिझनेस किंवा श्रीमंत बनण्यासाठी शहराची वाट धरु नका, खेड्यातच तुमच व्यवसाय उभा करा आणि मोठं व्हा!