उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठ्या चुका!

उद्योगक्षेत्रातील सर्वात मोठ्या चुका!

कुठला उद्योग कसे यश संपादन करेल आणि जगभरात लोकप्रिय होईल हे सांगता येत नाही. १० -१५ वर्षांपूर्वी ज्या कंपन्यांची नावे देखील आपण ऐकली नसतील आज त्या कंपन्या बिलियन डॉलरची उलाढाल करीत आहे.  त्या काळात बाजारावर अधिराज्य गाजवणाऱ्या कंपन्यांनी गाफील राहून आलेली संधी गमावली. गूगल या कंपनीसाठी १ अब्ज डॉलर ही रक्कम जास्त आहे, म्हणून ही कंपनी विकत घेण्यास नकार देण्यात आला. विडिओ डिलिव्हरी सर्विस पुरवणाऱ्या ब्लॉकबस्टर या कंपनीने नेटफ्लिक्ससह भागीदारीत उद्योग करण्यास नकार दिला. अशा काही चुकांमुळे संबंधित उद्योगक्षेत्राचे समीकरणच बदलून गेले. योग्य निर्णय न घेतल्यामुळे अनेक कंपन्यांना पश्चातापाखेरीज काही करता आले नाही.


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


मोटोरोला : स्मार्टफोन निर्मितीकडे दुर्लक्ष

२००० सालात मोटोरोला ही जगातील सर्वात मोठ्या मोबाईल उत्पादक कंपन्यांपैकी एक होती. रेझर या मोबाईलच्या अचाट लोकप्रियतेमुळे मोबाईल बाजाराचा २२ टक्के हिस्सा या कंपनीने काबीज करून ठेवला होता. मात्र आयफोन आणि ब्लॅकबेरीने बाजारात पदार्पण केल्यानंतरही मोटोरोलाने स्मार्टफोनच्या वाढत्या बाजाराकडे दुर्लक्ष केले. मोटोरोलाचा स्मार्टफोन बाजारात येण्यास २०१० उजाडावा लागला दरम्यानच्या काळात लोकांनी स्मार्टफोनला पसंती देऊन फिचर फोनकडे पाठ फिरवली होती.

एक्ससाइट : गुगल खरेदीस नकार

१९९० च्या दशकात एक्ससाइट हे अत्यंत लोकप्रिय आणि आघाडीचे वेब ब्रावजर होते. केवळ ७५० हजार डॉलरसाठी त्यांनी गुगल खरेदी करण्यास नकार दिला. आज गुगल जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असून युट्युब, जी मेल, पिक्सेल फोन अशा अनेक कंपन्या त्यांच्या मालकीच्या आहेत. गूगलची पॅरेन्ट कंपनी अल्फाबेटची उलाढाल ७३९ बिलियन डॉलर एवढी आहे. तर एक्ससाइट या कंपनीला आस्क जीव्स या कंपनीने ३४३ मिलियन डॉलरला २००४ मध्ये विकत घेतले. 


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


ब्लॉकबस्टर: भविष्याच्या उपाययोजनांचा अभाव

 १९९० च्या दशकात जगभरात ब्लॉकबस्टरची रेंटल डीव्हीडी देणारी ९,००० हुन अधिक दुकाने होती. तेव्हा ब्लॉकबस्टरची कमाई वर्षाला ६अब्ज डॉलर एवढी होती. त्यावेळी नेटफ्लिक्सने भागीदारीसाठी ब्लॉकबस्टर समोर हात पुढे केला होता. ब्लॉकबस्टरचा ऑनलाईन व्यवसाय आम्हाला सांभाळायला द्या असे नेटफ्लिक्सचे म्हणणे होते, मात्र ही ऑफर धुडकावून ब्लॉकबस्टरने नेटफ्लिक्सला बाहेरचा रास्ता दाखवला. आज ब्लॉकबस्टरची अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच दुकाने शिल्लक आहेत. तर नेटफ्लिक्सची एकूण उलाढाल १५ हजार अब्ज डॉलरपर्यंत गेली आहे. आज नेटफ्लिक्स केवळ स्ट्रीमिंगचं नाही तर चित्रपट आणि मालिकांची निर्मिती करीत आहे. 

याहू : संधी गमावणे

याहूची मेल सर्व्हिस आणि सर्च इंजिन २००० पर्यंत जगभरात अत्यंत लोकप्रिय होते. मात्र गुगल, मोझिला, ऑपेरा या नवीन सर्च इंजिनमुळे त्यांना स्पर्धा मिळू लागली. दरम्यान याहूच्या मेल सर्विसला सोडून लोकांनी गुगलच्या जी मेलला पसंती दिली. आणि त्यानंतर याहूला उतरती कळा लागली. २००८ मध्ये मायक्रोसॉफ्टने याहूला विकत घेण्यासाठी ४४.६  बिलियन डॉलर देऊ केले होते. मात्र याहूने ही ऑफर धुडकावून लावली. २०१७ मध्ये व्हेरिझॉन मोबाईल या कंपनीने याहूच्या ऑनलाइन बिझनेसचे बहुतांश हक्क केवळ ४.४८ बिलियन डॉलरला विकत घेतले. 


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


काही उद्योजकांच्या या चुकांनी संबंधित उद्योग क्षेत्रांना कायमचे बदलून टाकले. बाजारात आघडीवर असल्यामुळे  आलेली बेफिकीरी आणि आपल्या प्रतिस्पर्धीना कमी लेखण्याची चूक या उद्योगांनी केली होती. बाजारानुरूप आपल्या उत्पादनात किंवा आपल्या सेवेत कोणतेही बदल न करणे हे या कंपन्यांना महागात पडले. म्हणून आपली चलती असेलल्या काळात कधीही इतरांना कमी लेखू नका. त्याचप्रमाणे बिझनेस विकताना किंवा भागीदारी करताना फार भावनिक न होता, व्यावसायिक दृष्टिकोनातून निर्णय घ्या. बिझनेस क्षेत्रातील या चुकांमधून प्रत्येक उद्योजक धडा घेऊ शकतो.