अझीम प्रेमजी: सामाजिक भान असलेले उद्योगपती!

अझीम प्रेमजी: सामाजिक भान असलेले उद्योगपती!


अनेकांना स्वतःचे स्वप्न सोडून देऊन वडिलोपार्जित व्यवसाय करावा लागतो. केवळ कुटुंबाच्या आग्रहाखातर किंवा येणाऱ्या कठीण प्रसंगाच्या वेळी शिक्षण किंवा स्वतःचे आवडते फिल्ड/ शिक्षण सोडून आपल्या फॅमिली बिझनेसमध्ये घुसावे लागते. मग स्वतःची इच्छा असो वा नसो.. 

अशीच काहीशी कथा विप्रो कंपनीचे संस्थापक व पूर्व अध्यक्ष अझीम प्रेमजी यांची आहे...

२४ जुलै १९४५ रोजी अझीम प्रेमजी यांचा जन्म गुजरातच्या एका मुस्लिम कुटुंबात झाला. प्रेमजी यांचे आजोबा ब्रिटिशांच्या काळात अनेक देशांत तांदूळ निर्यातीचा व्यवसाय करीत होते. त्यांना ‘राईस किंग’ म्हणूनही ओळखले जात होते. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आपल्या देशप्रेमामुळे अझीम यांचे वडील मोहम्मद हशेम प्रेमजी हे देशप्रेमामूळे पाकिस्तानमध्ये स्थलांतरीत न होता भारतातच राहिले...


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


भारतात त्यांचा ‘वेस्टर्न इंडिया प्रॉडक्ट्स’ या नावाने वनस्पती तेल, तूप व साबण निर्मितीचा व्यवसाय होता. या कंपनीच्या आद्याक्षरापासून ‘विप्रो’ हा शब्द तयार झाला.. 
अझीम यांचे वडील मोहम्मद हशेम प्रेमजी यांचे अचानक निधन झाल्याने वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्यावर कंपनीची जबाबदारी आली. त्या वेळी विप्रो ही कंपनी खूप लहान होती.. तेव्हा अझीम अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवीचे शिक्षण घेत होते. १९६६मध्ये कंपनीची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आली.. त्यामुळे त्यांना पदवीचे शिक्षण मध्येच सोडून भारतात परतावे लागले. भारतात परतून त्यांनी वडिलांच्या लहान कंपनीत काम करणे सुरु केले. त्यांनतर वेगवेगळ्या क्षेत्रात कंपनीचा मोठा विस्तार होत गेला... 

आपल्यासारखे अनेक उद्योग पुढे येत आहेत, अनेक तंत्रज्ञान येत आहेत हे पाहून अझीम यांनी आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त गोष्टी घेतल्या. नव्या तंत्रज्ञानाची पारख करून तांदूळ, साबण, तेल, तूप या पारंपरिक धंद्यांच्या विस्तारीकरणासह त्यांनी अन्य क्षेत्रांतही पदार्पण केले..


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


विप्रो टेक्नॉलॉजिस, विप्रो प्लुइडपॉवर, लायटिंग, इन्फ्रास्ट्रक्चर, इकोएनर्जी, मॉड्युलर फर्निचर अशा अनेक कंपन्या काढल्या. माहिती तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले, हे वेळीच हेरून त्या क्षेत्रात त्यांनी विप्रो इन्फोटेक, माइंडट्री, नेटक्रॅकर अशा कंपन्यांद्वारा कॉम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रावर जागतिक स्तरावर आपली छटा उमटवली...
या सर्वांसोबत अझीम प्रेमजी समाजकार्यासाठी सुद्धा ओळखले जातात. त्यांच्या मालकीचे १८% शेअर्स ते समाजकार्यासाठी दान करतात. या पैशाचा उपयोग अझीम प्रेमजी ट्रस्टच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यासाठी आणि खास करून शैक्षणिक कार्यासाठी केला जात आहे...
आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारचे कार्य करणाऱ्यांतील वॉरन बफेट, बिल गेट्स यांच्या ‘गिव्हिंग प्लेज’ नामक मोहिमेत सहभागी होणारे प्रेमजी हे पहिलेच भारतीय उद्योजक आहेत. २००१ पासून त्यांची ‘अझीम प्रेमजी फाउंडेशन’ ही संस्था त्यासाठीच कार्यरत आहे...
आज विप्रो उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल अब्जावधी रुपयांची आहे. ‘फोर्ब्स’च्या सर्वेक्षणानुसार ते भारतातील आणि जगातील आघाडीच्या श्रीमंतांच्या यादीत मोडतात. ‘एश‌िया वीक’ने सन २०००मध्ये त्यांना जगातील पहिल्या वीस पॉवरफुल म्हणजे सामर्थ्यशाली उद्योजकात समाविष्ट केले होते.. ‘टाइम्स'ने २००४मध्ये त्यांना जगातील एक प्रभावशाली उद्योजक म्हणून गौरविले होते. त्यांच्या योगदानाबद्दल २००९मध्ये त्यांना अमेरिकेतील वेस्लेयन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान केली. भारत सरकारने त्यांचे औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक कार्य, दानशूरता हे सगळे लक्षात घेऊन २००५ मध्ये ‘पद्मभूषण’ आणि २०११मध्ये ‘पद्मविभूषण’ या पुरस्कारांनी गौरविले..


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


या वर्षीच म्हणजे जुलै २०१९ मध्ये विप्रोच्या अध्यक्षपदावरून अझीम प्रेमजी यांनी निवृत्ती घेतली. पण निवृत्तीपूर्वी त्यांनी त्यांच्या वडिलांच्या विप्रो या कंपनीला यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवले. गेल्या ५३ वर्ष कंपनीच्या प्रमुखाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता त्यांचा मुलगा रिषद प्रेमजी हा विप्रोचे कमान सांभाळत आहे... अझीम प्रेमजी यांनी आपल्या व्यवसायाचा अफाट विस्तार केला आणि विप्रोला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अव्वल दर्जाची कंपनी म्हणून जगात ओळख मिळवून दिली...
नवीन युवकांसाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी अनेक रोजगार उपलब्ध केले. आंतराराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक क्षेत्रात भारताची वेगळी ओळख निर्माण करण्यास अझीम प्रेमजी यांचा मोलाचा वाटा आहे...