एका वर्षात तुमचे संपूर्ण जीवन बदला..

एका वर्षात तुमचे संपूर्ण जीवन बदला..


तुम्ही आज काय निर्णय घेत आहात यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे. तुम्ही जो निर्णय आज घेता तो तुम्ही तुमच्या भविष्यासाठी निर्णय घेता. प्रत्येकाला आयुष्यात यश हवे असते. त्यासाठी अनेकजण परिश्रम घेण्याची तयारी सुद्धा दाखवतात. मेहनत केल्याने यश तर मिळतेच शिवाय आपले संपूर्ण जीवनच बदलते... आपल्या आयुष्यात अनेकदा कठीण परिस्थिती उद्भवतात. त्यांपासून पळून जाणे हा काही त्यावरील उपाय नव्हे. तर त्या कठीण परिस्थितीचा सामने करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे... 


10X MBA Online ॲप डाऊनलोड करा


अशा परिसथितीशी सामना करूनच आपल्याला आपल्यामधील सामर्थ्याचे परीक्षण करता येते. यामुळे आपण नक्कीच सकारात्मक विचार करायला लागतो, समस्येशी दोन हात करतो आणि यशाकडे वाटचाल करतो. यामुळे आपले संपूर्ण जीवनच बदलते... 

पुढील काही मूल्यांचे पालन करून आपण एका वर्षात आपले जीवन सकारात्मक विचारांनीं बदलू शकतो आणि यश मिळवू शकतो. 


१) तुमच्या ध्येयाशी वचनबद्ध रहा - 

तुमचे ध्येय काय आहे आणि तुम्हाला त्यातून काय मिळवायचे आहे हे सर्वप्रथम तुम्ही ठरवणे महत्त्वाचे असते. जर तुमचे निश्चित ध्येयच नसेल तर तुम्ही पुढे जाऊच शकणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्वात आधी तुमचे ध्येय ठरवा. तुम्ही जे ध्येय ठरवाल ते तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरेल. भविष्यात तुम्हाला काय करायचे आहे यासाठी तुम्ही ठरवलेल्या ध्येयावर काम करणे आवश्यक आहेच शिवाय त्या ध्येयांशी आपण वचनबद्ध राहिले पाहिजे. आपल्या ध्येयांवर तुम्ही ठाम असाल तरच तुम्ही ती ध्येये पूर्ण करण्यासाठी तेवढे परिश्रम घ्याल आणि तेवढ्याच जोमाने यशाकडे वाटचाल कराल. 


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


२) ध्येयांशी संबंधित कौशल्य निर्माण करत रहा - 

तुमच्यामध्ये असणाऱ्या कौशल्यांचा शोध घ्या. ती कौशल्ये तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी नक्कीच मदत करतील. या कौशल्यांचा वापर करून ध्येयाकडे वाटचाल करता येते आणि यश मिळवता येते. आपल्या ध्येयांशी संबंधित नवनवीन कौशल्ये आपल्याला स्वतःच निर्माण केली पाहिजे. त्या नवनवीन कौशल्यांमुळे आपल्या ध्येयाकडे जाणारा मार्ग आणखी सुकर होतो. ही कौशल्ये आपल्याला कधीही कामी येऊ शकतात. तुमच्याकडे जितकी जास्त कौशल्ये तेवढा ध्येयाकडे जाणारा मार्ग सोपा होत जातो. 


३) स्वतःमध्ये गुंतवणूक करा - 

तुम्हाला ध्येयप्राप्तीसाठी स्वतःवर विश्वास ठेवणे जास्त आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास असला की माणूस कोणत्याही समस्येशी लढा देऊ शकतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. स्वतःला वेळ द्या. ज्या गोष्टी आवडतात त्यांच्यासाठी वेळ द्या. नवनवीन कलात्मक गोष्टी शिका. तुम्हाला ज्या गोष्टींमुळे भविष्यात फायदा होणार आहे त्या आत्मसात करा. जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. स्वतःमध्ये गुंतवणूक करा. 


४) नकारात्मक लोकांना जीवनातून बाहेर काढा - 

ज्या प्रमाणे आपण सकारात्मक गोष्टी आत्मसात करायला हव्या त्याचप्रमाणे आपल्याला नकारात्मक गोष्टी, व्यक्तींपासून दूर रहायला हवे. यशाच्या जवळ जाण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी अशा लोकांपासून आपण दूर राहणेच योग्य आहे. अशा लोकांकडून आपल्यामध्ये नकारात्मकता पसरते. अनेक जण नेहमीच सगळ्या गोष्टींबद्दल रडत बसतात किंवा एखाद्या गोष्टीबद्दल खूपच नकारात्मक विचार करत असतात. अशा लोकांच्या संगतीत राहून आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही हे ध्यानात ठेवावे. त्यामुळे आपली प्रगती बघून जाळणारे लोक, आपल्याला खाली खेचणारे लोक, आपल्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण निर्माण करणाऱ्या लोकांना आपल्या जीवनातून बाहेर काढा. 


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


५) नम्रतेने वागा - 

जो नम्र असतो तो सर्वांना जोडून ठेवतो, म्हणून तो सर्वांना आवडतो. जो अहंकारी असतो तो कुणालाही आवडत नाही. त्यामुळे आपण सर्वांशी नेहमी नम्रतेने वागले पाहिजे. राग करणे आपल्या स्वास्थासाठी तसेच आपल्या कामासाठी चांगले नसते. लोकांना नम्रतेची भाषा लवकर कळते आणि त्यामुळे लोकांच्या भावना सुद्धा दुखावल्या जात नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीमध्ये जर तेथील बॉस सर्व कर्मचाऱ्यांशी नम्रतेने व आनंदाने वागत असेल तर अशा कंपनीचे वातावरण सुद्धा खेळीमेळीचे आणि चांगले असते. जस बॉस वागतो त्याचप्रमाणे तिकडचे कर्मचारी सुद्धा वागतात. नम्रता आपल्याकडे असलेल्या सकारात्मक गुणांपैकी एक आहे. आपल्याला यशस्वी होण्यासाठी नक्कीच या गुणांचा कुठे ना कुठे फायदा जरूर होतो. 


६) चुकांमधून शिका - 

आपण ज्या चुका करतो, त्या वाईट नसतात. अशा झालेल्या चुकांमुळे खचून न जात त्यातूनच आपण शिकायला पाहिजे. चुकांमधून आपल्याला खूप अनुभव मिळतात, खूप काही शिकायला मिळते. तेव्हा चुकांना कधीही घाबरू नका. झालेल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा. ही आपल्या ध्येयाच्या दिशेने नेणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या चुकांमधून आपण खूप काही शिकतो, पण याचा अर्थ आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करणे असा नव्हे. आपल्याकडून एक चूक झाली असता पुन्हा ती चूक होऊ नये यासाठी खबरदारी घेऊन काय नाही करायचे हे आपल्याला कळते. त्यामुळे आपल्या चुकांमधून शिका आणि पुढे जा.