यशस्वी होण्यासाठी अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचे 5 नियम पाळा!

यशस्वी होण्यासाठी अर्नोल्ड श्वार्झनेगर यांचे 5 नियम पाळा!

यश काही सहजासहजी मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाला ज्या प्रमाणे अनेक प्रयत्न करावे लागतात, तसेच अनेक नियमांचे पालन सुद्धा करावे लागते. अशाच काही नियमांचे पालन करून पुढे आलेले बॉडीबिल्डर आणि पॉवरलिफ्टर अर्नोल्ड श्वार्झनेगर… अर्नोल्ड एवढ्यावरच थांबले नाही त्यांनी पुढे हॉलीवुडमधील चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम केले, चित्रपटांचे निर्माण केले अनेक पुस्तकांचे लेखन केले तसेच राजकारणामध्येही त्यांनी त्यांचा ठसा उमटवला. हे सारे शक्य झाले त्यांनी पाळलेल्या नियमांमुळे…


अर्नोल्ड यांना सामान्यत: बॉडीबिल्डर आणि हॉलिवूडचा एक अभिनेता म्हणून ओळखले जाते. २००३ ते २०११ पर्यंत ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याचे ते गव्हर्नर होते. राज्याचे गव्हर्नर या पेक्षाही ऍक्शन चित्रपटातील भूमिका व शरीरसौष्ठव या खेळ प्रकारातील कारकीर्दीसाठी संपूर्ण जगभर त्यांचे चाहते आहेत. शरीरसौष्ठवातील निर्विवाद बादशहा म्हणून आजही त्यांना ओळखले जाते.


अर्नोल्ड यांनी जीवनात अनेक चढ-उताराचा सामना केला आहे. परंतु एक यशस्वी पुरुष म्हणून ते आता त्यांचे जीवन जगत आहेत. त्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी ५ नियमांचे पालन केले होते. त्याच ५ नियमांचे पालन करून तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात आणि तुम्हाला हव्या असणाऱ्या व्यवसायात नक्कीच यशस्वी होऊ शकता. तर काय होते हे नियम? चला बघुयात..


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा 


१) तुमचे ध्येय निश्चित करा आणि त्यांचे अनुसरण करा - जर तुमच्याकडे दूरदृष्टी नसेल, पुढे जाण्यासाठी निश्चित ध्येय नसेल तर तुम्ही कधी यशस्वी होणार नाही. कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदी करू शकणार नाही. तुमचे ध्येय निश्चित असेल तर तुम्ही नक्कीच त्यासाठी पूर्ण प्रयत्न कराल. म्हणून सर्वात पहिले तुम्हाला तुमचे ध्येय निश्चित करा, बाकी सगळे तुमचे अनुसरण करतील.


२) कधीही लहान विचार करू नका - तुमचे ध्येय निश्चित करताना कधीही लहान विचार करू नका. नेहमी मोठा विचार करा. लहान विचार करत राहिलात तर तुम्ही कधीही कोणते मोठे काम करू शकणार नाही. जसे की तुम्हाला फक्त व्यवसाय उभा करायचा नाहीये, त्या व्यवसायात यश मिळवून शिखर गाठायचे आहे हे समजा.


३) नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा - तुम्ही निश्चित केलेली मोठी स्वप्ने, मोठे ध्येय बघून तुमच्या आजूबाजूचे लोक तुमची मस्करी करतील, किंवा तुमच्या स्वप्नांबद्दल ऐकून 'तुम्ही ते करूच शकणार नाही', 'तू हे करणे अशक्य आहे', असे बोलतील. पण तुम्ही त्या सर्वांकडे दुर्लक्ष करायला हवे जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करतात. अशा लोकांकडे नेहमीच दुर्लक्ष करायला हवे जे नकारात्मक विचार करतात.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 


४) मेहनतीने काम करा - तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तेवढीच मेहनत घेणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणता बिझनेस करायचा आहे हे तुम्ही ठरवले असेल तर तो यशस्वी करण्यासाठी तुम्हाला १०१% मेहनत ही घ्यावीच लागते. तुमच्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुमची मेहनत महत्त्वाची आहे.


५) फक्त घेऊ नका, परत सुद्धा द्या - तुम्ही जर दुसऱ्यांची मदत घेत असाल तर दुसऱ्यांना मदत करण्यास मागेपुढे पाहू नका. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना आपल्या मदतीची गरज असते. तुमच्या यशात इतरांचा वाटा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच त्यांच्या आनंदात तुमचा वाटा द्यायला हवा. ज्यांना मदतीची गरज असते त्यांना नक्कीच मदत करावी.