चिंध्यांमधून शॉपिंग बॅग्स आणि बेडशीट्स तयार करणारा बिझनेसमन...

चिंध्यांमधून शॉपिंग बॅग्स आणि बेडशीट्स तयार करणारा बिझनेसमन...

आपल्या देशामध्ये कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या ज्ञानी लोकांची कमतरता नाही. एवढचं नव्हेतर अनेक भारतीय नागरिक अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यासारख्या प्रगत देशात काम करण्यासाठी जातात. नामी कंपन्या, सरकारी कार्यालये आणि स्टार्ट अपमध्ये काम करुन ते आपल्या ज्ञानाची क्षमता संपूर्ण जगासमोर दाखवित आहेत. 

दरम्यान, एका मुंबईकराने प्रगत देशात न जाता भारतात मुंबईमध्येच काम करणे पसंत केले. आणि त्यातून तो त्याचे प्रोडक्ट पाश्चिमात्य देशात इक्सपोर्ट करीत आहे. तर आज पाहू यात एक वेगळी प्रेरणादायी स्टोरी... जयदीप सजदेह - चिंध्यांमधून शॉपिंग बॅग्स आणि बेडशीट्स तयार करणारा बिझनेसमन... 

स्वेटर तयार करण्याचा वडिलोपार्जित व्यवसाय... जयदीप सजदेह यांच्या वडिलांचा स्वेटर तयार करण्याचा व्यवसाय होता. ठाणे शहराजवळील भिंवडी येथे त्यांचा छोटेखानी व्यवसाय होता. त्यातून मिळणा-या पैशात हे कुटुंब सुखी होते.


चिंध्यांमधून बॅग्स तयार करण्याची कल्पना... आपल्या वडिलोपार्जित व्यवसायात जयदीप कधी-कधी लक्ष घालीत असत. तेव्हा त्यांच्या ध्यानी आले की, स्वेटर तयार करण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे कापड लागत आणि एकदा का स्वेटरच्या आकाराचे कापड कापल्यावर त्यातून अनेक चिंध्या उरतात. त्यांनी विचार केला, आपण याचा चांगला उपयोग करु शकतो.

टाकाऊ चिंध्यांपासून टिकाऊ बॅग्स तयार केल्या... जयदीप सजदेह यांना सुचलेली अभिनव कल्पना लगोलग त्यांनी अंमलात आणायला सुरुवात केली. 15 लाखांची गुंतवणूक आणि सोबतीला 12 कुशाग्र कामगार यांच्या जोडीने जयदीप यांनी बिझनेसला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या बिझनेसचे नामकरण "Texool Limited" असे केले. 


फाईव्ह स्टार हॉटेल्समधील जुन्या बेडशीट्सचा योग्य वापर... जयादीप यांनी फक्त चिंध्यांच नाहीतर  पाश्चिमात्य देशातील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये वापरली जाणारी बेडशीट्सचा वापर करुन बॅग्स बनविण्यास सुरुवात. मोठ-मोठी हॉटेल्सकडून जुने बेडशीट्स घेऊन त्यांनी टाकाऊपासून टिकाऊ बॅग तयार केल्या. अशाप्रकारे पर्यावरणपूरक व्यवसायिक म्हणून त्यांचे नाव मोठे झाले.

बिग बाझार, हायपर सिटी, डी मार्टमध्ये टेक्सूलच्या बॅगा वापरतात... जयदीप सजदेय यांच्या 'ऑथेनटिक ग्रीन' या बॅगांना सर्व स्तरातून मागणी होत होती. दरम्यान, बिग बाझार, हायपर सिटी, डी मार्टमध्येही त्यांचा कापडी बॅगांची मागणी वाढली. तेवढ्यात प्लॅस्टिक बंदीचाही जयदीप यांच्या बिझनेसला हातभार लागला. 

त्यांच्या कापडी पिशव्यांची किंमत 29 रुपयांपासून 450 रुपयांपर्यंत आहे. अशात-हेने जयदीप यांनी त्यांचा बिझनेस काही वर्षांतच 12 लाखांपासून 4 कोटींपर्यंत नेला. आज ते Disney, Mattel, Colgate and Steve Madden अशा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड्सला त्यांची सेवा पुरवित आहेत.