ग्राहकांना ऑफर किंवा डिस्काऊंट देणे का गरजेचे आहे?

ग्राहकांना ऑफर किंवा डिस्काऊंट देणे का गरजेचे आहे?

ऑफर्सचे महत्त्व... बिझनेसमध्ये सध्याच्या काळात ऑफर्स आणि डिस्काऊंटचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बिझनेस कोणताही असो उत्पादन, सेवा किंवा ग्राहकवर्ग वाढविण्यासाठी ऑफर्स आणि डिस्काऊंट महत्त्वाची भूमिका निभावतात. म्हणूनच कंपनी किंवा बिझनेस हाऊसेस ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटचे देऊ करतात.

पाहू यात काही ऑफर्स आणि डिस्काऊंट ज्यांनी मार्केटमध्ये कंपनीचा उत्पादन किंवा सेवेचा खप अधिक वाढवला आहे...

डॉमिनो’झ पिझ्झा... 30 minutes or free - डॉमिनो’झ पिझ्झाने आपल्या पिझ्झाचा खप होण्यासाठी 30 minutes or free ही ऑफर सुरु केली. पिझ्झाची ऑर्डर दिल्यानंतर 30 मिनिटांनंतर पिझ्झा आपल्या घरी पोहोचला नाही तर कंपनी तुम्हाला तो पिझ्झा मोफत देते. दरम्यान, अनेक पिझ्झाप्रेमी 30 minutes or free या ऑफरमुळे पिझ्झा मागवतात आणि कंपनीचा खप वाढला होता.


मेक माय ट्रिप...  मेक माय ट्रिप या ऑनलाईन ट्रॅव्हल पोर्टलवरुन विमानप्रवास, हॉटेल्स, बस, कॅब आणि होमस्टेचे बुकिंग करू शकतो. कंपनीने हॉटेल बुकिंगसाठी उत्तम ऑफर आणली आहे. मेक माय ट्रिपवरुन जर तुम्ही बूक केले तर पहिला दिवस तुम्ही फुकटात राहू शकता.


फेडेक्स... FedEx या कुरिअर डिलेव्हरी सेवा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर्स आणल्या आहेत. FedEx ने डिस्काऊंट कुपन कोड, स्टुडंट ऑफर, राखी ऑफर आणि मॅंगो ऑफर या ऑफर्स आणल्या आहेत. यातील राखी आणि स्टूडेंट ऑफर कमालीची यशस्वी ठरली.


अजून काही ऑफर्स... फ्लिपकार्ट, स्नॅपडील आणि अमेझॉन दिवाळीदरम्यान ‘बिग बिलीयन डे’ अशा ऑफर आणते. तसेच अनेक कंपन्या आपली सेवा किंवा उत्पादनांची जास्तीत जास्त विक्री होण्यासाठी ऑफर्सचा पर्याय निवडतात.

दरम्यान, 'स्नेहलनीती'सुद्धा सेमिनार तसेच अनेक प्रोडक्ट आणि सेवांसाठी वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्काऊंट ठेवते. त्याबद्दल अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा --> http://snehalniti.com/event.php