प्रसन्न पटवर्धन - एक बास्केटबॉलपटू ते 300 कोटींच्या कंपनीचा मालक!

प्रसन्न पटवर्धन - एक बास्केटबॉलपटू ते 300 कोटींच्या कंपनीचा मालक!

"नियतीच्या मनात आपल्यासाठी काय असते, ते आपल्या काहीच कळत नाही. आपण फक्त त्याच्या हातातील बाहुल्या आहोत, जसं तो चालवतो तसं आपण चालयचं असतं." असे भावनात्मक संवाद आपण अनेक चित्रपटात ऐकले असतील. पण ही गोष्ट ख-या आयुष्यात झाली तर... होय, अस घडलं आहे. एका तरुणाचे स्वप्न काही वेगळचं पाहिलं होत पण नियतीला काही वेगळचं मान्य होतं... आज तो मराठी उद्योजक ट्रॅव्हल कंपनीचा मालक आहे आणि त्या कंपनीचा टर्न ओव्हर 300 कोटी रुपयांहून अधिक आहे. तर आज आपण पाहू यात मराठमोळ्या प्रसन्न पटवर्धन यांचा जीवनप्रवास!


पुण्यात व्यवसायाला सुरुवात... पुणे शहर ही पटवर्धन कुटुंबियांची कर्मभूमी असे म्हणायला हरकत नाही. 1960 साल भारत देश वेगवेगळ्या संक्रमणातून जात होता. अशाच वातावरणात पटवर्धन कुटुंबिय पुण्यातल्या छोटेखानी घरात गुण्यागोविंदाने राहत होते. साधारण 1964 साली प्रसन्न पटवर्धन यांच्या वडिलांनी 'प्रसन्न ट्रॅव्हल्स' हा छोटेखानी वाहतूक व्यवसाय सुरु केला. पुणे विद्यापीठातील कर्मचा-यांना वाहतूक सेवा पुरविण्याची जबाबदारी प्रसन्न यांच्या वडिलांवर होती. तर वडिलांचे बंधू यांचा हॉटेल आणि डेअरीचा बिझनेस होता.


स्टेट लेव्हल बास्केटबॉलपटू... प्रसन्न पटवर्धन यांच्या बाबतील सांगायचे तर त्यांनी मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. तसेच ते स्टेट लेव्हल बास्केटबॉलपटू होते. या खेळात भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्व करायचं, हे त्यांचे स्वप्न होते; पण नियतीला काही वेगळचं मान्य होतं. प्रसन्न यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आणि त्यांचं हे स्वप्न भंगलं.


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


पुणे विद्यापीठाच कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं... प्रसन्न यांचे वडील केशव पटवर्धन यांच्याकडे पुणे विद्यापीठाच्या वाहतुकीचे कॉन्ट्रॅक्ट होतं. पण काही बदलांमुळे हे कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं. एका वेळेस त्यांच्यावर बिझनेस बंद करण्याची पाळी आली होती. तेव्हाच प्रसन्न यांनी ओळखलं आपल्या वडिलोपार्जित व्यवसायाला आपली गरज आहे. मॅनेजमेंट कोळून प्यायलेले प्रसन्न यांनी आपल्या वडिलांचा व्यवसायात लक्ष घ्यायला सुरुवात केली.बिझनेसमध्ये वेगवान बदल केले... सर्वप्रथम वडिलांच्या बिझनेसमध्ये आल्या-आल्या त्यांनी बिझनेसमध्ये वेगवान बदल करायला सुरुवात केली. वडिलोपार्जित व्यवसाय बाबाआदमच्य जमान्यासारखा होता. सर्वप्रथम प्रसन्न यांनी ऑफिसची डागडुजी केली. गाड्यांमध्ये साफसफाई, म्युझिक सिस्टीम, एअर कंडिशनर अशा अनेक सुविधा त्यांनी ग्राहकांना दिल्या. प्रसन्न ट्रॅव्हल्स आता वडिलोपार्जित व्यवसायाकडून कॉर्पोरेट कंपनी बनत चालली होती. 1985 साली ते तीन लाख रुपये कमवित असत पुढील 10 वर्षात त्यांनी 10 कोटींची मजल मारली होती. फिलिप्स, टेल्को सारख्या कंपन्या प्रसन्न ट्रॅव्हलच्या ग्राहक यादीत होत्या. तसेच दिवसागणिक कंपनीतील गाड्या, टेम्पोची संख्या वाढत चालली होती.


स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 


कंपनीचा बस सेवेत प्रवेश... 1988 साली प्रसन्न यांनी बस वाहतूक सेवेत प्रवेश करायचे ठरवले. त्यांनी आपल्या ताफ्यातील चार कार, दोन टेम्पो विकून 10 लाख रुपयांची गुंतवणूक करुन एसी बस विकत घेतली. पहिली बस सेवा महाबळेश्वर-पुणे अशी सुरु केली. प्रसन्न सांगतात की, "आम्ही यामध्ये अपयशी ठरलो. पुढे आम्ही बस मार्ग बदलले. त्यानंतर आम्हाला चांगल प्रॉफिट मिळत गेलं." पुढील चार वर्षात प्रसन्न यांनी कोल्हापूर-पुणे, अकोला-पुणे आणि बंगलोर-पुणे या मार्गावर बस सेवा सुरु केल्या. यानंतर बस सेवा हा प्रसन्न ट्रॅव्हल्सचा मुख्य व्यवसाय बनला. 


50 कोटींची गुंतवणूक... 2009 साली प्रसन्न यांच्या बिझनेसमध्ये मोठी गुंतवणूक आणली गेली. अंबित प्राग्मा वेन्चर्सने प्रसन्न ट्रॅव्हल्समध्ये 50 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर कंपनीने मागे वळून पाहिले नाही. पुढे प्रसन्न ट्रॅव्हल्स 'प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्यूशन' म्हणून ओळखला जाऊ लागला. आज कंपनीच्या मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि दिल्ली राज्यात 1,000 बस रस्यावर धावतात, त्यापैकी 750 बस कंपनीच्या स्वतःच्या आहेत. 


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


300 कोटींचा टर्न ओव्हर... वाहतुक क्षेत्रातील महत्त्वाच्या असलेल्या 'प्रसन्न पर्पल' वाहतूक क्षेत्रात 40 वर्षे पूर्ण केले. कंपनीत चार हजारांहून अधिक मनुष्यबळ आहे. देशभर कंपनीची 1,300 हून अधिक वाहने सेवा पुरवतात. शहर, इंटरसिटी, कर्मचारी, स्कूलबस, ‘हॉप ऑन हॉप ऑफ’, लक्झरी बस सेवा सेवांमध्ये ही कंपनी सध्या मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. तसेच खेळाडूंचे दौरे, कलाकारांची वाहतूक व्यवस्थेसाठीही प्रसन्न त्यांच्या वाहतूक सेवा पुरवतात. 


आज या कंपनीचा टर्न ओव्हर 300 कोटींहून अधिक आहे. तर मराठी उद्योजकांनो, आपणही भविष्यात अशी गरुडभरारी घेऊ शकतो, फक्त मेहनत, जिद्द आणि चोख काम करा यश आपलेच आहे!