मराठी उद्योजक मॅनेजमेंटमध्येच का मागे पडतात???

मराठी उद्योजक मॅनेजमेंटमध्येच का मागे पडतात???

मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन! कोणतेही काम योग्यत-हेने, चोख आणि वेळेवर करण्यासाठी त्या कामाचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्वाधिक मराठी उद्योजक मॅनेजमेंटमध्ये मागे पडतात आणि त्यामुळे मराठी उद्योजकांचे व्यवसाय मोठे होत नाहीत. म्हणूनच मराठी उद्योजकांमधून टाटा, अंबानी येत नाही… याची कारणं आज आपण पाहणार आहोत.


कोणती आहेत कारणं... अनेक मराठी उद्योजक सर्व कामं स्वतःहून करण्यावर भर देतात. उदा. कर्मचारी वेळेवर आला की नाही, बॅंकेतून कॅश आणायची तर चेकवर सही करणे, कर्मचा-यांना पगार देणे अशी, लहानसहान कामे मराठी उद्योजक करतात आणि आपला मौल्यवान वेळ वाया घालवतात.


या कारणांचा आधार काय... आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ही सर्व कारणं आम्ही कोणत्या आधारावर देत आहोत? हा प्रश्न साहजिक आहे... याच उत्तर पुढीलप्रमाणे. तुम्हा सर्वांना माहीत आहेत बिझनेस कोच स्नेहल कांबळे महाराष्ट्रभर सेमिनार आणि सेशनद्वारे मराठी उद्योजकांना बिझनेसचे मार्गदर्शन करीत असतात. या सेमिनार आणि सेशनदरम्यान केलेल्या संशोधनाद्वारे ही कारण आम्हाला समजली आहेत. आता या गर्तेतून बाहेर कसे पडायचं... 


भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा


मराठी उद्योजकांनो, मला तुम्हाला सांगायचे आहे की... तुम्ही बिझनेसमन आहात. तुम्ही बिझनेसचे मालक आहात. कर्मचा-यासारखे वागू नका. तुम्ही दुस-यांकडून काम करुन घ्या. तुम्ही कधी पाहिलयं मुकेश अंबानी कर्मचा-यांचे पगार काढतायतं? टाटा-बिर्ला बॅंकेतून पैसे काढण्यासाठी बॅंकेच्या बाहेर उभे आहेत… असं चित्र पाहिलयं का??? मग उद्योजकांनो तुम्ही का तुमचा वेळ छोट्या कामांवर वाया घालवता… 


स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 


बिझनेसमनने फक्त बिझनेसवाढीवर आणि बिझनेसवर देखरेख करायची असते आणि हेच उद्योजकाचे काम असते. यासाठी मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन महत्त्वाचा घटक आहे.

आता पाहू यात मॅनेजमेंटचा तुमच्या बिझनेसला कसा उपयोग होतो...

मॅनेजमेंटमुळे तुमच्या बिझनेस किंवा कंपनीत सर्वोत्तम लीडरशीप तयार होते तर चोख काम करण्याचे motivation मिळते.

मॅनेजमेंटमुळे तुम्ही ठेवलेली कंपनीची ध्येये आणि ग्रोअथ सुलभ होते. तसेच कर्मचा-यांची कार्यक्षमताही वाढते.

व्यवस्थापनामुळे कंपनीत स्पर्धा वाढते यामुळेच कंपनीचे प्रोडक्ट सेवा जास्तीत जास्त विकल्या जातात.

मॅनेजमेंटमुळे professionalism तयार होण्यास मदत होते तसेच कंपनीची वाढ होण्यासही मदत होते.


बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा


मराठी उद्योजकांनो कोणत्याही मोठ्या बिझनेस इंडस्ट्रीजचे उदाहरण घ्या. टाटा, बिरला, रिलायन्स तसेच मराठीतले किर्लोस्कर, काटकर, बीव्हीजी. कोणत्याही कंपन्या घ्या. त्यांच्या मॅनेजमेंटमुळेच मोठ्या झाल्या आहेत. जर तुम्हाला तुमची कंपनी मोठी करायची असल्यास मॅनेजमेंटवर भर द्या.