एकेकाळी समोसे-भजी विकणारा आज आहे 1,800 कोटींच्या बालाजी वेफर्सचा मालक!

एकेकाळी समोसे-भजी विकणारा आज आहे 1,800 कोटींच्या बालाजी वेफर्सचा मालक!

अपयश हे आपल्या जीवनातील कटू सत्य आहे. आपण किती त्याला नाकारण्याचा प्रयत्न केला तरी ते आपल्याला अलिंगन देतेच; पण जसे अपयश येथे आपल्याला जगण्याची, झगडण्याची नवी उमेद देऊन जाते. कितीही काळकुट्ट अंधारी रात्रं असू द्या, काही तासांनी सुर्याचा प्रकाश त्यावर मात करतो. तसेच यश अपयशावर मात करते. असाच ग्वाही देणारा चंदूभाई विरानी यांचा जीवनप्रवास आहे. एकेकाळी सिनेमा थियेटरमध्ये समोसे-भजी विकणारे चंदूभाई आज 1,800 कोटी रुपयांच्या 'बालाजी वेफर्स' या कंपनीचे संस्थापका आहेत... तर मित्रहो, आज आपण चंदूभाई विरानी यांचा असामान्य असा जीवनप्रवास उलगडणार आहोत...

शेतकरी कुटुंबाततून सुरुवात... चंदूभाई विरानी यांचा जन्म गुजरात राज्यातील एका छोट्याशा खेड्यातील शेतकरी परिवारात झाला. चंदूभाई आणि दोन अशी तीन मुलं कुटूंबात होती. ही मुलं कधी-कधी आई-बाबांना शेतात मदत करीत असत. शेतातून जेमतेम ध्यान मिळत असे आणि दुष्काळ आला तर ते पण नाही, अशी काही अवस्था विरानी कुटुंबाची झाली होती.

पहिल्याच व्यसायात अपयश आले... आपल्याला जगायचं असेल तर शेती सोडून दुसरं काहीतरी करावं लागेल, असे चंदूभाईंच्या वडिलांनी त्यांच्या मुलांना सांगितलं. आणि 20,000 रुपये देऊन व्यवसाय सुरु करण्यास सांगितला. त्या मुलांनीही कोणताही विचार न करता शेती व्यवसायात पैसे गुंतवले; परंतु व्यवसायाबद्दल काहीच माहीत नाही, कोणती रणनिती नाही. अशात-हेने विरानी बंधूचे सर्व गुंतवलेले पैसे बुडाले.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

सर्व भावांनी राजकोटला पलायन केले... आता आई-वडिलांना काय तोंड दाखवायचे, या विचाराने विरानी बंधूनी जवळचे शहर म्हणजेच राजकोटला पलायन केले. नोकरी कुठेच मिळेना आणि मिळाली तर अंगमेहनतीच काम... दरम्यान, चंदुभाई यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी एका चित्रपटगृहातील कॅन्टिनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. समोसे-भजी हे खाद्यपदार्थ बनवणे आणि ते विकणे, असे त्यांचे काम सुरु झाले...

वेफर्स विकण्याची आयडिया सुचली... मेहनत आणि चोख काम करणे, हे गुण विरानी बंधूंमध्ये होते. कॅन्टिन मालकाला त्यांचे हेच गुण भावले. मालकाने कॅन्टिनचा कारभात त्यांच्या खांद्यावर टाकला. चंदुभाई त्यांचे काम आणि कॅन्टिनचा कारभार उत्तमतेने करीत असत. असे सुरु असतानाच सिनेमा पहायला येणारी मंडळी समोसे-भजीहून अधिक पॉपकॉर्न आणि वेफर्स खातात, हे चंदुभाई यांच्या ध्यानी आलं... 'काळ बदलतोय आपण पण बदललं पाहिजे...' म्हणून विरानी बंधूंनी कॅन्टिनमध्ये बटाट्याचे पॉपकॉर्न आणि वेफर्स ठेवायला सुरुवात केली.

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

मागणी जास्त आणि पुरवठा कमी... पॉपकॉर्न आणि वेफर्स म्हणजे फास्ट फूड आणि असे हे फास्ट फूड लहानांपासून थोरांना आवडतात. अशातच थियेटरमधील कॅन्टिनमधल्या वेफर्सला अधिक मागणी मिळू लागली. काही दिवसातच मागणी जास्त आणि पुरवठा कमी... ही परिस्थिती उदभवली. वितरक पुरवठा करण्यात फार दिरंगाई करीत असे. यामुळे ग्राहकांना कधी-कधी खाली हातच परत जावे लागत होते.

विरानी बंधूंनी वेफर्स तयार करण्याचा निर्णय घेतला... वितरकाची रोजची कटकट, ग्राहकांना नकार देऊन विरानी बंधूंना कंटाळा आला. सर्वांनी ठरवले बस्सं... आपण स्वतः वेफर्स तयार करायचे आणि विकायचे. काही काळात त्यांनी मशीन्स, कच्चा माल याबाबत संशोधन केले आणि 10,000 रुपये गुंतवूण वेफर्स बनवायला सुरुवात केली. काम भरपूर होते म्हणून तिघेही जणं मिळून हे काम करीत असत. काही अंतराने या व्यवसाय त्यांना यश मिळाले. आणखीन तीन सिनेमघराचे कॅन्टिन चालवयाला त्यांनी सुरुवात केली.

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

'बालाजी वेफर्स' कंपनीचे निर्माण... आतापर्यंत विरानी बंधूंच्या वेफर्सच्या चवीची भूरळ सर्वांना पडली होती. त्यांचे वेफर्स यांनी चित्रपटगृह कधीच पार केले. लोकं नुसते वेफर्स घ्यायला कॅन्टिनमध्ये येत असत. विरानी बंधूंनी बिझनेस मोठा करण्याचा विचार केला. लगेच राजकोटमध्ये त्यांनी कारखान्यासाठी जागा घेत वेफर्स बनविनारी कंपनी सुरु केली आणि त्याचे नामकरण 'बालाजी वेफर्स' असे केले.

आज देशात कंपनीचे चार मोठे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असून 20,000 अधिक डिलर्सचे नेटवर्क पसरले आहे. त्यांच्या प्लांटमधून दर दिवशी 6.5 लाख किलो वेफर्स आणि 10 लाख किलो स्नॅक्स तयार होते. तर विरानी बंधूंनी 5 हजाराहूंन अधिक लोकांना रोजगार दिला आहे. विरानी बंधूंची 'बालाजी वेफर्स' ही कंपनी 1,800 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल करणारी कंपनी बनली आहे. याचे श्रेय विरानी बंधूंच्या मेहनत, जिद्दी आणि कधीही न हार मानणा-या ॲटिट्युडला जाते. उद्योजक मित्रांनो आणि मैत्रिणींनो उद्योजकांचा ॲटिट्युड असाच असला पाहिजे!