फेसबुकची प्रतिस्पर्धी कंपनी 'गूगल प्लस' का बंद पडली...

फेसबुकची प्रतिस्पर्धी कंपनी 'गूगल प्लस' का बंद पडली...

2004 साली फेसबूक हे सोशल मीडिअम सुरु झाले आणि काही काळातच ते वेगाने वाढले. जसजसं फेसबुक वाढत जात होतं तसतसं फेसबुकने गूगलचे सर्वाधिक कर्मचारी फेसबुकमध्ये घेण्यास सुरुवात केली. गूगलच्या मॅनेजमेंटला वाटले फेसबुक आपल्या वर्चस्वाला धक्का देईल. म्हणून गूगलने फेसबुकशी स्पर्धा करण्यासाठी Google Plus हे गूगलचे सोशल मीडिअम निर्माण केले.

गूगलने Google Plus तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर साधनसंपत्ती आणि पैशांचा वापर केला गेला. कंपनीने वेगाने Google Plus चे काम पूर्ण केले; पण त्यामागे कोणतीही स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग नव्हतेजेव्हा Google Plus लॉन्च करण्यात आले तेव्हा सर्व टेकपंडितांना ते साधारण वाटलंफेसबुकसारखं कोणतही वेगळंपण त्यात नव्हतं.

भविष्यातील सेमिनार आणि सेशन्सच्या माहितीसाठी क्लिक करा

दरम्यान, Google Plus ने नंतर Hangouts आणि Google Photos सारखे ॲप निर्माण केले. Google Plus च्या युझर्सची संख्या 220 कोटी एवढी होती; परंतु 0.03 टक्के लोकचं हे सोशल माध्यम माहिन्याला वापरत होते. सरासरी एक युझर महिन्यातून 3 मिनिटे हे ॲप वापरत होता, असे कळले. दरम्यान, फेसबूक 220 crore युझर्स वापरतात, त्यातील 147 crore युझर्स दररोज तासंतास फेसबुकवर पडीक असतात.

Google Plus का बंद झाले… काही दिवसांपूर्वी Google Plus अपयशामुळे बंद झाले असे का झाले. याचे कारणे म्हणजे Google Plus ने युझर्सनला वेगळं काहीच दिलं नाही…

मराठी उद्योजकांनी यातून कोणता धडा शिकावा??? स्पर्धा आहे म्हणून तुम्हीही एकसारखेच प्रॉडक्ट किंवा सेवा निर्माण करुन दुस-यांसोबत स्पर्धा करु नकाउदा. एकेकाळी मोबाईल फोन क्षेत्रात नोकिया कंपनीची मक्तेदारी होती. जेव्हा ॲपल, सॅमसंगसारखे नवे ब्रॅंड आले, त्यांनी युझर्ससाठी काहीतरी नवं, युनिक केलं त्यातून आयफोन, सॅमसंगची स्मार्टफोन्स बाजारात आली.

बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांचे प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा 

Google Plus कडे काहीच नवीन नव्हतं. एवढंच नाहीतर गूगल फेसबूकसारखा युझर्स आपल्या मीडिअमवर खिळवून ठेऊ शकला नाही.

अनेक उद्योजक म्हणतात की, ही कंपनी XYZ प्रोडक्ट/सेवेने कोटी रुपये कमविते, आपणही असाच बिझनेस सुरु करूयापण हे सारखं चालणार नाही. जर तुम्ही ग्राहकांना एकच प्रोडक्ट किंवा सेवा दिलं तर ग्राहक तुमच्याकडे का येतील?

स्नेहलनीती हा ॲप डाऊनलोड करा 

'शाओमी'चे उदाहरण घ्या... ही कंपनी उच्च तंत्रज्ञान असलेले फोन्स अत्यंत कमी रुपयांत बनवते आणि विकते. आज ही कंपनी सॅमसंगला टक्कर देत आहे. लोक हे फोन्स खरेदी करतात कारण शाओमीने फोन्सची किंमत कमी ठेवली आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने हे फोन्स अव्वल असतात, हे त्यांचे वेगळेपण आहे.

तर उद्योजकांनो... वेगळपण सादर करा, ग्राहकाला काहीतरी युनिक द्या.अशाप्रकारे तुम्ही तुमच्या कोणत्याही स्पर्धाकावर मात करु शकता.