उद्योजकांनी '10X बिझनेस सिक्रेट्स' कार्यशाळेत सहभाग का नोंदवावा, याची कारणं..

उद्योजकांनी '10X बिझनेस सिक्रेट्स' कार्यशाळेत सहभाग का नोंदवावा, याची कारणं..

मराठी उद्योजकांनो तुम्हाला थोडं भुतकाळात घेऊन जातो... काही वर्षांपूर्वी एका मराठी तरुणाने बिझनेस सुरु करायचं ठरवले. मराठी तरुणांना जसं नोकरी करण्याचं बाळकडू घरातून मिळतं, त्यातून तरुणाने बाहेर पडण्याचा विचार त्या तरुणाने केला. त्याने आपल्या कल्पनेनुसार बिझनेस सुरु केला आणि हळूहळू मार्गक्रमण करीत राहिला. जसजसा बिझनेस पुढे जात होता तसतशा व्यवसायातील अडचणी आणि समस्या वाढत होत्या. काय करायचं, पुढचं पाऊल काय असेल याचा थांगपत्ता लागत नव्हता, त्यात पैसे तर भरमसाठ खर्च होतं होते. 

त्या मराठी तरुणाने बिझनेसमन होण्याचं स्वप्न पाहिलेलं; पण स्वप्नाचा पाठलाग करताना कर्जाचा डोंगर त्याच्या खांद्यावर उभारला गेला आणि कोटी रुपयांचे कर्ज त्याच्या डोक्यावर साचले. जिथे बिझनेसमधून नफा कमविण्याचे स्वप्न पाहिले होते, तिथे कोट्यवधी रुपयांची देणी देण्याचे भयानक स्वप्न पडू लागले. नाईलाजास्तव त्या तरुणाने बिझनेस करण्याचे सोडले, बिझनेससाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड केली आणि साधी नोकरी धरली.

पण तो तरुण शांत बसला नाही. बिझनेसमध्ये अपयश आल्याचे दुख त्याला सतत सलत होते; त्याने आपल्या अंगी असलेल्या वक्तृत्व कौशल्यावर मेहनत करायला सुरुवात केली. आपण लोकांसमोर उभे राहू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो, हे त्याला कळले. आपण बिझनेस कोच होऊ शकतो हे त्या तरुणाच्या मनात आले आणि त्याने ठरवले आता बिझनेस कोच बनायचेच... पण भाषा कोणती, हा प्रश्न पडला. इंग्रजीतून आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ पण मराठीच काय???

तेव्हा त्या तरुणाला आपले मागचे दिवस आठवले... आपणही बिझनेस करीत होतो आणि त्यात योग्य मार्गदर्शन आणि दिशा न मिळाल्याने अपयशी झालो. आपण मराठी बिझनेसमन आणि व्यवसाय सुरु करणा-या तरुणांसाठी एक मार्गदर्शक आणि दिशादर्शक म्हणून काम करायचे. आज तो तरुण आंतरराष्ट्रीय बिझनेस ज्ञान स्वतः आत्मसात करतो नंतर मराठी उद्योजकांच्या साध्या सोप्या भाषेत मांडतो. त्या तरुणाला तुम्ही ओळखता आणि तो तरुण म्हणजे स्नेहल कांबळे... स्नेहल कांबळे आज भारतातील नं. १ मराठी बिझनेस कोच आहेत त्यांनी उद्योजकांसाठी बिझनेस कोचिंग, ट्रेनिंग आणि कन्सलटन्सी सेवा सुरु केली तसेच पीपल फन्कशन - HR Services, क्रिएटिव्ह ज्युसेस - Digital Agency (Creating websites / Apps / Customized Software Solutions / Digital Marketing services etc.), लिवाना फॅशन (Designer Boutique), पब्लिकेशन असे त्यांचे अनेकसे बिझनेस आहेत. 

उद्योजकांनो आपल्या सर्वांमध्ये एक बिझनेसमन दडला आहे. त्याला फक्त बाहेर काढण्याची गरज आहे. याचसाठी बिझनेस कोच 'स्नेहलनीती' आणि स्नेहल कांबळे यांनी '10X बिझनेस सिक्रेट्स' वर्कशॉप आयोजित केला आहे. 

दोन दिवसांच्या '10X बिझनेस सिक्रेट्स'मध्ये तुम्ही शिकाल
स्नेहलनीती ने एक न भुतो ना भविष्यती असा प्रशिक्षणक्रम मराठी बिझनेसमन्ससाठी आणला आहे. प्रशिक्षणक्रमाचे नाव आहे '10X बिझनेस सिक्रेट्स'... सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा प्रशिक्षणक्रम फक्त बिझनेसमन्ससाठी.

'10X बिझनेस सिक्रेट्स' विषय...
बिझनेसमधील नफा कसा वाढवाल?
तुमच्या कर्मचाऱ्यांना कंपनीशी प्रामाणिक कसे बनवाल?
बिझनेसमधील समस्यांना कसे संपवाल?
ग्राहकांना आकर्षित कसे कराल?
एक आदर्श कंपनी कशी बनवाल?
तुमच्या कंपनीत तुम्ही आदर्श लीडर / कोच कसे बनाल? 

हे सर्व तुम्हाला शिकायला मिळेल '10X बिझनेस सिक्रेट्स' या कार्यशाळेत... सदर सेमिनार हे 'स्नेहलनीती'चे प्रीमिअम सेमिनार असून फक्त मुंबई आणि पुणे येथेच होते. बिझनेस कोच स्नेहल सरांच्या बिझनेस स्ट्रॅटेजीझ आणि उद्योजकतेबाबत अविस्मरणीय अनुभवासाठी तुम्ही नक्कीच या सेमिनारमध्ये सहभाग घेतला पाहिजे. 

'10X बिझनेस सिक्रेट्स' पुणे कार्यशाळेची माहिती...
दि. 5 & 6 डिसेंबर 2018 (बुधवार - गुरुवार)
स्थळ: पंडित भीमसेन जोशी कलामंदिर, पुणे
वेळ: सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत 

'10X बिझनेस सिक्रेट्स' मुंबई कार्यशाळेची माहिती...
दि. 10 & 11 Dec 2018(सोमवार-मंगळवार)
स्थळ: सिडको एक्झिबिशन केंद्र, सेक्टर 30, वाशी
वेळ: सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत

वर्कशॉपमध्ये आजच सहभाग घेण्यासाठी तसेच अन्य माहितीसाठी पुढील क्रमांकावर 9223334907 / 8291103660 संपर्क करा...