महेश गुप्ता यांच्या एका कल्पनेने घडवली 800 कोटींची कंपनी...

महेश गुप्ता यांच्या एका कल्पनेने घडवली 800 कोटींची कंपनी...

"एक आयडिया आपले जग बदलू शकते!" हे वाक्य आपण भरपूर वेळा ऐकले असेल; पण काही जणांनी हे सत्यात अनुभवले आहे. त्याच अनेकांपैकी असलेले एक महेश गुप्ता. त्यांची दोन मुलं कावीळ आजाराने त्रस्त होती. मुलांचं आजारपण त्यांना पहावलं नाही. अस्वच्छ पाणी आणि त्यामुळे होणा-या रोगांवर मात करण्यासाठी महेश गुप्ता यांनी कल्पना सुचली आणि त्यातून Kent RO सिस्टीम्स लिमिटेड कंपनी निर्माण झाली. आज ही कंपनी 800 कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल करते. तर आज घेऊयात आढावा केंट आरओ कंपनीचे संस्थापक महेश गुप्ता यांच्या कार्याचा...

सुरुवात... साधारण कुटुंबात जन्माला आलेल्या महेश गुप्ता यांनी आयआयटी कानपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी घेतली. त्यानंतर आयआयपी, देहरादून येथून मास्टर्स केले. पुढे 1978 साली त्यांनी इंडियन ऑईल्समध्ये सेल्स विभागात कामाला सुरुवात केली.

नोकरीत मन रमेना... सात वर्ष नोकरी केल्यानंतर महेश यांचे मन नोकरीत रमेनासे झाले. त्यांची ओढ उद्योजकतेकडे वाढली. त्यातच त्यांनी नोकरी सोडली. तसेच 20 हजार रुपयांची गुंतवणूक एस. एस. इंजिनिअरींग या कंपनीत करुन स्वतःची कंपनी सुरु केली. यात त्यांना अनेक पेटंट मिळाले. 

शुद्ध पाण्याचा प्रश्न... सर्व काही सुरळीत चालू होत. दरम्यान महेश यांची दोन मुलं सारखी आजारी पडू लागली. शुद्ध पाणी नसल्याने त्यांना कावीळची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दिल्लीत उच्च भागात राहूनही पाणी शुद्ध न मिळणे, ही बाब फारच खेदजनक होती. सर्व उपाय करुन झाले. काहीच होईना, शेवटी बापच तो... आपण स्वतः वॉटर प्युरिफायर तयार करु... मेकॅनिकल इंजिनिअरचे ज्ञान कधी उपयोगी येणार.

अनेक महिन्यांच्या मेहनतीने वॉटर प्युरिफायर तयार केले... पुढच्या सहा महिन्यात महेश यांनी वॉटर प्युरिफायर बनविण्यावर रात्रंदिवस मेहनत घेतली. अनेक मॉडेल्स तयार केले, त्यात अपयश आले. शेवटी रिव्हर्स ऑस्मोसिस (RO) तंत्रज्ञानाने पाणी पूर्णपणे शुद्ध होते आणि त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नसल्याचे कळले. त्यानंतर याच बिझनेसला मोठे स्वरुप देण्याचे त्यांनी ठरविले. 

आणि Kent RO कंपनी सुरु झाली... महेश यांची कल्पना चांगली होती त्याला मेहनतीची जोड मिळाली त्यातून शुद्ध पाणी देणारे वॉटर प्युरिफायर तयार झाले. पुढे महेश गुप्ता यांनी 5 लाख रुपये गुंतवणूकीतून आपल्या गॅरेजमध्ये केंट आरओचे ऑफिस सुरु केले. सुरुवातीला स्पर्धा फार होती केंट आरओ 20,000 रुपये तर साधारण वॉटर प्युरिफायर 5,000 रुपयांपर्यंत मिळत होती. प्रोडक्ट सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी मार्केटिंगची साथ घेतली.

हेमा मालिनी ब्रॅण्ड अॅम्बेसेडर झाल्याचा फायदा... दरम्यान, महेश गुप्ता यांनी ज्येष्ठ अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका हेमा मालिनी यांना केंट आरओच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केले. त्यानंतर केंट आरओच्या प्रोडक्टचा सेल 40 टक्क्यांनी वाढला. आज या कंपनीचा टर्न ओव्हर 800 कोटी रुपये एवढा असून 2,500 कर्मचारी या कंपनीत काम करीत आहेत. तर मराठी उद्योजकांनो नव्या कल्पना बिझनेसमध्ये राबवा, तुमचा बिझनेस नक्कीच वाढेल...