13 बिझनेस जे शून्य रुपये गुंतवणुकीतून सुरु होतात...

13 बिझनेस जे शून्य रुपये गुंतवणुकीतून सुरु होतात...

मराठी बिझनेस कोच स्नेहल कांबळे यांना सेमिनार, सेशन्स, फेसबुक किंवा युट्यूब माध्यमातून अनेक मराठी बिझनेसमन नवीन बिझनेस आयडिया किंवा कमीतकमी रुपयांत बिझनेस कसे सुरु करायचे याबाबत विचारणा करतात. म्हणून आज आम्ही 'स्नेहलनीती' ब्लॉगमार्फत असे काही बिझनेस पर्याय मांडणार आहोत जे शून्य रुपये गुंतवणुकीतून सुरु होतात... तर घेऊयात अशा बिझनेसेसचा आढावा.

ब्लॉगिंग... जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल तर तुम्ही स्वतःची ब्लॉगिंग वेबसाईट सुरु करू शकता किंवा दुस-यासाठी लिहून स्वतः पैसे कमावू शकता. सध्या सर्वोत्तम ब्लॉगर्स महिन्याला 80 हजार ते दीड लाख रुपये कमवतात. जर तुम्ही दुस-यांसाठी लिहित असाल तरी तुम्ही महिन्याला 30 ते 40 हजार रुपये कमाऊ शकतात.


व्हर्च्युअल ऍसिस्टंस... व्हर्च्युअल ऍसिस्टंस म्हणजे गरज असेल त्याला मदत करणे आणि ही मदत ऑनलाईन स्वरुपाची असून तुम्ही मदत केल्याचे तुम्हाला पैसे मिळतात. ट्रॅव्हल बूकिंग, सोशल मीडिया प्रमोशन, कॅलेंडर व्यवस्थापन, ईमेल व्यवस्थापन, ब्लॉग पोस्टिंग अशा स्वरुपात तुम्ही व्हर्च्युअल ऍसिस्टंसद्वारे पैसे कमावू शकता, तेही शून्य रुपये गुंतवणुकीमध्ये...


फेसबुक ऍड्स कन्सल्टिंग... फेसबुक हे इंटरटेनमेंट साईट राहिलं नसून तो एक बिझनेस झाला आहे. आपल्याकडील सेवा-सुविधा विकण्यासाठी आपण फेसबुक ऍड्सचा उपयोग करु शकतो. त्या ऍड्स इफेक्टिव्ह असणे गरजेचे आहे. अशावेळी तुमचे कौशल्य वापरुन फेसबुक ऍड्स कन्सल्टिंगद्वारे तुम्ही पैसे कमावू शकतात.


घोस्ट रायटिंग... ज्या लिखाणाला तुमचं नाव किंवा क्रेडिट मिळत नाही, असं लिखाण करणे म्हणजे घोस्ट रायटिंग. अशाप्रकारे लेखक महिना 30 ते 40 हजार किंवा त्याहून अधिक पैसे कमावू शकतात. फक्त या लिखाणाची तुम्हाला निनावी करावे लागेल.

ऑनलाईन बूक पब्लिश करणे... पुस्तक लिहून ते प्रकाशित करणे फारच खर्चाची बाब आहे. अशावेळेस तुमचे लिखाण चांगले आहे तसेच तुमचा वाचकवर्ग चांगला असल्यास तुम्ही ऑनलाईन बूक पब्लिश करुन पैसे कमावू शकता. उदा. किंडलसारखे अनेक प्लेअर्स ऑनलाईन बूक पब्लिशिंगचे प्लॅटफॉर्म आहेत. अशाप्रकारे आपण शून्य रुपये गुंतवणुकीत जास्तीत जास्त पैसे कमावू शकतो.