धकाधकीच्या जीवनात स्वतःची काळजी घेण्याच्या काही स्टेप्स!

धकाधकीच्या जीवनात स्वतःची काळजी घेण्याच्या काही स्टेप्स!

आयुष्यात स्वतःची काळजी घ्या कारण त्यावरच आपले यश अवलंबून आहे. आपण प्रोफेशनल किंवा पर्सनल लाईफमध्ये बॉस, मित्र किंवा नातेवाईकांना खूश करण्यासाठी अनेक अशा गोष्टी करतो. त्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत; पण दुस-यांच्या काळजी खातर आपण त्या करत असतो. तेव्हा आपली काळजी कोण घेणार??? म्हणूनच आज आपण पाहूयात स्वतःची काळजी कशी घ्यावी...

स्वतःवर प्रेम करायला शिका... मित्रांनो, स्वतःवर प्रेम करायला शिका. 'जब वी मेट'मधील करीना कपूरचा डायलॉग आठवतो का? 'मे अपनी फेव्हरेट हूं।' तसेच तुम्हीही तुमचे फेव्हरेट व्हा. स्वतःला काय आवडत काय आवडत नाही, ते पहा. 

तुम्हाला जे वाटतं तेच बोला... अनेक वेळा आपण आपल्या जे वाटतं ते बोलत नाही. कारण, आपल्याला भीती वाटते की ती व्यक्ती आपल्यापासून दुखावू शकते. पण तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला जे वाटतं तेच लोकांसमोर बोला.

लोकांच्या मागे बोलणे टाळा... ऑफिसमध्ये बॉसच्या मागे गॉसिपिंग चालू असते किंवा मित्रा-मित्रांमध्येही दुस-या मित्रांबद्दल वाईट बोलणे चालू असते; परंतु असे करण्यापेक्षा त्या व्यक्तीसमोर बोला. यामुळे आपला प्रामाणिकपणा त्याला समजेल.


स्वतःबद्दल कधीच वाईट बोलू नका... अनेक वेळा आपण डिप्रेशनमध्ये येऊन स्वतःच्या त्रुटी दुस-यांना सांगतो. असे कदापि करु नका. समोरचा व्यक्ती आपल्या त्रुटीचा फायदा घेऊ शकतो. अशावेळेस स्वतःच्या चांगल्या गुणांवर किंवा चांगल्या कामांवर फोकस करा, यामुळे आपल्या आत्मविश्वास मिळतो.
 
तुमच्या स्वप्नांचा त्याग करू नका... कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करू नका. कधी-कधी आपण दुस-यांसाठी स्वतःच्या स्वप्नांचा त्याग करतो. विशेषतः महिलांसोबत हे वारंवार होत असते. अशावेळेस कर्तव्य आणि आपली स्वप्ने दोघांना समान वाव द्या आणि स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

नकार देण्यास घाबरु नका... सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी गोष्ट आवडली नाही त्याबाबत  नकार देण्यास घाबरु नका. कोणाच्या दडपणाखाली येऊन किंवा जबरदस्तीने कोणती गोष्ट करू नका. याचा त्रास आपल्यालाच होईल.


तुमच्यातील अंतःप्रेरणा विश्वास ठेवा... आपले मन आणि बुद्धी नेहमी आपल्याला चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल गाईड करत असते. आपण फक्त त्यांचे नीट ऐकले पाहिजे. त्यालाच Instinct म्हणतात. त्यावर विश्वास ठेवा आणि आपले काम करीत रहा. 

जे तुमच्या नियंत्रणात नाही त्याचा विचार करू नका... ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाही अशा गोष्टींवर विचार केल्यास आपल्याकडे नकारात्मकता उभी राहते आणि आपण डिप्रेशनमध्ये जातो. याउलट जे काम तुमच्या नियंत्रणात आहे त्यावर फोकस करा आणि ते काम पूर्ण करा. 

निगेटिव्ह लोकांपासून दूर रहा... आपल्या सभोवताली ड्रामा करणा-या आणि निगेटिव्ह लोकांचा मोठा ग्रुप आहे. या लोकांना जीवनात स्वतः पुढे जायचे नसते. अशावेळी या लोकांपासून दोन हात लांबच रहा. आपले पर्सनल आणि प्रोफेशनल ध्येय काय आहे आणि ते आपण लवकरात लवकर कसे पूर्ण करु, यावर फोकस करा.